DNA मराठी

Maharashtra Politics

sanjay kumar

Sanjay Kumar : CSDS चे संजय कुमार यांच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Sanjay Kumar: निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे प्राध्यापक संजय कुमार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल चुकीची आकडेवारी दिल्याने त्यांच्याविरुद्ध नागपूरनंतर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर मतदारांचा डेटा शेअर करताना खोटी विधाने केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी नागपूर जिल्ह्यात आणि नाशिकमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संजय कुमार यांच्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्य विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर मतदारांची संख्या प्रचंड घटली आहे. या दोन्ही निवडणुका सुमारे सहा महिन्यांच्या अंतराने घेण्यात आल्या. नंतर त्यांनी मंगळवारी ही पोस्ट हटवली आणि दुसऱ्या पोस्टमध्ये चुकीचा डेटा पोस्ट केल्याबद्दल माफी मागितली. नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या तहसीलदारांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येतील फरकाबाबत केलेल्या दाव्याबाबत तक्रार दाखल केली आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 175 (निवडणुकीसंदर्भात खोटे विधान), 353 (1) ब (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने), 212 (सार्वजनिक सेवकाला खोटी माहिती देणे) आणि 340 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या नायब-तहसीलदारांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजीच्या पोस्टमध्ये नमूद केले होते की (2024) लोकसभा निवडणुकीदरम्यान देवळाली मतदारसंघात मतदारांची संख्या 4,56,072 होती, तर प्रत्यक्षात मतदारांची संख्या 2,76,902 होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, संजय कुमार यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देवळालीतील मतदारांची संख्या 2,22,141 असल्याचे कथितपणे सांगितले होते, जे दिशाभूल करणारे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीशी संबंधित दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल बीएनएसच्या संबंधित कलमांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Kumar : CSDS चे संजय कुमार यांच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये गुन्हा दाखल Read More »

jalna rainfall subsidy scam

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

Jalna Rainfall Subsidy Scam : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अंबड पोलीस ठाण्यात 28 जणांविरुद्ध बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी परस्पर हडप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तावेज तयार करून शासकीय निधीचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीसमोर आली आहे. तर दुसरीकडे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणं बाकी आहे. प्रकरण काय? आरोपींनी 2022 ते 2024 दरम्यान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य सरकार कडून आलेला 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी बोगस खात्यात वळवून हडप केल्याचं चौकशी समितीच्या चौकशीत उघड झालंय. दरम्यान आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे गणेश ऋषींदर मिसाळ कैलास शिवाजीराव घारे विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर बाळु लिंबाजी सानप पवनसिंग हिरालाल सुलाने शिवाजी श्रीधर ढालके कल्याणसिंग अमरसिंग बमनावत सुनिल रामकृष्ण सोरमारे मोहित दत्तात्रय गोषिक चंद्रकांत तुकाराम खिल्लारे रामेश्वर नाना जाधव डिगंबर गंगाराम कुरेवाड किरण रविंद्रकुमार जाधव रमेश लक्ष्मण कांबळे सुकन्या श्रीकृष्णा गवते कृष्णा दत्ता मुजगुले विजय हनुमंत जोगदंड निवास बाबुसिंग जाधव विनोद जयराम ठाकरे प्रविण भाऊसाहेब शिनगारे बप्पासाहेब रखमाजी भुसारे सुरज गोरख बिक्कड सुशिल दिनकर जाधव (सहायक महसूल अधिकारी) वैभव विश्वंभरराव आडगांवकर (नेटवर्क इंजिनियर) विजय निवृत्ती भांडवले (तत्कालिन संगणक परिचालक) रामेश्वर गणेश बारहाते (महसूल सेवक) आशिष प्रमोदकुमार पैठणकर (सहायक महसूल अधिकारी) दिनेश बेराड (सहायक महसूल अधिकारी)

