DNA मराठी

Maharashtra Budget session

mla kashinath date

Kashinath Date : ड्रग्स माफियांविरोधात आमदार दाते आक्रमक

Kashinath Date : पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी राज्याच्या अधिवेशनात पुन्हा एकदा जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय सभागृहात मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्यात विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मॅफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीबाबत त्यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती सभागृहात दिली. आमदार दाते यांनी विचारलेल्या प्रश्नात पुणे जिल्ह्यातील शिरूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदे व पारनेर परिसरात एमडी या अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विशेष म्हणजे या प्रकरणात काही पोलिस कर्मचारीही सहभागी असल्याचे तपासातून समोर आले असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित करून शासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी शिरूर परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीकडून १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा सुमारे २ कोटी १० लाख रुपये किमतीचा मॅफेड्रोन (एमडी) जप्त केला आहे. पुढील तपासात हा अंमली पदार्थ पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील व्यक्तीकडून विक्रीसाठी घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधितांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्याने यापूर्वी जप्त केलेल्या मुद्देमालातील अंमली पदार्थ काढून त्याऐवजी मैदा भरल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सध्या या गुन्ह्यातील पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. राज्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) स्थापन करण्यात आली आहे. सन २०२५ मध्ये राज्यात १३४०.४१ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ५२३.१७ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. पारनेर नगर मतदारसंघासाठी बजेटच्या माध्यमातून ४१ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला आहे, जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्नही विधानसभेत प्रभावीपणे मांडुन, विकासकामांसोबतच समाजातील तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचविण्याचा ठाम प्रयत्न सातत्याने करत आहे, तपासादरम्यान आणखी मोठा साठा उघडकीस आला असून पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे ९ किलो ६५५ ग्रॅम वजनाचा सुमारे १९ कोटी ३१ लाख रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा सहभागही निष्पन्न झाला आहे अस आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

Kashinath Date : ड्रग्स माफियांविरोधात आमदार दाते आक्रमक Read More »

Jayant Patil : निवडणूक डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून लढले पण… जयंत पाटलांची राज्य सरकारवर सडकून टीका

Jayant Patil: सरकार सगळ्या निवडणूक डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून लढवते. पण वस्तूस्थिती काय तर यांचे मेन इंजिनच फेल होत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सरकार सगळ्या निवडणूक डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून लढवते. पण वस्तूस्थिती काय तर यांचे मेन इंजिनच फेल होत आहे. केंद्र सरकारने जे बजेट एस्टीमेट दिले होते, त्यात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. आपल्या बजेटमध्ये देखील 20 टक्के हिस्सा केंद्र शासनाकडून येणे अपेक्षित आहे. केंद्र शासनाने मागच्या वर्षी आणि यावर्षी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणत कपात केली आहे. यासाठी मी केंद्र शासनाचा नियतव्ययच घेउन आलो आहे. सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देणार असे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितले होते, पण वस्तुस्थिती काय तर 2021 ते 2026 या कालावधीत मंजूर घरांपैकी फक्त 12.8% पूर्ण झाली आहेत आता केंद्र सरकारकडून पण या योजनेच्या निधी मध्ये मोठ्याप्रमाणात कपात करण्यात आली आहे. मागच्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजना शहरी 3500 कोटी रु. अर्थसंकल्पिय तरतूद होती ती Revised Estimate मध्ये 300 तर ग्रामिणची 54,832 कोटी तरतूद 32500 कोटी केली आहे असं जयंत पाटील म्हणाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, केंद्राचे जलजीवन मिशनचे 2025-26 मध्ये 67 हजार कोटीचे बजेट एस्टीमेट होते आणि revised estimate 17 हजार कोटीचे केले आहे. म्हणजे डायरेक्ट 50 हजार कोटींची कपात आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना 19 हजार कोटीवरुन 11 हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. आमच्या गुलाबराव पाटलांनी त्या दिवशी सभागृहातच कबूल केले की आम्ही काय केंद्र शासनावर अवलंबून नाही. गुलाबरावांना जे कळाले ते सरकारला पण लवकरच कळेल अशी आशा करतो असं म्हणतं त्यांनी राज्य सरकारला टोला लावला.

