Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द
Iran Israel War : पुन्हा एकदा मध्य आशियावर युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलने शनिवारी पहाटे इराणवर हवाई हल्ले केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने इराणवर डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून आपल्या लष्करी कारवाई केली असं इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पश्चिम आशियातील इराण-समर्थित अतिरेकी गट – गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह – इस्त्रायलशी आधीच युद्धात असताना या हल्ल्यांमुळे दोन कट्टर शत्रूंमधील सर्वांगीण युद्धाचा धोका वाढतो. इराणमधील लष्करी टार्गेटवर अचूक हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने शनिवारी सांगितले. मात्र, त्यांनी यावेळी हल्ल्यांबाबत सविस्तर माहिती दिली नाही. इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी शनिवारी एका पूर्व रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, इराणची सत्ता आणि त्याचे समर्थक 7 ऑक्टोबरपासून इस्रायलवर वारंवार हल्ले करत आहेत. त्यात इराणच्या जमिनीवरून थेट हल्ले समाविष्ट आहेत. ते म्हणाले की, जगातील इतर सार्वभौम देशांप्रमाणे इस्रायललाही हा अधिकार आहे आणि उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दरम्यान, इराणच्या लष्कराने शनिवारी सकाळी सांगितले की, इस्रायलने त्यांच्या इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतातील लष्करी टार्गेटवर टार्गेट करून हल्ले केले, त्यामुळे मर्यादित नुकसान झाले. इराणच्या सशस्त्र दलाचे हे विधान सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर वाचण्यात आले, परंतु यादरम्यान हल्ल्यात झालेल्या नुकसानीशी संबंधित कोणतीही फोटो दाखवण्यात आली नाहीत. इराणच्या सैन्याने दावा केला की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ल्यांमुळे होणारे नुकसान मर्यादित केले आहे.
Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द Read More »









