Dnamarathi.com

Sujay Vikhe: देशात सध्या मोदीजींची हमी सुरू असून देशातील जनतेचा त्यावर विश्वास आहे. ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते राहूरी तालूक्यातील सोनगाव चौकातील कॉर्नर मिटींग मध्ये बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा सडकून समाचार घेत विरोधकांकडे नेता म्हणून कोणताही चेहरा नाही. त्यांच्याकडे ‘एक ना धड बारा भानगडी आहेत’. ते फक्त देशाला फक्त खड्ड्यातच घालू शकतात. यामुळे पंतप्रधान नरेंद्र हे देशाला एकमेव पर्याय आहेत असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले. 

डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, सदरची निवडणूक ही देशाची प्रतिनिधित्व ठरवणारी निवडणूक आहे. येणाऱ्या काळात देश कुणाच्या हाती द्यायचा आहे हे जनतेला ठरवायचे आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतके प्रभावी नेतृत्व नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मागील १० वर्षात जी प्रगती केली हे जगासमोर मोठे उदारण आहे. देशात संविधान मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकशाही अधिक सुदृढ आणि लोखाभिमुख करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाला विकासासाच्या माध्यमातून जगात महासत्ता म्हणून पुढे आणायचे आहे. २०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा आणि महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *