DNA मराठी

imd alert

cold wave

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पडत असून, अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याचे भारतीय हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 12 डिसेंबर 2025 या कालावधीत ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला असून, जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस जिल्ह्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ​नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना उबदार कपड्यांचा वापर : हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे व पायमोजे तसेच शाल, चादर यांसारख्या उबदार कपड्यांचा पुरेसा वापर करावा. आहार व आरोग्य : शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी गरम पेय आणि पौष्टिक आहार घ्यावा. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ युक्त फळे आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. प्रवास व निवारा : थंडीची लाट असताना शक्यतो घरातच राहावे. थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. घर आणि परिसर उबदार राहील याची दक्षता घ्यावी. ​लहान मुले व वृद्धांची काळजी : घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. थंडीमुळे त्यांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. ​वैद्यकीय सल्ला : थंडीत दीर्घकाळ राहिल्याने त्वचा निस्तेज किंवा बधीर होत असल्यास, तसेच शरीराचा थरकाप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे शरीराचे तापमान कमी होण्याचे (Hypothermia) लक्षण असू शकते पशुधनाची काळजी : नागरिकांनी स्वतःसोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि त्यांना थंड वाऱ्यापासून वाचविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. ​आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय किंवा ‘108’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही Read More »

winter

Ahilyanagar Winter Alert: नगरकरांनो, थंडीची लाट! 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान

​Ahilyanagar Winter Alert: राज्यातील अनेक भागात आता थंडीची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी तापमान अचानक घसरल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिह्यात सध्या 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान नोंदवले जात असून येणाऱ्या काळात तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ​या गोष्टी लक्षात ठेवा: ​पुरेसे उबदार कपडे वापरा (मफलर, कानटोपी, मोजे). ​ थंडीत शक्यतो घरातच थांबा आणि प्रवास टाळा. ​शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम पेये आणि व्हिटॅमिन-सी युक्त आहार घ्या. वृद्ध, लहान मुले आणि पाळीव प्राणी यांची विशेष काळजी घ्या. त्वचेचा रंग बदलणे, बधीर होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. ​आपत्कालीन परिस्थितीत: नजिकचे आरोग्यकेंद्र किंवा 108 या क्रमांकावर संपर्क करावा.

Ahilyanagar Winter Alert: नगरकरांनो, थंडीची लाट! 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान Read More »

oplus 16908288

Maharashtra Rain Alert: शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत धो धो पाऊस

Maharashtra Rain Alert: 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, आणि 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे. या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे. ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपार नंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Rain Alert: शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत धो धो पाऊस Read More »

rain

IMD Rain Alert: नगरकर सावधान, 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

IMD Rain Alert: नगर जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांना याचा फटका देखील बसला आहे. शेतकऱ्यांना लाखोंचा नुकसान झाला आहे. तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात पाणी साचले आहे. यातच आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत.जनावरे व शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावे. मेघगर्जना होताना झाडाखाली/टॉवरजवळ थांबू नये. पर्यटनासाठी धरणे व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याची सूचना देखील हवामान विभागाने नागरिकांना दिली आहे. याच बरोबर आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष टोल-फ्री 1077 0241-2323844 / 2356940 या नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: नगरकर सावधान, 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

Ahilyanagar IMD Alert: नगर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी; जाणून घ्या सर्वकाही

Ahilyanagar IMD Alert : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,६२७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १०३२ क्युसेक, ओझर बंधारा ६१८ क्युसेक, मुळा धरणातून १००० क्युसेक, घोड धरणातून ८००० क्युसेक, सीना धरणातून १५०१ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ७५० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ११० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जना होत असताना झाडाखाली, टॉवर, ध्वजांचे खांब किंवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके झाकून घ्यावे. जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करावे. पर्यटनासाठी धरणे, नद्या व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ahilyanagar IMD Alert: नगर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी; जाणून घ्या सर्वकाही Read More »

rain alert

Mumbai Rain Alert: अहिल्यानगर, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी

Mumbai Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. 16 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला आज ( 16 ऑगस्ट) रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे (वॉर्ड) सहायक आयुक्त, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तत्काळ हजर राहून समन्वय साधावा. तसेच, गरजेनुसार योग्य त्या आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके सतर्क आहेत. पर्जन्‍य जलवाहिनी यंत्रणा, मलनि:सारण व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. तथापि,महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

Mumbai Rain Alert: अहिल्यानगर, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी Read More »

