DNA मराठी

Modi

Donald Trump: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर 50% कर; व्हाईट हाऊसचा मोठा खुलासा

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध आणखी वाढू नये म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आर्थिक दबाव वाढवला असल्याचा खुलासा व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केला. व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले शुल्क दुप्पट करून 50 टक्के केले आहे. रशियावर अतिरिक्त दबाव आणण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. लेविट यांच्या मते, भारतावर लादलेले हे आर्थिक निर्बंध अप्रत्यक्षपणे रशियावर परिणाम करतील आणि युद्ध संपवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रयत्न ठरतील असे अध्यक्ष ट्रम्प यांचे मत आहे. पत्रकार परिषदेत कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, निर्बंधांचा उद्देश रशियावर आणखी दबाव वाढवणे आहे. राष्ट्रपतींनी हे युद्ध संपवण्यासाठी भारतावर दबाव आणला आहे. भारतावर निर्बंध आणि इतर पावले देखील उचलण्यात आली आहेत. कारण ट्रम्प यांनी स्वतः हे स्पष्ट केले आहे की त्यांना हे युद्ध संपवायचे आहे. झेलेन्स्की-ट्रम्प बैठक या निर्णयापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या दरम्यान झेलेन्स्कीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली. ट्रम्प यांनी ही बैठक यशस्वी झाली असे म्हटले, तर झेलेन्स्की म्हणाले की ही आतापर्यंतची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबतची सर्वोत्तम चर्चा होती. शांतता पुनर्संचयित करण्यावर ट्रम्प यांचा भर लेविट यांनी असेही म्हटले की ट्रम्प शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करून पुढे जाऊ इच्छितात आणि नाटो सरचिटरी जनरलसह सर्व युरोपीय नेते व्हाईट हाऊसमधून निघून गेले आहेत आणि हे एक उत्तम पहिले पाऊल आहे यावर सर्वजण सहमत आहेत. अमेरिका रशिया आणि युक्रेनसोबत एकत्र काम करत आहे कॅरोलिन लेविट यांनी आश्वासन दिले की अमेरिका रशिया आणि युक्रेन दोघांसोबत वाटाघाटीची प्रक्रिया पुढे नेत आहे. ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमुळेच युरोपीय नेते पुतिन यांच्याशी भेट झाल्यानंतर 48 तासांच्या आत व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. पुतिन-ट्रम्प बैठकीनंतर युरोपीय नेत्यांचा सहभाग लेविट म्हणाल्या की पुतिन आणि ट्रम्प यांच्या अमेरिकन भूमीवर झालेल्या भेटीनंतर 48 तासांच्या आत अनेक युरोपीय नेते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. आणि पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर लगेचच या युरोपीय नेत्यांना देण्यात आलेली माहिती इतकी जलद होती की त्यातील प्रत्येकजण विमानात चढला आणि 48 तासांनंतर अमेरिकेला रवाना झाला.

Donald Trump: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर 50% कर; व्हाईट हाऊसचा मोठा खुलासा Read More »

1 एप्रिलपासून लागू होणारे 10 मोठे बदल… थेट खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सर्वकाही…

April Rules Change: आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. देशात त्यामुळे या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून मोठे बदल दिसून येणार आहे आणि या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसणार आहे. या महिन्यापासून लागू झालेल्या 10 प्रमुख बदलांबद्दल जाणून घ्या व्यावसायिक सिलिंडर 44.50 रुपयांनी स्वस्तनवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 44.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 44.50 रुपयांनी स्वस्त झाल्याने दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1762 झाली आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्तनवीन कर प्रणालीनुसार आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून देशात 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना बंदमहिलांसाठी चालवली जाणारी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (MSSC) योजना आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यात 7.5% व्याजदर होता आणि कोणीही किमान 1000 ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकत होता. कारच्या किमती वाढल्याआजपासून मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडा या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती 4% पर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे वाहने खरेदी करणाऱ्या लोकांना महागाईचा सामना करावा लागेल. UPI वापरला जाणार नाहीजर तुमचा मोबाईल नंबर बराच काळ डि ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाही. असे क्रमांक UPI सिस्टममधून काढून टाकले जातील. ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावर दुप्पट सूट ज्येष्ठ नागरिकांना आता बँका आणि पोस्ट ऑफिसमधील व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळेल. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UPS पेन्शन योजना सुरूआता केंद्र सरकारी कर्मचारी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) चा भाग बनू शकतात, ज्यामध्ये 25 वर्षांच्या सेवेनंतर, कर्मचाऱ्यांना गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50% इतके पेन्शन मिळेल. या योजनेत सरकार 18.5% योगदान देईल. युलिपवरील भांडवली नफा करजर तुमचा युलिप प्रीमियम दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो भांडवली मालमत्ता मानला जाईल. आता यावर मिळणाऱ्या नफ्यावर भांडवली लाभ कर आकारला जाईल. बँकेतील किमान शिल्लक नियमात बदलएसबीआय, पीएनबी, कॅनरा बँकेसह अनेक बँकांनी किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियम बदलले आहेत. आता, तुमच्या खात्यातील किमान शिल्लक तुमच्या क्षेत्रानुसार ठरवली जाईल आणि ती राखण्यात अयशस्वी झाल्यास दंड होऊ शकतो. विमान प्रवास स्वस्त झालाएव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती कमी झाल्या आहेत, ज्यामुळे विमान प्रवास खर्चात दिलासा मिळू शकतो. चेन्नईमध्ये एटीएफची किंमत 06,064.10ने स्वस्त झाली आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