Jayant Patil : निवडणूक डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणून लढले पण… जयंत पाटलांची राज्य सरकारवर सडकून टीका Read More »

harshvardhan sapkal dna

Harshwardhan Sapkal: अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले; हर्षवर्धन सपकाळ सरकारवर भडकले

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विकसीत महाराष्ट्र २०४७ ची कल्पना व १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्न आहे. मागील काही वर्षात भाजपा युती सरकार अर्थसंकल्प जाहीर करते व नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचे दिसून आले आहे. राज्यावरील कर्ज व कर्जाची हमी मिळून १२ लाख कोटींच्या आसपास बोजा आहे. कर्जाच्या हप्त्यापोटी ६५ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. त्यामुळे अर्थसंकल्पातील आकडे व प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती यात प्रचंड तफावत आहे. गेल्या अर्थससंकल्पात अनुसुचित जातींच्या योजनांसाठी २२ हजार ६५८ कोटींची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात ६ हजार २०० कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या योजनांवर अर्थसंकल्पात मोठ मोठे आकडे जाहीर केले जातात पण प्रत्यक्षात ते खर्च केले जात नाहीत. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यासमोर सर्वात मोठे संकट बेरोजगारीचे असताना अर्थसंल्पात केवळ ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. आजपर्यंतच्या मेगा भरतीचा भाजपा सरकारचा इतिहास पाहता ही सुद्धा एक फसवी घोषणाच वाटते. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे सांगितले असले तरी २१०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे. सरकारने लाडक्या बहिणींची पुन्हा फसवणूक केली आहे. कर्जमाफीची घोषणा केली असली तरी फडणवीस सरकारने आधी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील लाखो शेतकरी आजही कर्जमाफीच्या लाभापासून वंचितच आहेत, हे पाहता आजच्या कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरु नये. लबाडाचे आवताण जेवल्याशिवाय खरे नाही असे या सरकारचे वागणे आहे. शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी काही घोषणा केलेल्या आहेत पण अमेरिकेसोबत केलेल्या व्यापारी करारापुढे आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटण्याचीच भिती जास्त आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यास अर्थसंकल्पातील घोषणा पुरेशा नाहीत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडूनही राज्याचे सिंचन क्षेत्र ५६ लाख हेक्टरवरून कमी होऊन ३९ लाख हेक्टरपर्यंत आले आहे. सिंचनासोबतच पेरणीयोग्य क्षेत्रातही घट झाली आहे. यावरून सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. तिसरी मुंबई, चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर हे अदानी व अंबानी यांच्या हितासाठी आहे, यातून सामान्य जनतेला काही फायदा होणार नाही. सरकारचे सौरउर्जा धोरणही फसवे आहे, त्यामुळे वीज ग्राहकांवर दिलासा नाही तर प्रति युनिट २६ पैसे अतिरिक्त भार पडणार आहे. स्मार्टमीटरमुळे अगोदरच वीजबिलात प्रचंड वाढ झालेली आहे. दावोसमधून २०२२ ते २०२५ पर्यंत ५० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा करण्यात आला पण आर्थिक पाहणी अहवालानुसार तर राज्यात फक्त ६ लाख कोटी रुपयांचीच गुंतवणूक आलेली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले; हर्षवर्धन सपकाळ सरकारवर भडकले Read More »

Vijay Wadettiwar: हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल विजय वडेट्टीवारांची सडकून टीका

Vijay Wadettiwar: विधानसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा होता, यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीका विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी टोला लगावला. या अर्थसंकल्पातील मुख्य त्रुटींवर बोट ठेवताना विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प संपूर्ण महाराष्ट्राचा नसून केवळ मुंबई आणि MMR क्षेत्रासाठी असल्यासारखा वाटतो. पुणे, ठाणे आणि मुंबईतील प्रकल्पांवरच सर्व भर देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी, विशेषतः नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांसाठी या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. सिंचन, शिक्षण आणि आरोग्य याबाबत स्पष्टता नाही, अस वडेट्टीवार म्हणाले. २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली, तेव्हा राज्यावर २ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते, पण आज हे कर्ज वाढले आहे.हे सरकार महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटत आहे. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून आर्थिक ताळमेळ पूर्णपणे कोलमडला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा याही वेळी करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. या अर्थसंकल्पातून केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींची भरभराट होणार आहे. प्रचंड कमिशन खाऊन सरकार स्वतःला मजबूत करत आहे,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकारच्या या धोरणावर उपरोधिक टिप्पणी करताना वडेट्टीवार म्हणाले, तुम्हारी बातों में ऐसे उलझे की सच समझ ना आया, चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!