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Maharashtra Wheather Update :  राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शविली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने (IMD) आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे, तर पुणे आणि आसपासच्या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रात्री उशिरापासून अधूनमधून पाऊस सुरू आहे,  यासोबतच, आज दुपारी 3.30 वाजता समुद्रात 4.31 मीटर उंचीची भरती येईल, ज्यामुळे या काळात 14 फूट उंच लाटा उसळतील. मान्सून लवकर आला मुंबईत पुन्हा पावसाने वेग घेतला आहे. शनिवारी रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे हवामान आल्हाददायक तर झालेच, शिवाय तापमानातही घट झाली आहे, ज्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई उपनगरांचे तापमान 30.9 अंशांपर्यंत आणि शहराचे तापमान 28 अंशांपर्यंत खाली आले आहे. या आठवड्यात शहरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनने 26 मे रोजी दार ठोठावून हवामानाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला, कारण गेल्या 69 वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर आला. तथापि, सुरुवातीच्या दोन दिवसांच्या पावसानंतर त्याचा वेग मंदावला होता, परंतु आता ढग पुन्हा सक्रिय झाले आहेत. 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस हवामान विभागाच्या मते, सोमाली जेट स्ट्रीम सक्रिय झाला आहे, जो भारतीय उपखंडात मान्सूनला चालना देत आहे. सोमालियाहून अरबी समुद्रातून भारतात जलदगतीने वाहणारा हा प्रवाह आणि नैऋत्य मान्सूनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या प्रभावामुळे 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञांच्या मते, 15 दिवसांच्या अंतरानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या मुंबईत चांगला पाऊस पडत आहे आणि हा टप्पा या आठवड्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे.

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट Read More »

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का?

Jayant Patil: राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का? शेतकऱ्यांच्या या अडचणींवर मात करण्यासाठी सरकारने तत्काळ पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारकडे केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वाहून जाणारा माल भरण्यासाठी शेतकरी जीवाचा आकांत करून प्रयत्न करत होता. राज्यभर दिसणारे हे चित्र केविलवाणे आहे असे म्हणाले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का? Read More »

Maharashtra IMD Alert : नगरकरांनो, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम, डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra IMD Alert : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे त्या भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. तापमानात कमालीची घट झाली असून, राज्यात नीचांकी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात झाली. गुरुवारपर्यंत  थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून थंडी वाढल्यामुळे नागरिकांनी शेकोटीच्या आधार घेतला आहे, थंडीमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये सामान्य सर्दी, फ्लू, न्यूमोनिया, हृदयाच्या आजारांचे विकार, हायपरटेंशन, हायपोथर्मिया आणि इतर श्वसन संक्रमण यांचा समावेश होतो.थंडीमुळे उद्भवू शकणार्‍या काही प्रमुख समस्या: श्वसन संक्रमण: थंडीमुळे श्वासनलिका आणि फुफ्फुसांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता वाढते. यामुळे खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया होऊ शकतो. हृदयाच्या आजारांचे विकार: थंडीमुळे हृदयाचे ठोके वेगवान होतात आणि रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयाच्या आजारांच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हायपरटेंशन: थंडीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये संकुचन होते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हायपोथर्मिया: शरीर तापमानात खूप कमी झाल्यास हायपोथर्मिया होऊ शकतो. हे एक गंभीर वैद्यकीय परिस्थिती आहे ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. इतर समस्या: थंडीमुळे त्वचेची समस्या, स्नायूंचे दुखणे, सांध्यांची दुखणे आणि मनोवैज्ञानिक समस्या देखील उद्भवू शकतात. थंडीपासून स्वतःची काळजी कशी घ्यावी: उबदार कपडे घाला: थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी उबदार कपडे घाला. शरीर उबदार ठेवा: गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि उबदार खाद्यपदार्थ खा. घरात उबदार वातावरण ठेवा: घरात उबदार वातावरण ठेवा. बाहेर जाण्याचे टाळा: शक्यतो थंडीत बाहेर जाण्याचे टाळा. नियमित व्यायाम करा: व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. पर्याप्त झोप घ्या: झोप पुरेशी घेणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या: जर तुम्हाला थंडीमुळे कोणतीही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Maharashtra IMD Alert : नगरकरांनो, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम, डॉक्टरांचा सल्ला घ्या Read More »

IMD Alert Maharashtra: सावधान, पावसाचा रेड अलर्ट, वीज पडून 3 जणांचा मृत्यू

IMD Alert Maharashtra: पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने  मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे आज मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. पोलिसांनी सर्व नागरिकांना अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा बायपासवर 25 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता दरड कोसळल्याने परिसरात 3 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे काही विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. पावसामुळे अनेक गाड्याही थांबवाव्या लागल्याने मोठा विस्कळीत झाला. मुंबईच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे नोकरदारांचे हाल होत आहेत. पावसामुळे रुळावरून घसरलेल्या ट्रॅफिकमध्ये घरी परतणारे लोक अडकले.

IMD Alert Maharashtra: सावधान, पावसाचा रेड अलर्ट, वीज पडून 3 जणांचा मृत्यू Read More »