DNA मराठी

NCP

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

Sharad Pawar: जनतेची माफी अन् छगन भुजबळांवर हल्लाबोल, येवल्यात शरद पवारांनी सभा गाजवली

Sharad Pawar: राज्यात विधानसभेसाठी बिगुल वाजले असून आता प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) देखील जोरदार प्रचार करत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत छगन भुजबळ यांचा पराभव करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या सभेत बोलताना शरद पवार यांनी 2019 च्या निवडणुकीत “चुकीचा उमेदवार” दिल्याबद्दल जनतेची माफी मागितली. तसेच भुजबळांचा पराभव करा असा भावनिक आवाहन देखील यावेळी त्यांनी केला. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोठा खुलासा करत म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा भुजबळ यांनी अजित पवारांशी चर्चा करतो असं सागितलं होत मात्र त्यानंतर भुजबळच त्या गटात गेले असं शरद पवार म्हणाले. तसेच आम्ही त्यांना विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे दिली. मात्र तरीही देखील त्यांनी सर्व मर्यादा ओलांडून विश्वासघात केला. असं देखील शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भुजबळ विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा त्यांना विधान परिषदेवर पाठवले आणि विरोधी पक्षनेतेही केले. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा भुजबळांना पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष केले. येवल्यातून त्यांना रिंगणात उतरवून सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मंत्रीपद देण्याची चूक मी केली. शरद पवार म्हणाले की, भुजबळांनी काही चुका केल्या आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, मात्र स्वत: सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेण्यात आले. “जेव्हा भुजबळांवर काही आरोप झाल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांना महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये पदही दिले,” असेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar: जनतेची माफी अन् छगन भुजबळांवर हल्लाबोल, येवल्यात शरद पवारांनी सभा गाजवली Read More »

Ajit Pawar: लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा, अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन

Ajit Pawar: लोकसभेप्रमाणे यंदा देखील सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागला आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली होती तर आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केला आहे. लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा. असं अजित पवार एका सभेत बोलताना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी सावळमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की लोकसभेला लोकांमध्ये एक अंडर करंट होता. त्यामुळे लोकसभेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करून साहेबांना खुश केलं आणि आता विधानसभेची ही खालची निवडणूक आहे. त्यामुळे मला मतदान करून मला देखील खुश करा असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला होता तर महायुतीला फक्त 19 जागा जिंकता आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा, अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन Read More »

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट

Rohit Pawar : 2019 प्रमाणे 2024 लाही राज्यामध्ये कर्जत-जामखेड हा मतदार संघ लक्षवेधी राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने असल्याने ही लढत मोठी रंगतदार आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाने गाजणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदर रोहित पवार यांनी सहकुटुंब येत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातून एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. रॅली नंतर एका मोठ्या सभेचा आयोजनही करण्यात आलेलं होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मी 2019 प्रमाणे आताही एका बलाढ्य पक्षा विरुद्ध लढत असलो तरी विजय पुन्हा माझाच होईल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक जिंकण्यासाठीच असून पुढील पाच वर्षासाठी कोणती विकास कामे करायचे याचे प्लॅनिंग मी केलेले आहे. राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार यांनी, त्यांना विकासाबद्दल काहीही कळत नसल्याचा टोला लगावला. त्यांनी विकास कामे केले किंवा मी केली यासाठी त्यांनी समोरासमोर येऊन कोणी किती विकास कामे केली हे सांगावे असे खुले आव्हान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिले आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत 170 ते 180 जागांवर निवडून येईल असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. विरोधकांनी जाणीवपूर्वक मतं खाण्यासाठी सुपारीबाज उमेदवार उभे केले आहेत, मात्र जनतेला विकासा कोण करेल याची माहिती असल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यातील जनता राहील असा विश्वासही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट Read More »

Maharashtra Election: महायुतीच्या 24 तर मविआच्या 33 जागांवर निर्णय बाकी, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Maharashtra Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांवरून जागावाटापाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे या जागेवर कोणता पक्ष उमेदवार देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागू आहे. माहितीनुसार, महायुतीच्या 24 आणि महाविकास आघाडीच्या 33 जागांवर निर्णय होऊ शकलेला नाही. महाआघाडीत आघाडी वाढवण्यासाठी भाजपने आपल्या कोट्यातील चार जागा छोट्या पक्षांसाठी सोडल्या आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर काँग्रेस-शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. दुसरीकडे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संतुक मारोतराव हुंबर्डे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेसने दिवंगत खासदार रवींद्र चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. जो जास्त जागा जिंकतो तो मुख्यमंत्री होतोज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तोच मुख्यमंत्री होणार अशी अंतर्गत चर्चा म.वि. यामुळे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. तीन घटक पक्षांमध्ये प्रत्येकी 85 जागांवर निवडणूक लढवण्याचा करार झाला होता, मात्र काँग्रेसने 102 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने (यूबीटी) 84 जागांवर तर राष्ट्रवादीने (शरद) 76 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. विदर्भ, मुंबई आणि मराठवाड्यातील सुमारे 15 जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने काटेल जागेवर माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्राचे मुंबई-कोकण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुंबईतील पक्ष मुख्यालय टिळक भवन येथे कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. भाजपने काल तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवार जाहीर केले आहे. महायुतीच्या 21 जागांवर सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. भाजपने आतापर्यंत एकूण 146 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने आपल्या कोट्यातील चार जागा युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय (आठवले) आणि जनसुराज्य शक्ती पक्षासाठी सोडल्या आहेत. कलिना जागेवर आरपीआयने अमरजीत सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Election: महायुतीच्या 24 तर मविआच्या 33 जागांवर निर्णय बाकी, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस Read More »

