DNA मराठी

latest news

LPG Gas Price Hike: ग्राहकांना धक्का, व्यावसायिक LPG सिलेंडर 48.50 रुपयांनी महाग, जाणून घ्या नवीन दर

LPG Gas Price Hike: ऑक्टोबर 2024 ची आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र या महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. होय, आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे. 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 48.50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1691.50 रुपयांवरून 1740 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांच्या आधी महागडे सिलिंडर लोकांना त्रास देणार आहेत. IOCL वेबसाइटनुसार, हे दर आज 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. ऑक्टोबर 2024 पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती तेल विपणन कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत सिलेंडरची किंमत 1740 रुपये झाली आहे, जी आधी 1691 रुपये होती. कोलकातामध्ये, सिलिंडर 1850.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1802 रुपयांना मिळत होता. मुंबईत हा सिलेंडर 1692.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1644 रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये सिलिंडर 1903 रुपयांना मिळेल जे आधी 1855 रुपये होते. जुलै महिन्यापासून 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढ गेल्या जुलै 2024 पासून 19 किलो LPG सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 1 जुलै 2024 रोजी दिल्लीत या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली. पण ऑगस्ट 2024 मध्ये 19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर 8.50 रुपयांनी महागला. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत त्याची किंमत थेट 39 रुपयांनी वाढली होती.

LPG Gas Price Hike: ग्राहकांना धक्का, व्यावसायिक LPG सिलेंडर 48.50 रुपयांनी महाग, जाणून घ्या नवीन दर Read More »

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध

Gondia News :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला आदिवासींनी विरोध दर्शवला आहे.  त्यातच सोमवार 30 सप्टेंबर रोजी आदिवासी बहुल गोंदिया जिल्ह्यात हजारो आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत विशाल आक्रोश मोर्चा काढून विरोध दर्शवला. तर आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणारा नाही असा इशारा शासनाला दिला. त्यामुळे राज्य शासनापुढे आता मोठे पेच निर्माण झाले आहे. सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांकडून कडाडून विरोध केला जात आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा दिला आहे.  असे असतानाच आता आदिवासी समाजकडूनही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे.  या अनुषंगाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आदिवासी हक्क कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढत विरोध दर्शवला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आदिवासी हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध Read More »

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी

Maharashtra Election :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तसेच पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.   तर दुसरीकडे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. परवेज अशरफी यांनी लोकसभेसाठी देखील अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली.  तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे सवरक्षण करतात.  तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे.  जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको. यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल.

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी Read More »

Crime News: धक्कादायक, जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीची हत्या, 10 जणांना अटक

Crime News: झारखंडच्या सरायकेला-खरसावन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, या जिल्ह्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका जोडप्याच्या कथित हत्येप्रकरणी एका किशोरासह दहा जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. जिल्ह्यात दालभंगा चौकीच्या बिझर गावात 13 सप्टेंबरला ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कुचई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना अटक केली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून सोमा सिंग मुंडा (46) आणि त्यांची पत्नी सेजादी देवी (45) यांच्यावर गोळीबार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, सोमा सिंग मुंडा जागीच मरण पावला, तर सेजादी देवी यांना बंदुकीत बिघाड झाल्यानंतर दडक्याने मारहाण करण्यात आली. 14 वर्षाच्या मुलाने शेजाऱ्याच्या घरी आसरा घेतला अधिकाऱ्याने सांगितले की, या जोडप्याचा 14 वर्षांचा मुलगा सानिका मुंडा पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने शेजारच्या घरी आश्रय घेतला. या घटनेमागील कारणांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Crime News: धक्कादायक, जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीची हत्या, 10 जणांना अटक Read More »

2024 Maruti Suzuki Dzire ‘या’ दिवशी होणार लॉन्च, फर्स्ट क्लास फिचर्ससह मिळणार खुपकाही…

2024 Maruti Suzuki Dzire: जर तुम्ही देखील नवीन डिझायर खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. माहितीनुसार, मारूती सुझुकी आपली नवीन कार 2024 Maruti Suzuki Dzire 4 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे.   2024 Dezire ला 6-स्लॅट ग्रिल,  हेडलॅम्प आणि LED DRLs, नवीन डिझाइन केलेले बंपर आणि बरेच काही असलेला नवीन फेस मिळेल. हे हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर देखील तयार करण्यात आले असून नवीन के-सिरीज इंजिन नवीन कारमध्ये उपलब्ध होणार आहे. केबिनमध्ये मोठे बदल होणार   नवीन मारुती सुझुकी डिझायरमध्ये फुल एलईडी लाइटिंग, ORVM वरील कॅमेरा, 360 डिग्री कॅमेरा सेटअप यासारखी फीचर्स मिळू शकतात. केबिनचा फोटो अजून समोर आलेला नाही पण बदललेला डॅशबोर्ड, अपडेटेड टचस्क्रीन सिस्टीम, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स यात असणार अशी चर्चा आहे.    याशिवाय, कंपनी नवीन Dezire सह लेव्हल 2 ADAS, मानक 6 एअरबॅग्ज, हाय बीम असिस्ट, ओम्नी-डायरेक्शनल कॅमेरा, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प यांसारखी फीचर्स मिळवू शकतात.  किंमत किती असू शकते?  या कारमध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आढळू शकते जे 81 bhp पॉवर आणि 108 Nm पीक टॉर्क बनवते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असेल आणि यावेळी कंपनी ग्राहकांना ऑटोमॅटिक किंवा सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्यायही देऊ शकते.  असा अंदाज वर्तवला जात आहे की ती 6.50 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.

