DNA मराठी

latest news

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra News: नगर शहरातील कॅफे कोर्ट गल्लीत कोतवाली पोलिसांनी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालक व मालक यांचेवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डीले डायग्नोस्टीक समोर प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधारकरुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दराडे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी पंचा समक्ष पथकाने छापा टाकला. तेव्हा सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले. या कारवाईत पोलिसांनी शिवप्रसाद कुमार (वय 20 वर्ष), कॅफे मॅनेजरला ताब्यात घेतला आहे. तसेच सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव, गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले. तर दुसरीकडे सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/ सतिष शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129.131 (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय? Read More »

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Bollywood News: झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती शस्त्र, दारूगोळा, धारदार शस्त्रे, काठ्या, किंवा इतर घातक साधने बाळगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावावर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. याशिवाय, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांवरही बंदी लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Hit And Run : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात 25 नोव्हेंबर संध्याकाळी सातच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रविंद्र रमेश कानडे (वय 32, राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असं मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल Read More »

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सस्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आम्ही आम्हाला जर युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महायुती की महाविकास आघाडी कोणाला समर्थन देण्यात याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजप विरोधात प्रचार केला होता त्यामुळे निकालानंतर वंचित बहुजन आघाडी महायुतीमध्ये प्रवेश करणार का? याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं Read More »

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे 

Monika Rajale : ताजनापुर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचे निवडणूक आली आहे. निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले, काय करणार हे न सांगता, जातीपातीचे राजकारण सुरु करायचे. त्यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.    आमदार राजळे यांनी तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपुर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोर जळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे, दीपक भुसारी, बापुनाना पिसोटे, रवींद्र वायकर, आशाताई गरड, मारुती खांबट, गणेश म्हस्के, अंबिका लव्हाट, अजिंक्य लव्हाट, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना राजळे म्हणाल्या, कारखान्याला मदत हवी होती, त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापुर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला. बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामे केल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे  Read More »

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक

Maharashtra Crime News: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांचा विश्वास संपादन करून मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची शेवगाव येथे शाखा उघडून फिर्यादी व इतर लोकांचे एकुण 67,40,000 रूपये ठेवी स्विकारुन, ठेवी परत न करता स्वत:चे फायदयाकरीता वापरून फिर्यादी व इतरांची आर्थिक फसवणुक केली होती. याबाबत शेवगावमध्ये भादंवि कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गजानन उत्तमराव कोहिरे, (वय 45, रा.सुलसगाव, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), मोहन रूस्तम माघाडे, (वय 32, रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), निता मोहन माघाडे, (वय 27, रा. रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक Read More »

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

Sandeep Mitke : संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांनी नगर शहर,आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर,शिर्डी ,शेवगाव याठिकाणी कामाचा ठसा उमटविला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीचे, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच शेवगाव दंगल कौशल्याने हाताळून आरोपी जेरबंद केले.शिर्डी येथील वेश्या व्यवसाय ची पाळेमुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह गौरविण्यात आले आहे. जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना काळामध्ये संदीप मिटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शहरातील जनतेची काळजी घेतली. या काळात अनेक गोरगरीब जनतेला फूड पॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर Read More »

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे?

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सध्या ती वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. दिवाळीच्या दरम्यान तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘पुकी’ सोबतचे फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Gues the Pookie’. तिचा पुकी कोण आहे, तिचा नवरा झहीर इक्बाल किंवा तिचा नवीन गोंडस पाळीव मित्र एक मजेदार कॅप्शनसह कोण आहे हे ठरवण्यासाठी अभिनेत्रीने हे तिच्या फॉलोवर्सवर सोडले आहे. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले – गर्भधारणेबद्दल अभिनंदन! मात्र, याला जोडप्याने दुजोरा दिलेला नाही.फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा लाल रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. तर तिचा पती झहीर निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये आहे. फोटोंमध्ये दोघे हसताना दिसत आहेत आणि सोनाक्षीने तिचे पिल्लू धरले आहे. सोनाक्षीच्या सुंदर फोटोंवर तिच्या पतीने किस आणि हार्ट इमोजी दिले आहेत. 7 वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने 23 जून रोजी मुंबईत लग्न केले. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली. दोघांनीही मुंबईत रिसेप्शन दिलं, ज्यामध्ये सलमान खान, संजय लीला भन्साळी, काजोल, तब्बू, यो यो हनी सिंगसह फिल्म इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. झहीर देखील एक अभिनेता आहे आणि त्याने 2019 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. झहीरचे वडील इक्बाल रतनसी दागिने आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात आणि ते बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे बालपणीचे मित्र आहेत. यामुळेच झहीरने सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘नोटबुक’मधून सुरुवात केली. झहीरची बहीण सनम रतनसी ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. दरम्यान, सोनाक्षीच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलताना, अभिनेत्री तिच्या पतीसोबत ‘तू है मेरी किरण’ या आगामी प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करण्यास तयार आहे. याआधी सोनाक्षी आणि झहीरने ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती.

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे? Read More »

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Lahu Kanade : विधानसभा निवडणुकीसाठी आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लहू कानडे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी आमदर लहू कानडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »