Nana Patole : सरेंडर दे सिलेंडर…नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांचे अनोखे निदर्शने
Nana Patole : राज्यात इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ‘अनोखे आंदोलन’ करण्यात आले. यावेळी सरेंडर दे सिलेंडर अशी घोषणा देत काँग्रेस नेत्यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आज देशात गॅस, डिझेल आणि पेट्रोलचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. एपस्टीन फाईल्सच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. मुंबईसारख्या शहरात निम्म्याहून अधिक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील हॉटेल्स आणि मेस बंद झाल्यामुळे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुला-मुलींना जेवणाचा तुटवडा भासत आहे. हतबल होऊन विद्यार्थी शिक्षण सोडून आपल्या गावी परतत असल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीला सरकारचे ‘अमेरिकेपुढील सरेंडर’ कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सरकारच्या पापामुळे जनतेला असे वाऱ्यावर सोडता येणार नाही. हे सरकार अजूनही झोपलेले असून त्यांना जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. जर परिस्थिती सुधारली नाही, तर काँग्रेस आपली भूमिका अधिक आक्रमक करेल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.या आंदोलनाने संपूर्ण मुंबईचे लक्ष वेधून घेतले असून, इंधन आणि अन्नधान्य टंचाईचा प्रश्न आता अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nana Patole : सरेंडर दे सिलेंडर…नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांचे अनोखे निदर्शने Read More »






