DNA मराठी

Narendra Modi

Narendra Modi : ‘या’ दिवशी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, शिंदे गटाला मंत्रिमंडळात मिळणार स्थान?

Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर आता सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे.  यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जून रोजी दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हजेरी लावली समोर आलेल्या माहितीनुसार, 8 जूनला पंतप्रधानपदाची मोदी शपथ घेणार आहे. यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे.  लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाले असून त्यांनी बहुमतासाठी लागणारा 272 चा आकडा पार केला आहे. यामुळे मोदी पुन्हा एकदा राष्ट्रपतीकडे सरकार स्थापन करण्याच्या दावा करणार आहे आणि 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. दिल्लीत बुधवारी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्यासह नितीश कुमार यांनी देखील एनडीएला समर्थन पत्र दिले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एनडीएला समर्थन पत्र दिले आहे.

Narendra Modi : ‘या’ दिवशी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, शिंदे गटाला मंत्रिमंडळात मिळणार स्थान? Read More »

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची…

Ajit Pawar:  एकीकडे राज्यात महायुतीच्या नेत्यांकडून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत रोडशो आणि अनेक जाहीर सभा घेत आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून अचानक गायब झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा देखील अजित पवार उपस्थित नव्हते.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते मात्र अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. यामुळे अजित पवार नेमकं कुठे आहे याबाबत राष्ट्रवादी नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. माञ राजकीय वर्तुळात अजित पवार महायुतीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  यामुळे अचानक लोकसभा प्रचारातून अजित पवार गायब झाले असल्याची चर्चा होत आहे.  अजित पवार नेमकं कुठे गायब झाले? याबाबत सर्व शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले अजित पवारांची तब्येत खराब आहे आणि यामुळे ते आराम करत आहे असं शरद पवार म्हणाले. मात्र अजित पवार महायुतीच्या काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या सभेत अजित पवार हजर राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची… Read More »

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न असून, कॉंग्रेस पक्षाकडून जाणीवपुर्वक खोडसाळपणाची वक्‍तव्‍य केली जात असल्‍याचा आरोप  दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सक्‍टे यांनी केला.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ प्रा.मच्छिंद्र सक्‍टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे आवाहन केले. त्‍यानंतर माध्‍यमांशी त्‍यांनी संवाद साधला.  आपली भूमीका विषद करताना प्रा.मच्छिंद्र सक्‍टे म्‍हणाले की, राज्‍यातील महायुती सरकारने आमच्‍या मागणी प्रमाणे आण्‍णाभाऊ साठे यांचे स्‍मारक उभे करण्‍यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. तसेच घाटकोपर येथील त्‍यांचे निवास्‍थान राष्‍ट्रीय स्‍मारक करण्‍यासाठी सुध्‍दा ३०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचा शासन आदेश जारी केला  आहे. लहुजी वस्‍ताद साळवे यांच्‍या स्‍मारकाची तसेच समाजाच्‍या मुलांच्‍या शिक्षणासाठी बार्टीच्‍या धर्तीवर आर्टीची स्‍थापना करण्‍याची मागणीही महायुती सरकारनेच पुर्ण केल्‍यामुळे लोकसभा निवडणूकीत महायुतीला पाठींबा देण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.   विकासाच्‍या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्‍यासाठी महाविकास आघाडीने संविधान बदलाचा विषय खोडसाळपणे पुढे आणला आहे असा आरोप करुन, प्रा.सक्‍टे यांनी सांगितले की, संविधानात बदल करता येईल परंतू ते रद्द करता येणार नाही. घटनेचा गाभा कोणालाही बदलता येणार नाही ही भूमिका स्‍पष्‍ट असताना सुध्‍दा केवळ समाजाची दिशाभूल करण्‍याचे काम विरोधकांकडून होत आहे. यावर सामान्‍य जनता विश्‍वास ठेवणार नाही. कारण सर्व दलित नेते महायुती सोबत आहेत. पवार आणि ठाकरेंवर आता विश्‍वास राहीलेला नाही. त्‍यामुळेच दलित महासंघ आणि मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्‍या उमेदवारांच्‍या पाठीशी खंबरीपणे उभे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी संजय चांदणे, अरुणा कांबळे यांच्‍यासह जिल्‍ह्यातील अन्‍य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल Read More »

Ahmednagar Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम केले

Ahmednagar Lok Sabha Election: भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्‍या संविधानाचा खरा सन्‍मान भारतीय जनता पक्षाच्‍या सरकारमध्‍येच झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील उपेक्षित समाजाला न्‍याय देणा-या योजना सुरु करुन वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे मोठे काम केले आहे. त्‍यामुळेच लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचार यंत्रणेत काम करत असल्‍याची माहीती लहुजी सेनेचे प्रदेशाध्‍यक्ष कैलास खंदारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे तसेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  नगर येथे महायुतीचे उमदेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ खंदारे यांनी विविध भागांमध्‍ये दौरा करुन, मतदारांशी संवाद साधला. त्‍यानंतर निवडणूक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी लहुजी सेनेची भूमिका स्‍पष्‍ट केली. महायुतीच्‍या उमेदवाराला लहुजी सेनेचे पुर्ण समर्थन असून, महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍यासाठी लहुजी सेनेने सुध्‍दा जबाबदारी स्विकारली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  ज्‍या कॉंग्रेस पक्षाने या पुर्वी ७० ते ८० वेळा घटनेमध्‍ये बदल केला, त्‍यामुळे भाजपावर आरोप करण्‍याचा त्‍यांना कोणताही आधिकार नाही. संविधानाचा खरा सन्‍मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यकाळातच होवू शकला असे स्‍पष्‍ट करुन, लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्‍या  निवासस्‍थाला राष्‍ट्रीय स्‍मारकाचा दर्जा देण्‍याचा निर्णय, इंदु मिल येथील डॉ.आंबेडकरांचे स्‍मारक तसेच वस्‍ताद लहुजींच्‍या स्‍मारका करीता ५ गुंठे जमीन आणि निधीची उपलब्‍धता करुन, देण्‍याच महत्‍वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्‍यामुळेच लहुजी सेनेने महायुती सरकारच्‍या निर्णयांचे स्‍वागत केले आहे.  लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूतीवर लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते सक्रीयेपणे प्रचारात सहभागी झाले असून, युतीचे सर्व उमेदवार विजयी करण्‍यासाठी प्रयत्‍न करीत असल्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष कैलास खंदारे यांनी सांगितले.

Ahmednagar Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम केले Read More »

Ahmednagar News: आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला

Ahmednagar News:  कोविड संकट ही संधी मानून देशातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले. प्रत्‍येक सामान्‍य माणसाला घराजवळच आरोग्‍य सुविधांचा लाभ मिळण्‍यासाठी त्‍यांनी घेतलेला प्रत्‍येक निर्णय आज कृतीत उतरल्‍याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  इंडियन मेडीकल असोशिएशन, निमा यांच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी सर्व डॉक्‍टर्स, फार्मासिस्‍ट, पॅथोलॉजिस्‍ट यांच्‍याशी संवाद साधला. खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप, भाजपाचे अध्‍यक्ष अभय अगरकर, विनायक देशमुख, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलींद पोळ, सेक्रेटरी सचिन पंडुळे, डॉ.रविंद्र साताळकर, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.प्रकाश कांकरीया, केमीस्‍ट असोसिएशनचे अध्‍यक्ष दत्‍ता काडळकर, लॅब असोसिएशनचे अध्‍यक्ष निनाद आकोलकर आदि याप्रसंगी उपस्थित होते.  केंद्र आणि राज्‍य सरकारने आरोग्‍य विषयक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. आयुष्‍यमान भारत योजनेचा मोठा दिलासा मिळाला असून, राज्‍य सरकारनेही महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना आता नव्‍या बदलाच्‍या स्‍वरुपात सुरु केली आहे. यामध्‍ये येणा-या त्रृटी दुर केल्‍या जातील. कोव्‍हीड नंतर आरोग्‍य सुविधा अधिक परिपुर्ण कशा होतील यासाठीच मोठी गुंतवणूक आता करण्‍यात येत असून, देशाच्‍या स्‍वातंत्र्यानंतर पहिल्‍यांदाच आरोग्‍य सेवेला विकासाच्‍या प्रक्रीयेशीजोडण्‍याचे महत्‍वपूर्ण काम मागील दहा वर्षात झाले असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेमध्‍ये सुध्‍दा आरोग्‍य सुविधेला प्राधान्‍यक्रम आहेच, या बरोबरीनेच जिल्‍ह्यामध्‍ये रोजगार निर्मितीही औद्योगिक आणि पर्यटन विकासातून होवू शकते यासाठी आता जिल्‍ह्याचा विकास आराखडाही तयार करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला साहित्‍य, कला, संस्‍कृतीचा मोठा वारसा आहे, त्‍या दृष्‍टीन नॅशनल स्‍कुल ऑफ ड्रामाच्‍या धर्तीवर एखादी शाखा सुरु करतानाच शहरातील वाडीया पार्कला अंतरराष्‍ट्रीय चेहरा मिळवून देण्‍यासाठी निश्चित प्रयत्‍न होईल अशी ग्‍वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

