DNA मराठी

Jamkhed News

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा

VBA on Gas Cylinder : वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका यांच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?” गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई काळाबाजार सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लुटमार या मुद्द्यावर वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर चुल पेटवून आंदोलन करण्यात आले यावेळी वंचितचे प्रवक्ते अरुण जाधव म्हणाले की सध्या देशभरात गॅस सिलिंडरची भीषण व कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा ठोस संशय जनतेमध्ये निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेत काळाबाजार करणारे दलाल व काही संबंधित यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहेत. ९१६ रुपयांना उपलब्ध असणारा गॅस सिलिंडर जाणीवपूर्वक बाजारातून गायब करण्यात आला असून, तोच सिलिंडर ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून, यामागे कोणाचे संरक्षण आहे, असा थेट प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत अमानुष व असह्य बनली आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना, दुसरीकडे काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमवत आहेत. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे तीव्र आंदोलन उभारण्यात आले आहे असे म्हणाले तातडीच्या मागण्या 1. गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करून पुरवठा सुरळीत करण्यात यावा. 2. काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 3. जादा दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सींवर छापे टाकून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत. 4. गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 5. सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात व नियमित गॅस पुरवठा हमीने उपलब्ध करून देण्यात यावा. जर वरील मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्यात आली नाही, तर जनतेचा तीव्र रोष उफाळून येईल आणि हे आंदोलन आणखी व्यापक व तीव्र करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील, याची नोंद घ्यावी असा ईशारा अरुण जाधव यांनी देऊन जामखेड तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन दिले.

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा Read More »

img 20260304 wa0006

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार; कुख्यात सागर मोहळकर गंभीर जखमी

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी येथे बुधवारी सायंकाळी कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने थेट सात राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना घडली. यापैकी चार गोळ्या मोहळकरच्या अंगात घुसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वी 307 सह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी त्याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. मोहळकर हा नशेच्या आहारी गेलेला असून जामखेड परिसरात त्याची दहशत असल्याची चर्चा आहे. गोळीबारानंतर जामखेड पोलिसांनी तात्काळ मोहळकरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या असून परिस्थिती चिंताजनक आहे. गोळीबार करणारा हल्लेखोर घटनेनंतर पसार झाला आहे. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे. दवाखान्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या थरारक गोळीबारामुळे जामखेड पुन्हा एकदा हादरले असून गुन्हेगारीच्या प्रश्नावर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार; कुख्यात सागर मोहळकर गंभीर जखमी Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले

Rohit Pawar on Congress: जामखेड नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवरच तोफ डागली आहे. भाजपविरोधात लढाई असल्याचे सांगत असतानाच काँग्रेसने प्रत्यक्षात भाजपची बी-टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, जनतेने दोनदा भरभरून मतांचं दान दिलं, मी कायम त्यांच्या ऋणात राहीन. कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली, उमेदवारांनी ताकदीने लढा दिला, तरीही निकाल अत्यंत निराशाजनक आहे. काम करणाऱ्यांचं मनोबल खच्ची करणारा हा पराभव आहे. जनतेवर आक्षेप नाही. पण जिथे सर्वत्र पैसाच चालतो, तिथे बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार, सामान्य कुटुंबातील उमेदवारांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर… आमदार पवारांनी आजच्या राजकारणावरही तिखट भाष्य केलं. तत्त्व, विचार आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी होत चाललंय. पैशांनी गढूळ झालेलंच राजकारण आज जास्त दिसतं. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर चारचौघात त्यांची नावं घेण्याचीही लाज वाटते, असा घणाघात त्यांनी केला. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला सर्वात स्फोटक आरोप करताना पवार म्हणाले, काही अपक्षांसह धर्मनिरपेक्षतेचा गजर करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवारालाच स्वतःच्या तिकिटावर उभं केलं. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला. लोकंही या तिरक्या खेळीला बळी पडली. यापुढे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा, हा मोठा प्रश्न आहे. जामखेडच्या पराभवानंतर महाविकास आघाडीतच आता आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, रोहित पवारांच्या या भडक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले Read More »

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

Ram Shinde: पुढील महिन्यात दिनांक 31 मे, 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती येत असून त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे संपूर्ण देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल, त्यांचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचेल अशा श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.  श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आदेशीत केले.  या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना चौंडी येथे होणाऱ्या प्रस्तावित मंत्रीमंडळ बैठक आयोजनासंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. अशा प्रकारे ग्रामीण ठिकाणी होणारी ही राज्य मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक आहे. श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, असेही यावेळी निश्चित करण्यात आले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी सादरीकरण केले.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश Read More »

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव

Ajit Pawar: हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दमदार प्रवास आणि समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा भव्य ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून येत्या 17 एप्रिलला संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे. जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जेसाहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संध्या सोनवणे यांनी माध्यमांना दिली. 17 एप्रिल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, असेही संध्या सोनवणे यांनी सांगितले. संध्या सोनवणे म्हणाल्या, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. ’’ सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात समता, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, महात्मा फुल्यांचे क्रांतिकारक विचार, शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा अधिक ठामपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन आहे, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात अजित पवार नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव Read More »

चहा विक्रेत्याचा मुलगा बनला डॉक्टर – मेहनतीचे यश, जिद्दीचा विजय!

Jamkhed News : जामखेड शहरात तीस वर्षांपासून चहाचा व्यवसाय करणाऱ्या प्रकाश उर्फ बंडु ढवळे यांच्या कष्टाला आणि त्यांच्या मुलांच्या मेहनतीला आता फळ लाभले आहे. थोरल्या मुलाने एमबीबीएस पूर्ण करून डॉक्टरची पदवी मिळवली आहे, तर धाकटा मुलगा सध्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ही यशोगाथा केवळ ढवळे कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. कष्टाळू वडिलांची कहाणीबंडु ढवळे यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिक्षण सोडावे लागले. पण त्यांनी कधीही हार न खाता, सहा वर्षे चहाच्या हॉटेलवर नोकरी केली. नंतर त्यांनी स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. जामखेड नगर रस्त्यावरील एका वडाच्या झाडाखाली दोन बाकडे आणि काही खुर्च्या ठेवून त्यांनी चहाचे दुकान सुरू केले. त्यांच्या चहाची चव आणि प्रामाणिकपणामुळे हे दुकान लोकप्रिय झाले. ग्राहकांच्या मनात त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आणि हे दुकान “पुढारी वड” म्हणून ओळखले जाऊ लागले. पत्नीचा साथ आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीबंडु ढवळे यांच्या पत्नी राधिका यांनी शेतीची काळजी घेतली आणि घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सतत परिश्रम केले. पण त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यांचा मुलगा प्रदीप लहानपणापासूनच होतकरू होता. त्याने शाळा-कॉलेजमध्ये उत्तम गुण मिळवले आणि नेट (NEET) परीक्षेत यश मिळवून मुंबईतील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटलमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. साडेपाच वर्षांच्या कठोर अभ्यासानंतर प्रदीपने आता डॉक्टर पदवी मिळवली आहे. धाकटा मुलगा रोहित हा सध्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मेहनत आणि संघर्षाचा विजयढवळे कुटुंबाची ही कथा सांगते की, जर माणसात इच्छाशक्ती असेल आणि तो निष्ठेने मेहनत करत असेल, तर कोणत्याही परिस्थितीत यश मिळू शकते. बंडु ढवळे यांनी चहाच्या दुकानातून मिळणाऱ्या मध्यमवर्गीय उत्पन्नातून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या मुलांनीही वडिलांच्या संघर्षाची किंमत ओळखली आणि अभ्यासात उत्तम यश मिळवले. समाजासाठी प्रेरणाया कुटुंबाची यशोगाथा समाजातील प्रत्येक तरुणासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. ही कथा सांगते की, आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इच्छाशक्ती आणि कष्टाची आवश्यकता असते. बंडु ढवळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे की, मेहनत आणि जिद्द यांच्यामुळे कोणीही आपले स्वप्न साकार करू शकते.

चहा विक्रेत्याचा मुलगा बनला डॉक्टर – मेहनतीचे यश, जिद्दीचा विजय! Read More »

Jamkhed News : मोठी बातमी! 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अटक

Jamkhed News: 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगरने अटक केली आहे. मुजीब अब्दुलरब शेख, तलाठी, तत्कालीन नेमणूक सजा हाळगाव, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, सध्या नेमणूक तलाठी सजा सावरगावतळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडिलांनी मौजे हाळगाव, ता. जामखेड येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर व गट नं. 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र खरेदी केले होते. सदर खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर नोंद लावण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी 3000 रुपये रक्कमेची लाच मागणी केले. याबाबतची तक्रार 30 मे 2024 रोजी ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली. त्यानुसार 30 मे 2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे नमूद खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर लावण्याचा मोबदल्यात 10 हजार लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ संतोष शिंदे, पोना चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ हारून शेख यांनी वरील कारवाई केली आहे.