1 एप्रिलपासून लागू होणारे 10 मोठे बदल… थेट खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सर्वकाही… Read More »

Uddhav Thackeray : ‘मला भाजपमुक्त राम हवाय, उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे मात्र त्याआधी सर्व राजकीय पक्षांकडून जोरात तयारी सुरू झाली आहे. यातच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपवर जोरदार टीका केली आहे.  उध्दव ठाकरे म्हणाले की, ‘मी कोणाच्याही विरोधात नाही. भाजपच्या लोकांनी माझे निवडणूक चिन्ह चोरले आहे. 15 लाख देण्याचे बोलले, 15 लाख कुठे गेले? ‘भाऊ-बहिण म्हणणारे कुठे आहेत? आता दिसत नाही. मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जातात. सर्व गोष्टी गुजरातला जात आहेत. इतर भिकारी आहेत, पण आम्ही भिकारी नाही. ते आम्हाला ‘लाडली बहीण योजने’ अंतर्गत फक्त 1500 रुपये देत आहेत, पण एवढ्यानेही काय होणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपमुक्त रामाची इच्छा उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आदर्श घोटाळा झाला आहे, पण त्यात कोणाचा हात आहे ते कोणी सांगेल का? राम मंदिर बांधण्यासाठी लोकांनी आपले रक्त दिले आहे. सामान्य लोक जय श्री राम म्हणतील आणि तुम्ही फक्त केम छो म्हणतील, पण मला भाजपमुक्त राम हवा आहे, तुम्ही काही महिने थांबा. मी याआधीही सांगितले आहे की तुम्ही किंवा मी पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम सर्व आमच्यासोबत आहे. ठाकरे म्हणाले की, ‘नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचं ऐकलं आहे, त्यामुळे ते 4 महिन्यांसाठी फक्त 1500 रुपये देत आहेत. भाजपला संपूर्ण महाराष्ट्र 1500 रुपयांना विकत घ्यायचा आहे का? ही एक योजना आहे, जे तुमचे पैसे आहेत आणि तुम्ही ते घेतलेच पाहिजे.

Uddhav Thackeray : ‘मला भाजपमुक्त राम हवाय, उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल Read More »