2024 Maruti Suzuki Dzire ‘या’ दिवशी होणार लॉन्च, फर्स्ट क्लास फिचर्ससह मिळणार खुपकाही… Read More »

iPhone 15 Pro वर 20,000 रुपयांची सूट, असा घ्या फायदा

iPhone 15 Pro Discount: काही दिवसापूर्वी iPhone 16 सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही iPhone 15 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, Flipkart बिग बिलियन डेज सेलमध्ये फक्त 89,999 रुपयांमध्ये iPhone 15 Pro विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे.  Apple इंटेलिजेंस फीचर्ससह सर्व नवीनतम Apple अपग्रेडसाठी डिव्हाइस तयार आहे. Flipkart Big Billion Days Sale सह, तुम्ही कमी किमतीत या फिचर्सचा फायदा घेऊ शकता. ई-कॉमर्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये 89,999 रुपयांमध्ये iPhone 15 Pro विकला जाणार आहे.   फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीझरनुसार, सेल दरम्यान फ्लिपकार्ट आयफोन 15 सीरीजच्या प्रत्येक मॉडेलवर प्रचंड सूट देईल. प्रो सोबतच, आयफोन 15 प्रो मॅक्स वर देखील सवलत जाहीर केली आहे. फ्लॅगशिप मॉडेलची किंमत 1,39,999 रुपयांवरून 1,09,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. Flipkart ने सांगितले की iPhone 15 Pro ची किंमत 1,19,999 रुपयांवरून 99,999 रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ 10,000 रुपयांची सूट प्रत्येकासाठी लागू आहे. तथापि, पुढील 10,000 रुपयांची सूट बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरमध्ये विभागली गेली आहे. Flipkart VIP ग्राहकांना 2,000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफ मिळेल.

iPhone 15 Pro वर 20,000 रुपयांची सूट, असा घ्या फायदा Read More »

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Akshay Shinde Encounter Case :  पोलीस एन्काऊंटरमध्ये बदलापूर घटनेचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. तर आता त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आली आहे.  रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागल्याचे आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूचे मुख्य कारण जास्त रक्तस्त्राव झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.   रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक   अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. मंगळवारी अक्षय शिंदेचे पोस्टमॉर्टम झाला, जे सुमारे सात तास चालले आणि त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले.  5 डॉक्टरांच्या समितीने अक्षय शिंदेचे शवविच्छेदन केले. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह अद्याप ताब्यात घेण्यात आलेला नाही. अक्षय शिंदे यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात येणार आहे. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधानात विसंगती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ते म्हणाल्या की, ज्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला आणि हातात हातकड्या असलेला आरोपी चालत्या वाहनात पोलीस कर्मचाऱ्याकडून पिस्तुल कसा हिसकावू शकतो. बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, खटला संपल्यानंतर आरोपींना जाहीर फाशी द्यावी, जेणेकरून समाजात मजबूत संदेश जाईल, अशी मी मागणी केली होती.  दुसरीकडे, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर कोणालाही सोडणार नसल्याचे सांगितले होते, असा दावा एका पोलिस अधिकाऱ्याने केला. आरोपीवर गोळीबार करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे म्हणाले की, अक्षयच्या वागण्यावरून तो सगळ्यांना मारेल असे वाटत होते, त्यामुळे त्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा Read More »

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा संगीताताई ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहीर ही गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबाबोब आंदोलन हे मागे घेण्यात आले.  यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ फाटे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे, लक्ष्मण बोरुडे, प्रकाश बोरुडे, राणी बोरुडे, वर्षा बोरुडे, वंदना बोरुडे, छाया बोरुडे, शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….! Read More »

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्…

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणला बसले आहेत. त्यांची तबीयत खराब होत असल्याने त्याच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मराठा समाज्याच्या कार्यत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला हार घालुन शहरात उघडलेली दुकान बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचे फुल देऊन दुकान बंद करण्याचे आव्हान करत शहरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मराठा समाज्याला आरक्षण ओबीसी कोट्यातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणला सुरूवात केली.   गेल्या सहा दिवसापासुन सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राज्यभर   बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यानी गांधीगिरी करत सुरू असलेल्या  दुकान मालकांना गुलाबाचे फुल देत दुकान बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्… Read More »

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही…

Akshay Shinde :  बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. हा एन्काउंटर कसा झाला याचा माहिती आता समोर येत आहे.  सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेते होते. त्याचे पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात हे रिमांड होते. याप्रकरणात चौकशीसाठी नेण्यात येत होते. तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होते. साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी शिंद याला मृत घोषित केलंय. तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की.

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही… Read More »