DNA मराठी

Maharashtra Politics

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका

Ram Shinde on Rohit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्ष पदी विजय मिळवला आहे. या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे, नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे. अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच महाविकास आघाडीला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच देखील त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी करत तब्बल 123 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राहिला आहे. तर काँग्रेसने देखील विदर्भात चांगली कामगिरी करत भाजपला रोखण्याचे प्रयत्न केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत काही खास करता आलेला नाही. जामखेड नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील 2 जागा मिळवल्या आहे.

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका Read More »

kopargaon election

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

Kopargaon Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे आज नगरपालिका व नगरपंचायत व नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. मतदान केंद्रावरच कार्यकर्ते भिडल्याने एकच गोंधळ उडाला मात्र तातडीने प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद सोडवला असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतच्या अध्यक्ष व सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा , नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान कोपरगावमध्ये दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे नेमकं काय घडलं? माहितीनुसार, नगर परिषदेच्या निवडणुकीचे साठी आज कोपरगावात मतदान प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट युतीमधीलच घटक पक्षांमध्ये सामना पाहायला मिळत आहे मात्र मतदानापूर्वीच दोनही पक्षातील कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेरच एकमेकांशी भिडले. एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपचे लोक मतदारांवर ती दबाव आणतायेत की भाजपला मतदान करा असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून हाकलून लावले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे काळे कोल्हे संघर्ष कोपरगावमध्ये काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाला यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयते तर विवेक कोल्हेगाटाकडून परागसंधान यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे कुठेतरी काळे कोल्हे संघर्ष पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळणार हे नक्की होते. दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणी ही जोरदार पाहायला मिळाली आज मतदानाच्या दिवशी सकाळीच एका मतदान केंद्रावर काळे व कोल्हे गट एकमेकांशी भिडले प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणारे यामुळे निकालापूर्वीच या ठिकाणचे राजकारण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील आता चांगला संघर्ष पाहायला मिळतोय.

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी

Prajakt Tanpure : बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीसाठी किमान १२ तास दिवसा वीज द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात व विशेषतः राहुरी तालुक्यात, शहरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरु झाल्याने शेतकरी, नागरिक, स्त्री शाळकरी मुले, यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात महावितरण कडून शेतकऱ्यांना दिवस व रात्री अशा दोन्ही वेळेस कधी रात्री तर कधी दिवसा अश्या शिफ्टमध्ये वीजपुरवठा केला जात आहे. सद्या शेतीमध्ये गहू, हरभरा,ऊस तसेच इतर पिकांची लागवड सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. मात्र सर्वत्र बिबट्यांचा वाढता संचार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने किमान १२ तास तरी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. ऊर्जा राज्यमंत्री असताना मा. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातच नव्हे तर राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी १२ तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. व अडीच वर्ष राज्यमंत्री असताना त्यांनी आणि दूरदृष्टी समोर ठेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले. सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात प्रतिनिधिक स्वरूपात काही गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले त्यात तालुक्यात बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी या गावात हे प्रकल्प कार्यान्वितही झाल्याने त्याभागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली त्याचबरोबर मतदारसंघात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ होत आहे. रात्रीच्या अंधारात शेतीकाम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला धोका असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण, पिके आणि शेती उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी Read More »

maharashtra government

Maharashtra Government: उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Government: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी निवडणूक अधिनियम, 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश देखील काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबध्द रितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम 14 मध्ये, पोट-कलम (2) अंतर्गत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील, तसेच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, 2025 काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. तर दुसरीकडे गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या यापुर्वीच्या (दि. 20 जानेवारी 2025) शासन निर्णयातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबतच्या तरतूदींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये आता राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व गड-किल्ले तसेच राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी व भविष्यातील अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. समितीचे सांस्कृतिक कार्य मंत्री अध्यक्ष असतील. तर समितीमध्ये महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, वन मंत्री, बंदरे व विकास मंत्री तसेच संबंधित विभागांचे सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव यांचा समावेश असणार आहे. राज्यस्तरीय समितीमध्ये चार निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यास तसेच प्रत्येक जिल्ह्यात गठीत करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे अशासकीय सदस्य गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांचे अभ्यासक असावेत किंवा संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे रोखणे व ती काढून टाकण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी यांना त्या-त्या जमिनीच्या मालकीच्या विभागाच्या समन्वयाने करावी लागणार आहे. तसेच यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधीमधून करता येणार आहे.