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल Read More »

mbbs

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका

Maharashtra Government : महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील निजी अनएडेड (Unaided) मेडिकल महाविद्यालयांमधील MBBS प्रवेशासाठी राखीव जागांचे प्रमाण 50 टक्क्यांवरून थेट 25 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या मुळे विध्यार्थी आक्रमक झाले आहे. या मुळे आरक्षणातील कपातीमुळे एकूण 766 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी हुकणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी संघटनांनी केला आहे. याबाबत डॉ. सिद्धांत भारणे यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देत म्हटले की, “हा निर्णय पूर्णपणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून हे एक नियोजित षडयंत्र असल्यचे बोलले आहे” राज्यातील विविध भागातील विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध सुरू केला आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबईसह अनेक शहरांमध्ये आंदोलने होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांना या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पूर्वी 50 टक्के आरक्षणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात आपला वाटा निश्चित करता येत होता. मात्र आता तो हिस्सा अर्ध्यावर आल्याने सामाजिक समतेच्या तत्त्वाला धक्का बसल्याची टीका होत आहे. आधीच महागडी फी व आर्थिक अडचणींच्या कचाट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हा निर्णय सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते, परंतु यामागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयाने आता राजकीय वादाला देखील तोंड फुटले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवला असून, “शैक्षणिक संधी कमी करून सामाजिक न्यायाचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका Read More »

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट?

Pune Crime : मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप तीन मुलींनी कोथरूड पोलिसांवर केला होता. तर आता या प्रकरणात श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं यामुळे या मुलीने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एकीकडे या मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे रोहित पवार, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे राजकीय नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Pune Crime: सरकारी कामात अडथळा, तीन मुलींविरोधात गुन्हा दाखल पण राजकीय नेत्यांना सूट? Read More »

मराठवाडा-विदर्भात शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तात्काळ मदतीची Vijay Wadettiwar यांची मागणी

Vijay Wadettiwar : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, “ज्वारी, कपाशी, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पशुधनाचाही फटका बसला आहे. अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात हजारो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळच्या अतिवृष्टीचे नुकसानभरपाईचे पैसे अजून मिळाले नाहीत, त्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांचे हातचे पिक हिरावून घेतले आहे.” ते पुढे म्हणाले की, “एकीकडे सरकार कर्ज काढत आहे, मग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लागेल तर अजून कर्ज काढावे, पण शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे.” शिवभोजन थाळी व अन्य योजना रखडल्या राज्यात शिवभोजन थाळी या योजनेचे सात महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत, ही योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. “गरीबांसाठीच्या योजना बंद केल्या जात आहेत. ज्यांनी मेहनत केली त्यांचे पैसे रोखून ठेवले आहेत. सरकार त्यांच्या आत्महत्येची वाट पाहत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगावरही टीका पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. “देशात मतचोरी सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुरावे दिल्यानंतर आयोगाने पत्रकार परिषद घेतली, पण प्रश्नांना उत्तर दिले नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सीसीटीव्ही फुटेज मागितले, अनेक पत्रे लिहिली, तरी आयोगाने उत्तर दिले नाही. उलट राहुल गांधी यांच्याकडून पुरावे मागणे हे गजब आहे. निवडणूक आयोग स्वायत्त राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी स्पष्ट केले की, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल ते “माफी मागणार नाहीत.”

मराठवाडा-विदर्भात शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तात्काळ मदतीची Vijay Wadettiwar यांची मागणी Read More »

bachu kadu

Bachu Kadu : जय श्री राम बोलून निवडणूक जिंकता येते; बच्चू कडूंचा महायुतीला टोला

Bachu Kadu : आगामी निवडणुका म्हणून नाही, तर आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. ते पुढे कस न्यायचे हे डोक्यात आहे. आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे. ते व्यवस्थित वेगळ्या ताकतीने घेऊन जायचे आहे. सरकारला कर्जमाफी आणि इतर मेंढपाळ आणि मच्छीमार संघटनेच्या मागण्या आहेत. अशी टीका बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू राज्य सरकार वर हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता पुन्हा एका बच्चू कडू यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आगामी निवडणुका म्हणून नाही, तर आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. ते पुढे कस न्यायचे हे डोक्यात आहे. आता आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे. ते व्यवस्थित वेगळ्या ताकतीने घेऊन जायचे आहे. सरकारला कर्जमाफी आणि इतर मेंढपाळ आणि मच्छीमार संघटनेच्या मागण्या आहेत. ते पूर्ण करण्यासाठी बाध्य करतील अशी रचना करत आहोत. निवडणुकीच्या काय जास्त मेहनीत करण्याची गरज नाही. EVM मशीन आहेच, काय ठप्पे मारायचे ते मारायचे. उभे रहायचे काय नाही ते ठरवावे लागेल. सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. अनेक जन फोन येतात कशाला उभ राहता तुमच्या विरोधातच मतदान पडणारच आहे. त्यामुळे भाजपच्याच कार्यालयात 10 दिवसाचा गणपती बसवणार आहे.