Ahmednagar News: आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला Read More »

Sujay Vikhe: ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी : डॉ. सुजय विखे

Sujay Vikhe: देशात सध्या मोदीजींची हमी सुरू असून देशातील जनतेचा त्यावर विश्वास आहे. ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते राहूरी तालूक्यातील सोनगाव चौकातील कॉर्नर मिटींग मध्ये बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.  डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा सडकून समाचार घेत विरोधकांकडे नेता म्हणून कोणताही चेहरा नाही. त्यांच्याकडे ‘एक ना धड बारा भानगडी आहेत’. ते फक्त देशाला फक्त खड्ड्यातच घालू शकतात. यामुळे पंतप्रधान नरेंद्र हे देशाला एकमेव पर्याय आहेत असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.  डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, सदरची निवडणूक ही देशाची प्रतिनिधित्व ठरवणारी निवडणूक आहे. येणाऱ्या काळात देश कुणाच्या हाती द्यायचा आहे हे जनतेला ठरवायचे आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतके प्रभावी नेतृत्व नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मागील १० वर्षात जी प्रगती केली हे जगासमोर मोठे उदारण आहे. देशात संविधान मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकशाही अधिक सुदृढ आणि लोखाभिमुख करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाला विकासासाच्या माध्यमातून जगात महासत्ता म्हणून पुढे आणायचे आहे. २०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा आणि महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे त्यांनी आवाहन केले.

Sujay Vikhe: ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी : डॉ. सुजय विखे Read More »

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे

PM Modi: अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना १ लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने श्रीगोंदा मधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे,  असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी केले आहे. नागवडे ताई यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे, लोककल्याणकारी कार्य करत आहे. खासदार विखे यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत, रस्त्यांचे अनेक प्रश्न खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावले, पुन्हा एकदा त्यांना मतदार संसदेत पाठवणार आहे पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघात घरोघरी कमळ निशाणी पोहोचवा, असे सांगून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार ४०० सौ पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे Read More »

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे

Sujay Vikhe News :- अहमदनगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती गावोवावी पोहचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लावला आहे.  सदरची निवडणूक ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी खरवंडी कासार येथील बूथ कमिटी सभेत केले.   डॉ. सुजय विखे पाटील हे  विद्यमान खासदार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून  त्यांनी आपल्या  प्रचाराचा सपाटा लावला आहे. गावोवावी जाऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी मतदार संघातील  सर्व तालुकास्तरावरील बूथ कमिटीच्या बैठका घेणे, कार्यकर्ता मेळावे घेणे, घटक पक्षांच्या सभा घेण्याचे काम ते साध्य करत आहेत. अशीच बूथ कमिटीची बैठक खरवंडी कासार येथे शुक्रवारी बोलावण्यात आली होती.  यावेळी सुजय विखे यांनी महाविकास आधाडीवर निशाणा साधताना  तीन वर्षांच्या काळात तालुक्याला एक रुपयांचा सुद्धा निधी दिला नसल्याचा आरोप व्यक्त केला. तर दुसरीकडे महायुतीच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन निधी दिला आहे. यामुळे जर देशाचा आणि जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त देशाला दुसरा पर्याय नाही. म्हणून ही निवडणूक महत्वाची असून त्यासाठी आपण मतदान केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मी फक्त विकासावर मत मागत असून मी फक्त आपल्याला विकास देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. या सभेला आमदार मोनिका राजळे यांच्यासह मालेवाडी संघ, मिडसंघ, मुंगूसवाड, ढगेवाडी, काठेवाडी,बिडसंगावी,धाकनवाडी, दैत्य नांदूर, भारजवाडी,तुळजवाडी या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि सर्व बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे Read More »