DNA मराठी

NCP

img 20250917 wa0004

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक

Ahilyanagar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील कत्तलखाने बंद करा आणि कोठला परिसरात गोमांस फेकणाऱ्या आरोपीला अटक करा या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन 16 सप्टेंबर रोजी केला होता. तर दुसरीकडे आता या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40 हजार किंमतीची मोपेड गाडी देखील जप्त केली आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक Read More »

ajit pawar

Beed Railway : ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 150 कोटी निधी वितरीत

Beed Railway: बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आज नव्याने १५० कोटींची भर घालून तो निधी आज वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच दि. १७ सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग ५० टक्के असून, आजवर शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता नव्याने १५० कोटींची भर घालण्यात आली आहे. या निधीचा उपयोग २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी केला जाणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ हा रेल्वेमार्ग सुमारे २६१ किलोमीटर लांबीचा असून, त्याचा एकूण खर्च ४ हजार ८०५ कोटी रुपये इतका आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे २ हजार ४०२ कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. आजपर्यंत शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी २३ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता आणखी १५० कोटींची भर घालण्यात आली असून या निधीचे वितरण १५ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दोन दिवस आधी वितरीत करण्यात आलेल्या या निधीमुळे या प्रकल्पाच्या विकासाला गती येणार आहे. या निधीचा उपयोग २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी होणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळ, रेल्वे व रस्ते विकासाला चालना देण्यासाठी विभागीय, जिल्हास्तरीय तसेच मंत्रालयीन पातळीवर विविध बैठका घेऊन त्यांनी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वे धावणार असून त्याचा थेट फायदा बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. “अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Beed Railway : ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 150 कोटी निधी वितरीत Read More »

Nilesh Lanke

Nilesh Lanke: नगरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट, मनपा प्रभाग रचनेवर लंकेंची हरकत; केली मोठी मागणी

Nilesh Lanke : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांनी हरकत घेत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही. हे भारतीय संविधानाच्या कलम १६, २४३(टी), २४३(एस) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५(अ) च्या तरतुदींना सरळ विरोध करणारे आहे. खासदार लंके यांनी आरोप केला की प्रभागांची रचना गुगल मॅपवर वाकड्या-तिकड्या रेषा मारून, गोपनीयतेचा भंग करत व मतदारसंघांची ताटातूट करून करण्यात आली आहे. “राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीच हा डाव आखण्यात आला आहे,” असा त्यांचा दावा आहे. २०१८ च्या मनपा निवडणुकीत तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर करून नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. मात्र यावेळी त्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले असून, हरकती दाखल करण्याचा मूलभूत अधिकारही नागरिकांकडून हिरावून घेतल्याचा आरोप लंके यांनी केला. नगर विकास विभागाच्या १० जून २०२५ च्या आदेशातील नैसर्गिक मर्यादा- मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रुळ यांचा विचार न करता ही रचना करण्यात आली आहे, असेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे २०१८ प्रमाणेच जुनी प्रभाग रचना कायम ठेवूनच आगामी महानगरपालिका निवडणूक घ्यावी, अशी ठाम मागणी खासदार लंके यांनी केली आहे.

Nilesh Lanke: नगरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट, मनपा प्रभाग रचनेवर लंकेंची हरकत; केली मोठी मागणी Read More »

jarange

Manoj Jarang Patil: छगन भुजबळ गोरगरीब ओबीसीला वेड्यात काढतायत; जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

Manoj Jarang Patil: आमचा जीआर मागे घेतला तर 16 टक्के आरक्षणही मागे घ्या अशी मागणी करत छगन भुजबळ गोरगरिब ओबीसीला वेड्यात काढतायत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली आहे. जालन्यात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण आम्ही लोकशाही मार्गाने मिळवलं काय करायचं ते करा. जर आमचा जीआर मागे घेतला तर 16 टक्के आरक्षणही मागे घ्या. 180 जातीच्या साडेचारशे जाती झाल्या कशा. तु काय कमी पुढारलेला आहे का? तुला अकलिचा भाग राहिला नाही. गोरगरिब ओबीसीला वेड्यात काढतो आहे. जातीय तेढ निर्माण करतायत भुजबळांवर गुन्हे दाखल करावे. ते काय मंत्रीमंडळ आहे का? त्यांला मंत्रीपद नव्हतं तर ते दिसले पण नाही आमच्या विरोधात कोर्टात गेले तर आम्ही सगळं बाहेर काढणार. ओबीसीच्या उपसमितीत एक पण मराठा नाही. सरळ सरळ जातीवाद आहे असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarang Patil: छगन भुजबळ गोरगरीब ओबीसीला वेड्यात काढतायत; जरांगे पाटील पुन्हा आक्रमक Read More »

beed

Beed News: बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप, शिक्षा झालेल्या कैद्याकडून करून घेतले वैयक्तिक कामे