Bachu Kadu : जय श्री राम बोलून निवडणूक जिंकता येते; बच्चू कडूंचा महायुतीला टोला Read More »

manoj jarange

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील

मुंबई | प्रतिनिधी – Manoj Jarang – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी लढ्याची हाक दिली आहे. येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जरांगे राज्यभर दौरे करून बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र काल नांदेडमध्ये दौऱ्यादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने क्षणभर गोंधळ उडाला होता. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “सकाळपासून सलग बैठका सुरू होत्या. घाम आला, चक्कर आली. सतत उपोषण आणि उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा वाढला आहे. शरीर झिजले, यात वेदना आहेत. तरीही मी हटणार नाही. समाजाच्या भवितव्यासाठी हा लढा आहे. माझ्या वेदना मी समाजापुढे मांडत नाही.” आपल्या निर्धाराबद्दल बोलताना ते म्हणाले, “मला समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. काहीही झालं तरी २९ तारखेची लढाई मी लढणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. थकलो तरी जाणार, माझ्या शरीराला किंमत नाही. मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.” २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत ते पुढे म्हणाले, “मी निघालो की सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल. त्या दिवशी कुणीही घरात राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, आतापर्यंतच्या आंदोलनांपेक्षा पाचपट जास्त. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांच्या ताकदीसमोर टिकू शकणार नाही.” मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसतानाच जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील Read More »

job

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत

Maharashtra Police: नोकरीच्या पदावर कायम राहताना, महाविद्यालयात जाऊन पूर्णवेळ (फुलटाईम) शिक्षण घेतल्याचे खोटे दाखले सादर करून पदोन्नती व वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने चांगलीच नजर रोखली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयातून नुकताच जारी झालेला आदेश व्हायरलं झाला असून कर्मचाऱ्यांना थेट इशारा देणारा ठरला आहे. व्हायरल झालेला वाहतूक विभागाच्या परिपत्रका नुसार , चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध पदांवरील काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता मिळवताना नियम धाब्यावर बसवले. नियमानुसार, पूर्णवेळ शिक्षण घेण्यासाठी नोकरीवरून सुटी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांनी नोकरी करतानाच फुलटाईम पदवी घेतल्याचे दाखवून लाभ मिळवला. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, नियुक्ती प्रक्रियेनंतर घेतलेली पदवी नियमबाह्य पद्धतीने मिळवलेली असल्यास ती वैध मानली जाणार नाही. तसेच अशा शिक्षणावर आधारित पदोन्नती, वेतनवाढ किंवा अन्य लाभ तत्काळ रद्द केले जातील. अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात आले आहे की, संशयास्पद प्रमाणपत्रांसह पदोन्नतीसाठी अर्ज आले तर त्यांची काटेकोर चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. यामुळे बनावट शैक्षणिक दाखल्यांच्या बळावर गोडीगुलाबीने पदोन्नती मिळवणाऱ्यांचे दिवस आता मोजकेच उरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या हालचालीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, ‘कोणाच्या गळ्यात कारवाईची घंटा वाजणार?’ हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेत आहे.

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत Read More »

harshvardhan sapkal dna

‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभा करा; हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, वन नेशन वन लिडर संकल्पना आणून एकच नेता, एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता 15 ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे. कबुतरांसाठी लोढा-अदानींनी विशेष टॉवर बांधावे कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे तसाच माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. कबुतरांचे पंख व विष्टेपासून फुप्फुसाचे गंभीर आजार होतात यात काहीजणांना जीवही गमवावा लागतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे, पण भाजपा सरकारने जाणीव पूर्वक कबुतर जिहाद सुरु केला आहे. सरकारने अदानीला अर्धी मुंबई देऊन टाकली आहे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले. भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही. NSUI च्या नवनियुक्त अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत NSUI चे नवनियुक्त महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुखे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवनात पार पडला. मावळते अध्यक्ष आमीर शेख यांनी अध्यक्षपदाची सुत्रे साळुंके यांच्या हाती दिली. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी, माजी अध्यक्ष अमीर शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाच्या लेनी जाधव वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभा करा; हर्षवर्धन सपकाळ Read More »

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »