DNA मराठी

Farmers News

mla kashinath date

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले

MLA Kashinath Date : कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या आवर्तनाबाबत काही घटकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून शेतकऱ्यांच्या भावनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करत आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग देत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव उधळून लावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार दाते सर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कुकडी व पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्या- नंतर मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून कुकडी कालव्याद्वारे 5 मार्च दरम्यान तर 25 फेब्रुवारी ते 1 मार्च च्या दरम्यान पिंपळगाव कालव्यांद्वारे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेळेत आवर्तन सोडण्यात आले असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाहीही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. येडगाव धरणातील अपेक्षित पाणीसाठा, तांत्रिक बाबी आणि सर्व लाभक्षेत्रांचा विचार करूनच आवर्तनाचे नियोजन केले जाते. दोन-तीन दिवसांचा विलंब तांत्रिक कारणास्तव होऊ शकतो मात्र 5 मार्चपर्यंत पाणी निश्चितपणे उपलब्ध होईल, यावर कोणीही राजकारण करू नका अस यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले Read More »

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती

Vijay Wadettiwar: गेल्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिके मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशीव भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असं वडेट्टीवार म्हणाले. मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे. सरकारने नियम-निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. सहजपूर-जवळा सारख्या 600 लोकसंख्येच्या गावात 1000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. हे लोकशाहीला भूषणावह नाही. धाराशीव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी 23 फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जनभावना असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकटाप्रमाणे सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावत आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी, प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक

Chandrashekhar Bawankule: राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच ७/१२ उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (७/१२) अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत तर होईलच शिवाय, प्रत्येक भूखंडाला आता ‘भू-आधार’ क्रमांक (ULPIN) मिळणार आहे. 2 कोटींहून अधिक पोटहिश्शांचा होणार ‘डिजिटल’ कायापालट राज्यात १८९० ते १९३० या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यानंतर १९९२ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटणीमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत. मात्र, या सर्व पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने सरकारी दप्तरी नकाशे आणि ७/१२ उतारा यांचा ताळमेळ लागत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या स्तरावरून आता ‘पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प’ सुरू करण्यात येत आहे. काय आहे ‘भू-आधार’ ? केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला आता Unique Land Parcel Identification Number (ULPIN) म्हणजेच ‘भू-आधार’ क्रमांक दिला जाणार आहे. आधार कार्डाप्रमाणेच जमिनीची सर्व माहिती या एका क्रमांकावर उपलब्ध असेल. यामुळे पीक विमा, बँकांकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे. शेतकऱ्यांना होणारे थेट फायदे वादातून सुटका: जमिनीचे क्षेत्र आणि हद्दी निश्चित झाल्यामुळे शेतकऱ्यांमधील आपसातील वाद कमी होतील. अचूक नकाशे: ७/१२ उताऱ्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होईल. डिजिटल डेटाबेस: पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक डिजिटल माहिती उपलब्ध असेल. खरेदी-विक्री सुलभ: जमिनीच्या व्यवहारापूर्वी मोजणीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल. अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापना या प्रकल्पाच्या सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समित्या या कामाचा आठवड्याला आढावा घेतील. यामध्ये खासगी सर्वेक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. नकाशे आणि ७/१२ यांचा मेळ बसल्यामुळे ग्रामीण भागातील जमिनींचे अर्थकारण अधिक मजबूत होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी, प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक Read More »

Maharashtra Politics: उद्योगांसाठी बळी देऊ नका, अन्यथा…, राज्यात शेतकरी आक्रमक; केंद्र सरकारला दिला इशारा

Maharashtra Politics: राज्यात गेल्याकाही दिवसांपासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातच अमेरिकेने वाढवलेले शुल्क आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या अस्पष्ट धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य आणि शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत तर लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना गंभीर उपजीविकेच्या संकटाला सामोरे जावे लागेल. आयात शुल्क कमी करण्यास विरोध जावंधिया म्हणाले की, सरकारने अलीकडेच कापसावरील आयात शुल्क ११ % वरून शून्य केले आहे, जेणेकरून कापड उद्योगाला अमेरिकेच्या शुल्कातून दिलासा मिळू शकेल. परंतु याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. परदेशी कापूस भारतात ५०,०००-५१,००० प्रति कँडी (३५५.६ किलो) दराने येत आहे. परिणामी, देशांतर्गत कापसाचे दर घसरत आहेत आणि विदर्भातील शेतकऱ्यांना (देशाच्या कापूस उत्पादनाच्या ३०% उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या) ७,०००-७,५०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही. लांब जातीसाठी किमान आधारभूत किंमत ₹८,११० आणि मध्यम जातीसाठी ₹७,७१० प्रति क्विंटल निश्चित केली आहे. शेतकऱ्यांचा नेहमीच बळी जवंधिया यांचा आरोप आहे की सरकार वारंवार उद्योग आणि ग्राहकांच्या हितासाठी निर्णय घेते आणि शेतकऱ्यांचा बळी देते. ते म्हणाले, “हे खूप अन्याय्य आहे. जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करते.” एमएसपी आणि अनुदानावर भर त्यांनी शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी दोन प्रमुख पावले सुचवली… एमएसपी कायदेशीररित्या अनिवार्य केले पाहिजे, जेणेकरून कोणतेही पीक किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी विकले जाऊ नये. शेतकऱ्यांना थेट आणि पुरेसे अनुदान दिले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या किमती आणि बाजारभावातील फरक भरून काढता येईल. सध्याच्या योजनांबद्दल प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीकडून दरवर्षी १२,००० रुपये मिळतात. कृषी पंपांसाठी ७.५ अश्वशक्तीपर्यंत मोफत वीज देखील दिली जाते. परंतु जवंधिया म्हणतात की या योजना “सरकारी अपयश लपवण्याचा” एक मार्ग आहेत. सोयाबीनचा किमान आधारभूत किमतीचा दर प्रति क्विंटल ५,३२८ रुपये आहे, पण शेतकऱ्यांना फक्त ४,०००-४,५०० रुपये मिळत आहेत. तूर (तूर) चा किमान आधारभूत किमतीचा दर ८,००० रुपये आहे, पण शेतकरी तो फक्त ६,५००-७,००० रुपयांना विकू शकतात. जावधिया यांनी प्रश्न उपस्थित केला की, अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते, तर भारतात ७०% लहान आणि सीमांत शेतकरी फक्त २-५ हेक्टर जमिनीवर शेती करतात. अशा परिस्थितीत ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकू शकत नाहीत. सरकारला थेट आवाहन जावधिया म्हणाले, “जेव्हा तुम्ही इतर योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करू शकता, तर शेतकऱ्यांवर खर्च का करू नये? जे शेतकरी उन्हात आणि पावसात दिवसरात्र कष्ट करून कोट्यवधी लोकांना पोट भरतात त्यांना पूर्ण आर्थिक मदत मिळाली पाहिजे.”

Maharashtra Politics: उद्योगांसाठी बळी देऊ नका, अन्यथा…, राज्यात शेतकरी आक्रमक; केंद्र सरकारला दिला इशारा Read More »