Beed News : बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एकेक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट, अनाधिकृत वृक्षतोड, यानंतर आता शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचे वाहन धुतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून घरातील कामे, वाहनही धुवून घेतले असल्याचे उघड झाले आहे. त्याचाच एक व्हिडिओ समोर आला असून कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेतल्याने गायकवाड अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही गायकवाड यांचे जळगावला असताना निलंबन झाले होते. कैद्यांचे हक्क आणि संरक्षणाचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Beed News: बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप, शिक्षा झालेल्या कैद्याकडून करून घेतले वैयक्तिक कामे Read More »

ajit pawar

Ajit Pawar: राष्ट्रवादीसाठी सोलापूर हा विषय संपला, आनंद परांजपे स्पष्टच बोलले

Ajit Pawar : राज्यात अजितदादांवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे विरोधकांना चांगलं माहीत आहे. त्यामुळेच उबाठा गटाच्या शरद कोळीनामक नेत्याने टीका करण्याअगोदर रात्री सोलापूरहून सिध्देश्वर एक्स्प्रेस ट्रेन पकडून मातोश्री गाठावी आणि मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले उध्दव ठाकरेंनी अजितदादा पवार यांना अर्थखातं का दिले असा जाब विचारावा शिवाय कोविड काळात राज्याची आर्थिक घडी कुठेही बिघडू न देता अत्यंत उत्तमपणे अर्थ खातं सांभाळलं अशा प्रकारची स्तुती दस्तूरखुद्द उद्धव ठाकरेंनी केली होती याचाही जाब विचारावा ते अधिक संयुक्तिक राहील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी त्यांच्या आरोपाला उत्तर देताना लगावला आहे. अजितदादा पवारांनी आपली सोलापूरची भूमिका स्पष्ट केलेली आहे विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेबद्दल अजितदादांवर टीका करत आहेत. मात्र सोलापूर हा विषय संपलेला आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले. सोलापूर विषय राष्ट्रवादीसाठी संपला… सोलापूर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फेसबुक पोस्ट व ट्विटरवर स्पष्ट केले आहे की, सोलापूरमध्ये कायदेशीर कारवाईवर बाधा यावी अशा प्रकारे फोन केला नाही किंबहुना तिथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तिथे हस्तक्षेप केला होता. अजितदादा पवारांनी महिला पोलिस दलातील सर्वच महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च आदर आहे आणि कायद्याचे राज्य असले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपले ट्विट डिलीट केले आहे आता या विषयावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस बोलू इच्छित नाही असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

Ajit Pawar: राष्ट्रवादीसाठी सोलापूर हा विषय संपला, आनंद परांजपे स्पष्टच बोलले Read More »

gopichand padalkar on sharad pawar

Gopichand Padalkar on Sharad Pawar : शरद पवारांना सर्वांची नावे तोंडपाठ; फक्त ‘त्या’ दोघांची नावे पवार विसरले; गोपीचंद पडळकरांचा टोला

Gopichand Padalkar on Sharad Pawar: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी मतचोरी केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 160 आमदार निवडून आणून देतो अशी ऑफर दोन जणांनी दिली होती असा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी केला होता. तर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना कोणत्याही गावातील सर्वांची नावे माहीत असतात. पण ज्या दोघांनी शरद पवारांना 160 आमदार निवडून आणून देतो असे भेटून सांगितले होते असे शरद पवार म्हणतात त्या दोघांची फक्त नावे पवार विसरलेत. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना कोणत्याही गावातील सर्वांची नावे माहीत असतात. पण ज्या दोघांनी शरद पवारांना 160 आमदार निवडून आणून देतो असे भेटून सांगितले होते असे शरद पवार म्हणतात त्या दोघांची फक्त नावे पवार विसरलेत. बाकी सर्वांची नावे शरद पवारांना आठवतात असे म्हणत शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकरानी टोला लगावलाय. एका कार्यक्रमात आयोजकांचे कौतुक करताना पडळकर यांनी हे शरद पवारांवर वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

Gopichand Padalkar on Sharad Pawar : शरद पवारांना सर्वांची नावे तोंडपाठ; फक्त ‘त्या’ दोघांची नावे पवार विसरले; गोपीचंद पडळकरांचा टोला Read More »

imtiaz jaleel

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

Imtiaz jaleel : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा चर्चेत आला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर महानगर पालिकेतील माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची साथ सोडत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात दाखल होणार आहे.  माजी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक समद खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत एमआयएममध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील महिन्यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत एका विशेष समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असून एआयएमआयएममध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एआयएमआयएमला नगर शहरात मोठी ताकद मिळत असून पुढील काही दिवसात आणखी काही नेते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी व्यक्त केला आहे.

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ Read More »

Police

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट?

Pune Crime : मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप तीन मुलींनी कोथरूड पोलिसांवर केला होता. तर आता या प्रकरणात श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं यामुळे या मुलीने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एकीकडे या मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे रोहित पवार, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे राजकीय नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट? Read More »

chhagan bhujbal

नाशिकमध्ये 7 आमदार, पालकमंत्री पद मिळालाच पाहिजे; छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वाद पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहे तर नाशिकमध्ये तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. तर आता नाशिक जिल्ह्यात एकच पक्षाचे 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो. रायगडमध्ये आमची एक सीट असताना, आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे 7 आमदार असताना, पालकमंत्री पदासाठी आमच्या लोकांना आग्रह धरायला लावेल. असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच 7 आमदार एकच पक्षाचे असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. अजित पवार आणि सुनील तटकरेंशी मी बोलेन, एक आमदार असताना आपण पालकमंत्री पदासाठी आग्रह धरतो, तर 7 आमदारांसाठी पालकमंत्री पदासाठी शक्ती लावा. पालकमंत्री पद मिळाले, तर इच्छुक नाही तर नाही सर्व मंत्र्यांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचे झेंडावंदन जास्तीत जास्त मी केल आहे. 1991 पासून मी झेंडावंदन करतो आहे. त्यामुळे मला त्याचे काही दुःख नाही. असं देखील छगन भुजबळ म्हणाले.

नाशिकमध्ये 7 आमदार, पालकमंत्री पद मिळालाच पाहिजे; छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले Read More »