Jamkhed News : मोठी बातमी! 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अटक Read More »

Ahmednagar News: आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले, जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन

Ahmednagar News: जामखेड गेले १० दिवस भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता विनायक श्रीगणेशाचे शहर व परिसरात उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रीगणेशाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. जामखेड शहरात मोठया मंडळाचे १४ व लहान मंडळाचे १० असे २४ तर एक गाव एक गणपती १० व ग्रामीण भागात एकुण ५५ मंडळाची म्हणजे एकुण ८९ मंडळांची श्री . ची . स्थापना करण्यात आली होती . सातव्या दिवसापासुन शहर व तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती . दहाव्या दिवशी शहरातील१४ व ग्रामीण भागातील १७ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभात घेतला होता . विसर्जन मिरवणूक तब्बल ८ तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री १२.५ मिनिटांनी झाले . प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.  मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकानी फुलून गेले होते बाळगणेश मंडळानी सकाळी चारचाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमाण असून, ढोल-ताशा लेझीम फड ढोलीबाजा-बेन्जोबाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील, चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने शहर व परिसर दणाणून गेले या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने मास्थून निघाले. सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघाले होते गणेशमूर्ती घेऊन निघालेल्या सार्वजनिक मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी  जामखेडमधील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत मेनरोड गजबजून गेला होता. हा सारा परिसरच जणू गणपतीमय होऊन गेला होता. भगव्या टोप्या, प‌ट्ट्या, डोक्यावर मिरवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण  दिसत होते. दरवर्षी प्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी व मित्र मंडळाने गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार आमदार राम शिंदे ; प्रा . मधुकर राळेभात ; सभापती शरद कार्ले ; माजी सभापती डॉ .भगवान मुरूमकर व अमित चिंतामणी यांनी केला . तसेच   मोठ्या हौसेने या वर्षी आमदार रोहित पवार यांनी मेनरोड वर स्टेज उभारून सर्व गणेश मंडळ यांचे सत्कार त्यांनी केले. गणरायाचे विसर्जन पाहण्या- साठी जामखेडकरांची मेनरोडवर गर्दीची लाट पसरलेली होती. मेनरोडमध्ये राहणारे नागरिक घराच्या गॅलरीतून एक विलोभनीय चित्र पाहत होते.  दोन्ही आमदारांनकडून संघर्ष मित्र मंडळाचे कौतुक अनेक वेळा संघर्ष मित्र मंडळाने गणेश उत्सव काळात प्रथम क्रमांकाचे पारितोषीक घेतले आहेत. या वर्षी मंडळाची पहिल्या दिवशाची आरती आमदार राम शिंदे यांनी केली तर विसर्जन मिरवणुकीची आरती आमदार रोहित पवार यांनी केली. शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या संघर्ष मित्रमंडळाची मिरवणूक आकर्षक होती. गणपती विसर्जन मिरवणुक अगदी शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली . यावेळी दोन्ही ही आमदारांनी संघर्ष मित्र मंडळांचे कौतुक केले.  दोन्ही आमदार  थिरकले !  2024 च्या विनासभेत एकचं तरी विसर्जन होणार : जामखेडकर जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे गाण्याच्या ताळावर  बेभानपणे थिरकले होते . विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे स्वागाताचे स्टेज स्वतंत्र होते . परंतु नाचण्यात सुद्धा दोघांची स्पर्धाच दिसत होती . यावेळी ही जणू विधान सभेची विसर्जन मिरवणुक तर नाही ना ? 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकाचं तरी विसर्जन होणार असं जनतेतं चर्चेचा विषय चर्चीला जात होता . कोणताही गंभीर व अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता . गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेन व उत्साहात पार पडला .

Ahmednagar News: आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले, जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन Read More »

Jamkhed News: धक्कादायक! मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

Jamkhed News : जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  दिड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या रागावरून गोळीबार करण्यात आल्याची बातमी मिळाली आहे.   या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांनाला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले.  गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत.   बाबुलाल पठाण  हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे  हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे याने मारहाण केली होती. म्हणून दिड वर्षां पुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.  याचाच मनात राग धरून 3 मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे  पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.

Jamkhed News: धक्कादायक! मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल Read More »