DNA मराठी

latest news

prajakt tanpure

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी

Prajakt Tanpure : बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीसाठी किमान १२ तास दिवसा वीज द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात व विशेषतः राहुरी तालुक्यात, शहरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरु झाल्याने शेतकरी, नागरिक, स्त्री शाळकरी मुले, यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात महावितरण कडून शेतकऱ्यांना दिवस व रात्री अशा दोन्ही वेळेस कधी रात्री तर कधी दिवसा अश्या शिफ्टमध्ये वीजपुरवठा केला जात आहे. सद्या शेतीमध्ये गहू, हरभरा,ऊस तसेच इतर पिकांची लागवड सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. मात्र सर्वत्र बिबट्यांचा वाढता संचार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने किमान १२ तास तरी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. ऊर्जा राज्यमंत्री असताना मा. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातच नव्हे तर राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी १२ तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. व अडीच वर्ष राज्यमंत्री असताना त्यांनी आणि दूरदृष्टी समोर ठेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले. सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात प्रतिनिधिक स्वरूपात काही गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले त्यात तालुक्यात बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी या गावात हे प्रकल्प कार्यान्वितही झाल्याने त्याभागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली त्याचबरोबर मतदारसंघात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ होत आहे. रात्रीच्या अंधारात शेतीकाम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला धोका असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण, पिके आणि शेती उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी Read More »

crime

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार

Dhule Crime : आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिढीत महिला सोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार Read More »

dhananjay munde on manoj jarang

Dhananjay Munde : माझी अन् जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Dhananjay Munde on Manoj Jarang : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता असा धक्कादायक खुलासा केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देत आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा.. नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे परळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी कधीही जात पाहून राजकारण केलेले नाही. गेले 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. परळीत आंदोलन झालं, त्याला जागा देण्यासाठी मी जरांगेंना मदत केली. मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवला, असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा, असे मनोज जरांगेंना वाटते. मी 17 तारखेच्या सभेत त्यांना दोनच प्रश्न विचारले होते. त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही. मराठा समाजाला खरंच ओबीसी की EWS मध्ये जाऊन फायदा आहे का? यावर उत्तर द्या असं धनंजय मुंडे म्हणाले. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा. आमची नार्को टेस्ट करा. सर्व प्रकरणाची चौकशी सरकारनं नाही तर, सीबीआयने करावी अशी देखील मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

Dhananjay Munde : माझी अन् जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर Read More »

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू

Pune Crime: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने आता पुण्यातील कायदे सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाळात गणेश काळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या यानंतर गणेश काळे वर कोयत्याने वार करण्यात आला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी होता. आयुष कोमकर हत्याप्रकरणी दत्ता काळे याला अटक करण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू Read More »

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी

Chandshaili Ghat Accident : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. दिवाळीच्या दिवशी यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी Read More »

devendra fadnavis

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग

Maharashtra News : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग Read More »

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी

Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं. पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी Read More »

oplus 16908288

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार

Shirdi Sai Baba : श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी आंध्रप्रदेश येथील एका श्री साईभक्‍ताने श्री साईचरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्‍नांचे खडे असलेला सोन्‍याचा हार श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द केला. याची किंमत ०१ कोटी ०२ लाख ७४ हजार ५८० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साईभक्‍त यांचा सत्‍कार केला. श्री साईभक्‍त यांच्‍या विनंतीवरून त्‍यांचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले आहे.

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार Read More »

atul save

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

Maharashtra Government: राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, अभ्यास समितीचे अध्यक्ष आयुक्त, पशुसंवर्धन असून, सदस्य सचिव म्हणून आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे आहेत. समिती राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. तसेच, दूध उत्पादक शेतकरी, खाजगी व सहकारी दूध संघ यांचेकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्याचे काम समिती करणार आहे. समितीच्या कार्यात “विकसित महाराष्ट्र 2047” या उद्दिष्टाचा विचार केला जाईल. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभाग म्हणून कामगिरी करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांतील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याचे मार्गदर्शन समिती करणार आहे. ही अभ्यास समिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योगांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार आमंत्रित करेल. समितीच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दुग्धव्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच बचतगट/शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या बाबींचेही नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप

Nilesh Ghaywal : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश घायवळ सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याने पासपोर्ट आणि व्हिसा सहज मिळवून परदेश गाठल्याने प्रशासनावरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. आता त्याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आल आहे. घायवळने पुणे आणि अहिल्यानगरमध्ये दुहेरी मतदान नोंदणी करून आपल्या अन बायकोच्या नावे ओळखपत्र मिळवली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावावर दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या दोन नावांनी व दोन वयोगटात ओळखपत्रे मिळवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओळखपत्रातील विसंगती 1. पती – निलेशकुमार बन्सीलाल गायवळ • क्रमांक: DRD1360288 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 47 2. पती – निलेश बन्सीलाल गायवळ • क्रमांक: TKM8217994 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 48 3. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: SAO7387947 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 42 4. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: TKM8218026 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 33 अहमदनगर व पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने व वयात बदल करून ही ओळखपत्रे मिळवण्यात आली. इतकेच नव्हे, तर कर्जत-जामखेड मतदारसंघात घायवळ दांपत्याची नावे सलग क्रमांकावर नोंदवली गेल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ नावातील फेरफार व खोट्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, घायवळ हे सर्व कुणाच्या आश्रयाने करतो? प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे दुहेरी ओळखपत्रे बनवली गेली? हे प्रश्न आता पुढे येत आहेत. यामुळे त्याच्या जवळील असलेल्या राजकीय मंडळींवरही संशयाची सुई फिरू लागली आहे. त्यामुळे हे प्रकरण प्रशासन किती गांभीर्याने घेत आणि काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप Read More »