Sujay Vikhe News: विखेना मिळाले श्रद्धेय भगवान गडांचे आशीर्वाद

Sujay Vikhe News : अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हयातील श्रध्देय गडाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. येथे येऊन काम करण्यासाठी मोठी उर्जा मिळते. येथील प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे त्यांनी सांगितले.   खा. सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी त्यांच्या भेटी वाढल्या आहेत. गावोगावी लोकांना भेटून महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत केलेल्या लोककल्याणकारी कामांची माहिती लोकांना देत आहेत.  देशात सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी, ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासासाठी आणि देशासाठी आवश्यक असून येणाऱ्या काळात देशाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व असून देश त्यांच्या हाती सुरक्षित असल्याने लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन ते नागरिकांना करत आहेत.  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ डॉ. सुजय विखे पाटील यांनी भगवान गड परिसरातील गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्या सोबत आमदार मोनिका राजळे आणि इतर कार्यकर्ते होते. यावेळी डॉ. विखे यांनी भगवान बाबांच्या समाधीला अभिवादन करत महंत शास्त्री महाराज यांचे आशिर्वाद घेतले. तसेच गड परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला.  तर ग्रामस्थांनी देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द यावेळी दिला. खरवंडी, दैत्य नांदूर, टाकळी,पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी सुजय विखे पाटील यांचे वाजतगाजत भव्य स्वागत केले. यावेळी संवाद साधताना ते म्हणाले की प्रथा, परंपरे प्रमाणे मी गडावर आलो आहे, शास्त्री महाराजांनी मला आशीर्वाद दिला आहे, भगवानगडाच्या परिसराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कटीबद्ध राहू असा देखील विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. तसेच भगवानगड हे महाराष्ट्रातील प्रमुख अध्यात्मिक केंद्र असून त्याचा पर्यटन क्षेत्र म्हणुन विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करत त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणार असे त्यांनी सांगितले.  तसेच संत ज्ञानेश्वरांच्या मंदिराचे काम पुर्ण केले जाईल. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगारासाठी पाऊले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.  स्थानिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी सुद्धा मार्गदशन केले. मोनिकाताईंनी सांगितले की, मागील पाच वर्षात डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्याचे विविध प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळऊन विविध विकास कामे केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांना साथ मिळाल्याने येणाऱ्या काळात डॉ. विखे जिल्ह्याच्या विकास अधिक जलद गतीने करतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.   मनसेचे नेते देविदास खेडकर यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी पाथर्डी शेवगावमतदारसंघातीलअनेक गावातील सरपंच,उपसरपंच, आजी-माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujay Vikhe News: विखेना मिळाले श्रद्धेय भगवान गडांचे आशीर्वाद Read More »

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध

Modi Government:  पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळवून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाचेआयोजन बेलवंडी येथे करण्यात आले होते. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, अण्णासाहेब शेलार व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडे चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते. पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत. व्यवसाय, शिक्षण, मनोरंजनापासून ते आयटी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिलांना बळ देण्याचे सर्वाधिक  काम मोदी सरकारच्या काळात झाले असल्याचे खा. विखे पाटील म्हणाले.  मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यामातून लाखो महिला स्वयंरोगारात आल्या, सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केले.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली.हिला शक्ती केंद्र योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना,लखपती दीदी योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे मागील १० वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वाधिक महिला विकासाच्या योजना राबवत देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले. यामुळे यावेळी सुद्धा महिलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंसती आहे. पुन्हा देशात मोदी सरकार येईल आणि आतापर्यंत ज्या पध्ततीने महिलांचा विकास झाला त्याहुन अधिक गतीने महिलांचा विकास होईल असा विश्वास खा. विखे यांनी बोलून दाखवला.   जिल्ह्यात महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार, महिला बचत गटाच्या माध्यातून जिल्ह्यातील महिलांना स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यात महिलांसाठी विविध माध्यमातून रोजगार उभा करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी असेलेल्या योजना प्रत्येक लाभार्थांपर्यंत पोहचविल्या जातील. असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध Read More »

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे

Sujay Vikhe News :- अहमदनगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती गावोवावी पोहचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लावला आहे.  सदरची निवडणूक ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी खरवंडी कासार येथील बूथ कमिटी सभेत केले.   डॉ. सुजय विखे पाटील हे  विद्यमान खासदार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून  त्यांनी आपल्या  प्रचाराचा सपाटा लावला आहे. गावोवावी जाऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी मतदार संघातील  सर्व तालुकास्तरावरील बूथ कमिटीच्या बैठका घेणे, कार्यकर्ता मेळावे घेणे, घटक पक्षांच्या सभा घेण्याचे काम ते साध्य करत आहेत. अशीच बूथ कमिटीची बैठक खरवंडी कासार येथे शुक्रवारी बोलावण्यात आली होती.  यावेळी सुजय विखे यांनी महाविकास आधाडीवर निशाणा साधताना  तीन वर्षांच्या काळात तालुक्याला एक रुपयांचा सुद्धा निधी दिला नसल्याचा आरोप व्यक्त केला. तर दुसरीकडे महायुतीच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन निधी दिला आहे. यामुळे जर देशाचा आणि जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त देशाला दुसरा पर्याय नाही. म्हणून ही निवडणूक महत्वाची असून त्यासाठी आपण मतदान केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मी फक्त विकासावर मत मागत असून मी फक्त आपल्याला विकास देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. या सभेला आमदार मोनिका राजळे यांच्यासह मालेवाडी संघ, मिडसंघ, मुंगूसवाड, ढगेवाडी, काठेवाडी,बिडसंगावी,धाकनवाडी, दैत्य नांदूर, भारजवाडी,तुळजवाडी या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि सर्व बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे Read More »