NCP Second Candidate List: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वांद्रे पूर्वमधून जीशान सिद्दिकी तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे मैदानात

NCP Second Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज आपली दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 38 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीमध्ये काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जीशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व मधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेना नेते वरून सरदेसाई विरुद्ध जीशान सिद्दिकी असा सामना रंगणार आहे. तर पक्षाकडून अनुशक्ती नगरमधून सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या जागी पक्षाने आता त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध इस्लामपूर मधून निशिकांत पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली आहे. तसेच तासगाव विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील असा सामना रंगणार आहे. वडगाव शेरीमधून पुन्हा एकदा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहमधून भाजपचे माजी खासदार प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.

NCP Second Candidate List: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वांद्रे पूर्वमधून जीशान सिद्दिकी तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे मैदानात Read More »

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बंडात साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी मनसेकडून देखील 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर बोलावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आज या आमदारांना एबी फॉर्म वाटप करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे अद्याप देखील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही. आज किंवा उद्या महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना महायुतीकडून एबी फॉर्म देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आतापर्यंत 17 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे तर भाजपने आतापर्यंत 99 जागांवर आपले उमेदवारांची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे उमेदवार कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदेसाक्री (अज) – मंजूळाताई गावितचोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणेजळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटीलएरंडोल – अमोल चिमणराव पाटीलपाचोरा – किशोर पाटीलमुक्ताईनगर – चंद्रकांत पाटीलबुलढाणा – संजय गायकवाडमेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकरदर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळरामटेक – आशिष जैस्वालभंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकरदिग्रस – संजय राठोडनांदेड उत्तर – बालाजी कल्याणकरकळमनुरू – संतोष बांगरजालना – अर्जून खोतकरसिल्लोड – अब्दुल सत्तारछत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वालछत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाटपैठण – विलास भूमरेवैजापूर – रमेश बोरनारेनांदगाव – सुहास कांदेमालेगाव बाह्य – दादाजी भुसेओवळा माजीवडा – प्रताप सरनाईकमागाठाणे – प्रकाश सुर्वेजोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकरचांदिवली – दिलीप लांडेकुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकरमाहिम – सदा सरवणकरभायखळा – यामिनी जाधवकर्जत – महेंद्र थोरवेअलिबाग- महेंद्र हरी दळवीमहाड- भरतशेठ मारुती गोगावलेउमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुलेपरांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंतसांगोला- शहाजी बापू पाटीलकोरेगाव- महेश शिंदेपाटण- शंभूराज देसाईदापोली- योगेश कदमरत्नागिरी- उदय सामंतराजापुर- किरण सामंतसावंतवाडी- दीपक केसरकरराधानगरी- प्रकाश आबिटकरकरवीर- चंद्रदिप नरकेखानापुर- सुहास बाबर

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी Read More »

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची…

Ajit Pawar:  एकीकडे राज्यात महायुतीच्या नेत्यांकडून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत रोडशो आणि अनेक जाहीर सभा घेत आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून अचानक गायब झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा देखील अजित पवार उपस्थित नव्हते.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते मात्र अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. यामुळे अजित पवार नेमकं कुठे आहे याबाबत राष्ट्रवादी नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. माञ राजकीय वर्तुळात अजित पवार महायुतीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  यामुळे अचानक लोकसभा प्रचारातून अजित पवार गायब झाले असल्याची चर्चा होत आहे.  अजित पवार नेमकं कुठे गायब झाले? याबाबत सर्व शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले अजित पवारांची तब्येत खराब आहे आणि यामुळे ते आराम करत आहे असं शरद पवार म्हणाले. मात्र अजित पवार महायुतीच्या काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या सभेत अजित पवार हजर राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची… Read More »

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित

NCP News :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांनी दिली.   लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून प्रचारास सुरवातही केली आहे. त्यासाठीच दि.४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.  या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित Read More »

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा मात्र MVA मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम, आजच निर्णय घ्या नाहीतर….

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहे. देशात यावेळी 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आतापर्यंत अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे मात्र राज्यात अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाबाबत  निर्णय झालेला नाही.   MVA ने वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना युतीमध्ये सामील होण्याची शेवटची संधी दिली आहे. विरोधी आघाडी MVA मध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP यांचा समावेश आहे.  प्रकाश आंबेडकरांनी जास्त जागांच्या मागणीमुळे एमव्हीएमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचे जागावाटपाचे गणित बिघडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजकीय तापमान आणखी वाढवले ​​आहे. संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यावर टीका करत काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असा आरोप आंबेडकरांनी आपल्या पत्रात केला आहे. वृत्तानुसार, MVA ने VBA ला आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपला निर्णय कळवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. MVA ने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला 4 जागा देऊ केल्या आहेत. त्या चार जागा स्वीकारार्ह आहेत की नवीन प्रस्ताव द्यायचा आहे का, हे आजच VBA ला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.  MVA आज जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले की, व्हीबीएने आम्हाला 27 जागांची यादी दिली होती, त्यापैकी आम्ही त्यांना चार जागा देऊ केल्या आहेत. त्यांना काय हवे आहे ते त्यांनी सांगावे… त्यांच्यासाठी महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत.

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा मात्र MVA मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम, आजच निर्णय घ्या नाहीतर…. Read More »