Pratap Sarnaik : एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध होणार कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चार दिवसापूर्वी अचानकपणे परळ बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी चालक -वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. तसेच काही कर्मचारी मद्यपान केल्याचे देखील आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारात कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ आणलायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. […]