Maharashtra Government: उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

ram sutar

Eknath Shinde on Ram Sutar Death : ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड

Eknath Shinde on Ram Sutar Death : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या कलेला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवले. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी झालेली त्यांची भेट शेवटची ठरली, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे. नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अनेक अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यात जिवंत राहतील. वयाच्या 101 व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी नवीन पिढीतील हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde on Ram Sutar Death : ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड Read More »

pradnya satav

Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला

Pradnya Satav : राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 जानेवारी रोजी 29 महानगर पालिकांसाठी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच प्रत्येक पक्ष कामाला लागलं असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार आणि दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव काँग्रेसला रामराम करत पक्षाची साथ सोडणार आहे. आमदार प्रज्ञा सातव 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. आमदार प्रज्ञा सातव 2021 पासून काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या आमदार आहे. पक्षात सुरू असणाऱ्या गटबाजीच्या राजकारणामुळे प्रज्ञा सातव पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हिंगोलीचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारीपैकी एक मानले जात होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा हा मोठा धक्का मानला जात आहे.

Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला Read More »

uddhav thackeray and eknath shinde

Eknath Shinde on Uddhav Thackeray: तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला

Eknath Shinde on Uddhav Thackeray: नागपूर येथे 8 डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू ठेवला असून विरोधकांना मात्र बिनबुडाचे आरोप करण्यावाचून काहीही काम शिल्लक राहिलेले नाही असे सांगितले. काही जण अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ.. असे वागत आहेत..फक्त पर्यटनासाठी नागपुरात येतात, ते आले पण अधिवेशात एकही प्रश्न विचारला नाही, एकाही विषयावर सभागृहात बोलले नाहीत, त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी ते किती जागरूक आहेत तेच यातून दिसून आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकांचे प्रश्न सोडून फक्त विरोधी पक्षनेतेपद द्या यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र विरोधी पक्षनेता होण्यासाठी निदान तेवढे उमेदवार निवडून यावे लागतात तुम्हाला जनतेनेच विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी करत त्यांनी माध्यमांमध्ये आदळ आपट केली, मात्र स्वतः मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ठेवले होते याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडला असे सांगितले. माझ्याविषयी असलेल्या मळमळ आणि जळजळ यातूनच हे आरोप होत असल्याचे आवर्जून नमूद केले. मुंबईकरांसाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले, मुंबईतील ओसी नसलेल्या 20 हजार इमारतींना दिलासा दिला, मुंबईला पागडीमुक्त करण्याचा निर्णय घेतला, त्यातून 13 हजार इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. नॅशनल पार्क मधील 25 हजार कर्मचाऱ्यांना 5 किमी परिसरात पर्यायी घरे देण्याची योजना आणली, मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमावलीमध्ये बदल केले, सिडकोचा घरांच्या किंमती कमी करून 10 टक्क्यांनी या किंमती कमी केल्या, 50 एकरापेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात 17 प्रकल्पांची निवड केली आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा असे अनेक निर्णय घेतले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 40 लक्ष झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत असे सांगितले. या निर्णयाद्वारे 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या योजना सुरू करून आम्ही त्यांच्या चरणी ही योजनापुष्पे वाहिली आहेत असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र एवढी वर्षे मुंबईत ज्यांची सत्ता होती त्यांनी नक्की काय केले..? मुंबई तोडणार तोडणार एवढेच तुणतुणे कायम वाजवले. मिठी असो वा कोविड कुठेही डाका टाकायचे सोडले नाही. तिजोरीला वेटोळे घालून प्रत्येक कामात घोटाळे करण्याचे काम केले. त्यामुळे मुंबईच्या तिजोरीवर डाका घालून स्वतःची तिजोरी भरणारा खरा रेहमान डकैत कोण आहे..? ते लोकांसमोर यायला हवे. अशा रेहमान डकैतना पाणी पाजणारी ‘धुरंधर’ महायुतीच असेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde on Uddhav Thackeray: तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: उत्खनन गैरव्यवहार प्रकरण, चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी मावळ येथील उत्खनन गैरव्यवहाराबाबत आज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून, अधिकारी आठ महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न महसूल मंत्र्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी दोनदा चौकशी केली. गट क्रमांक ३६, ३७, आणि ३८ मध्ये खाणपट्टे मंजूर होते, मात्र ३५, ४१, ४२, आणि ४६ या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचे उत्खनन झाले आहे. परवानगीपेक्षा जादा उत्खनन ईटीएस मोजणीमध्ये ३ लाख ६३ हजार ब्रासची परवानगी असताना तब्बल ४ लाख ५४ हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. म्हणजेच, ९० हजार ब्रास जास्तीचे उत्खनन झाले आहे. निलंबित अधिकाऱ्यांची नावे गैरव्यवहारात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तलाठी (२): दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार. मंडळ अधिकारी (४): संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम. तहसीलदार (४): जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख. (या काळात कार्यरत असलेले चार तहसीलदार.) दंड आणि महसूली कारवाई ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय चौकशी निलंबित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आगामी अधिवेशनात पटलावर ठेवला जाईल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule: उत्खनन गैरव्यवहार प्रकरण, चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: केंद्र शासनाने देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्य शासनाने राबविलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातून नक्षलवाद संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी अति दुर्गम भागात पोलीस चौकी सुरू कराव्यात. सर्व पोलीस चौकीमध्ये आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून सर्व सुविधा देण्यात याव्यात. नक्षलवाद मुक्त झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पोलीस चौकी झालेल्या ठिकाणी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा कार्यक्रमांमध्ये शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना देण्यात यावा. येथील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसुत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तर गठीत समितीची आढावा बैठक विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण पोलिसांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.  जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करून नक्षल चळवळ मोडीत काढण्यासाठी पुढे आलेल्या गडचिरोली पोलिसांना एक कोटी रुपये बक्षीस देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. नक्षल चळवळीचा बिमोड करण्यासाठी चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. मंत्रालय स्तरावर गडचिरोली जिल्ह्यातील कुठलाही विषय आल्यास नियमानुसार त्याला प्राधान्याने पूर्णत्वास न्यावे. गडचिरोली येथे नवीन पोलीस अधीक्षक इमारतीचे काम सुरू करावे. या इमारतीसाठी निधी उपलब्धता करून देण्यात येईल. तसेच पोलीस दलात 33 नवीन वाहनांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, अप्पर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष) शीरिंग दोरजे, केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अतिरिक्त महासंचालक अजय शर्मा आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस उप महानिरीक्षक अंकित गोयल यांनी बैठकीत सादरीकरण केले. नक्षलवाद्यांनी आनंद साजरा केलेल्या ठिकाणीच पोलीस चौकीची निर्मिती 8 ऑक्टोंबर 2009 मध्ये भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 पोलीस जवान शहीद झाले होते. यानंतर नक्षलवाद्यांनी आनंद उत्सव साजरा केला, नक्षल्यांनी आनंद उत्सव साजरा केलेल्या ठिकाणीच पोलिसांनी नवीन पोलीस चौकीची निर्मिती केली आहे. यामुळे या भागात नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे. नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

Devendra Fadnavis: महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

devendra fadnavis

Maharashtra Government: महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत मंजूर

Maharashtra Government: महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2025 दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केला होता. त्यानंतर तो राष्ट्रपतींच्या परवानगीकरिता केंद्र सरकारकडे पाठवला होता. आपण एक क्रांतिकारी अधिनयम तयार केला होता ज्यामध्ये लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत एक लोकायुक्त, एक अध्यक्ष आणि चार सदस्य अशी व्यवस्था आपण केली होती. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्तांच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय आपण घेतला होता. या कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे. परंतू, त्यांनी यात दोन-तीन सुधारणा सुचवल्या आहेत. या कायद्याची नियुक्त तारीख निश्चित करण्याआधी लोकायुक्तांची नियुक्ती तारीख घोषीत करा, त्यानुसार लोकायुक्त निवडा आणि मग कायदा अस्तित्वात आणा, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आधी निवड प्रक्रिया होईल आणि त्यानंतर ती संस्था अस्तित्वात येईल. आपण कायदा केला तेव्हा केंद्रीय कायदे झाले नव्हते. त्यामुळे आपल्या कायद्यात जुन्या केंद्रीय कायद्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे आता तीन कायद्याच्या नवीन स्वरुपात नावात बदल करतो आहोत. केंद्राने केलेल्या कायद्यातील एखाद्या प्राधिकरणावर राज्य सरकारने अधिकारी नेमला असल्यास तो लोकायुक्तांच्या अखत्यारित येईल आणि लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकतील. असे तीन बदल करून हा कायदा अस्तित्वात आणण्यास राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra Government: महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत मंजूर Read More »