Vijay Wadettiwar: हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल विजय वडेट्टीवारांची सडकून टीका Read More »

sunil tatkare

Sunil Tatkare :   अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा अर्थसंकल्प – सुनिल तटकरे

Sunil Tatkare :  यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत. २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. बळीराजाला कर्जमाफी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, सामाजिक लाभाच्या योजना, पायाभूत सुविधांचे महत्वाकांक्षी प्रकल्प, उद्योग आणि रोजगारासह जागतिक शिक्षणांच्या संधी देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे अजितदादांच्या महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा दृढ संकल्प आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. देशात विविध क्षेत्रात अव्वलस्थानी असणाऱ्या महाराष्ट्राला जगाच्या स्पर्धेत आधुनिक आणि विकसित महाराष्ट्र म्हणून ओळख देणारा अर्थसंकल्प म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याकडे पाहतो आहे. २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डाॅलर करण्याचा निर्धार आणि आत्मविश्वास या अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आला आहे ही महाराष्ट्राच्या जमेची बाजू आहे. सर्वच क्षेत्रात विकासाची झेप घेण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अजितदादांच्या अनुपस्थितीत हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली. पण, अजितदादांच्या संकल्पनेतील आणि करड्या आर्थिक शिस्तीसह महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेध घेणाऱ्या त्यांच्या दृष्टीकोनाची छाप या अर्थसंकल्पात उमटली असल्याचे समाधान आहे. या अर्थसंकल्पाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनिल तटकरे यांनी धन्यवाद दिले आहेत.

Sunil Tatkare :   अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा अर्थसंकल्प – सुनिल तटकरे Read More »

maharashtra budget session

Maharashtra Budget Session : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून; ‘या’ विषयावर होणार चर्चा

Maharashtra Budget Session : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे  कामकाज सोमवार दि.२३  फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दि. २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. दिनांक ६ मार्च २०२६  रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन येथे आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार, आमदार सर्वश्री अनिल परब, प्रसाद लाड, भास्कर जाधव, जयंत पाटील, सुनील प्रभु, भाई जगताप, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अधिवेशन काळात शनिवार दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे.सोमवार दि. २ मार्च २०२६ रोजी होळी आणि ३ मार्च २०२६ रोजी धूलिवंदन असल्याने  कामकाज होणार नाही.  दिनांक १,७,८,१४,१५,२१,२२ मार्च रोजी शासकीय सुट्टी आणि दिनांक १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तर दि.२० मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही. या अधिवेशनात यावर होणार चर्चा संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६  हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.या अधिवेशनात यावर चर्चा करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा  होणार आहे. मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होईल. निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा  निरोप समारंभ होईल.

Maharashtra Budget Session : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून; ‘या’ विषयावर होणार चर्चा Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू पण शेतकरी, बेरोजगारी अन् महागाईवर चर्चाच नाही

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या विविध चर्चा होत आहेत, परंतु त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, महागाईवर, बेरोजगारीवर आणि शहरी भागातील मुद्द्यांवर चर्चा होत नाही असा आरोप केला जात आहे. या प्रकारच्या चर्चांमुळे समाजाला काहीही घेणं-देणं नाही असे मत व्यक्त केले जात आहे. राजकारणी राजकारण करत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. विधानसभेतील चर्चा ही राजकीय भूमिकांवर आधारित असताना, त्यातून समाजाच्या मुख्य प्रश्नांवर योग्य ती चर्चा होत नाही हे एक मोठे चिंताजनक विषय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाईचा फैलाव, बेरोजगारीची वाढ आणि शहरी भागातील सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर योग्य ती चर्चा न झाल्याने नागरिकांमध्ये निराशा पसरत आहे.”राजकारणी फक्त राजकारण करतात, त्यांना समाजाच्या खर्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही,” असे एका नागरिकाने सांगितले. “आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर, महागाईवर आणि बेरोजगारीवर चर्चा करण्याची अपेक्षा करतो. परंतु त्याऐवजी राजकीय भांडणे होत आहेत,” त्यांनी नमूद केले.महत्त्व आणि परिणामया प्रकारच्या चर्चांचा परिणाम म्हणजे नागरिकांमध्ये राजकीय प्रक्रियांबद्दल निराशा निर्माण होत आहे. राजकीय नेत्यांनी समाजाच्या मुख्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, महागाईवर आणि बेरोजगारीवर योग्य ती चर्चा झाल्यास समाजातील मुख्य समस्या सोडवल्या जाऊ शकतात. संदर्भ महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या विधानसभेच्या अधिवेशनातील चर्चांवर केंद्रित आहे. या अधिवेशनात राजकीय भांडणांवर जास्त भर दिला जात असल्याचे दिसत आहे. परंतु, समाजाच्या मुख्य प्रश्नांवर चर्चा न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. या प्रश्नांवर तातडीने लक्ष दिले पाहिजे असे विचार मांडले जात आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू पण शेतकरी, बेरोजगारी अन् महागाईवर चर्चाच नाही Read More »