DNA मराठी

DNA Marathi News

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..!

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉल मधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले होते.  मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र याचे व्हिडिओ काढून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या आदी सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवल्याने तसेच काही नागरिकांनी गेवराई येथील अधिकाऱ्यांना संपर्क केल्याने गेवराई नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि आठ दिवसात दोन वेळेस गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाने एयरवाल बंद केले.  पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या चापडगाव येथील कांबी फाट्या जवळील एअरवॉलला अज्ञात इसमाने छेडछाड केल्याने गेल्या आठ दिवसापासून दिवसभरात किमान लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती.  सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले गेल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. परंतु गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने याविषयी सध्या नागरिकात मात्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.  या राज्य मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद होत होती,  तर काही जण मोबाईलच्या स्टेटसला या पाण्याचे विहंगम दृश्य ठेवल्याने याची चर्चा होऊन काहींनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनास दूरध्वनीवरून संपर्क केल्याने पाईपलाईनच्या एअरवॉलमधून वाया जात असलेले पाणी हे तत्परतेने गेवराईचा नगरपरिषद पाणीपुरवठा प्रशासनाने बंद केले. तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण-गेवराई या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनवर असणाऱ्या एअरवॉलला कोणत्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नये जेणेकरून पाण्याची नासाडी होऊन पाणी वायाला जाणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी तसेच आसपासच्या नागरिकांनी घ्यावी.  तसेच कोणी अशा प्रकारची छेडछाड करत असल्याचे नगरपरिषदेच्या फिरत्या पथकास निदर्शनास आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांच्या आदेशावरून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. – ए.बी. लाड  पाणीपुरवठा प्रमुख, गेवराई नगरपरिषद

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..! Read More »

Headache

Headache Relief Tips:  डोकेदुखीपासून औषधाशिवाय  मिळणार आराम; ‘या’ 5 पद्धतीचा करा वापर

Headache Relief Tips : आज असे अनेकजण आहे ज्यांना डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि, डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात.  हवामानातील बदल,  निद्रानाश, तणाव यामुळे डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर औषधांव्यतिरिक्त, तुम्ही या पद्धतींद्वारे देखील डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता. कधी कधी कामाचा ताण हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपायांबद्दल सांगू. डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी उपायलाईट डोळ्यांवर जास्त प्रकाश पडणे देखील चांगले नाही. कधीकधी प्रकाशाच्या तेजामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. अशा वेळी डोकेदुखीचा त्रास टाळण्यासाठी रूममधील लाईट  मंद ठेवा. सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापरा. मानसिक दबाव कमी कराबर्‍याच वेळा काम किंवा इतर कोणत्याही गोष्टींबद्दल खूप दबाव असतो, यामुळे देखील तीव्र डोकेदुखी होऊ शकते. अशा परिस्थितीत मानसिक दबावापासून दूर राहा. डोकेदुखी टाळण्यासाठी आणि डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. कामाच्या ओझ्यामुळे मानसिक दडपणही वाढते. हे टाळण्याचा प्रयत्न करा. डोके मालिशडोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी मसाज हा एक चांगला उपाय आहे. मसाज करून तुम्हाला वेदनांपासून आराम मिळू शकतो. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी डोक्याच्या मसाजसोबतच कपाळ, मान आणि खांद्यांची मालिश करावी. कधी कधी थकवा आल्यानेही वेदना होतात. मसाज केल्याने तणावही कमी होतो. कॅफिनचे सेवनकॅफिनचे सेवन डोकेदुखीमध्ये खूप फायदेशीर आहे. अनेकजण डोकेदुखीवर औषध म्हणून चहाचा वापर करतात. तीव्र डोकेदुखीच्या बाबतीत चहा आणि कॉफीचे सेवन करणे चांगले. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर चहा किंवा कॉफी प्यायल्याने डोकेदुखी वाढणे थांबू शकते. आल्याचे सेवनडोकेदुखीवर उपचार करण्यासाठी आल्याचे सेवन करणे खूप चांगले आहे. आल्याच्या चहाने तुम्ही डोकेदुखी दूर करू शकता. अद्रक दुधात मिसळूनही वापरू शकता. यामुळे डोकेदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. (अस्वीकरण: आमचा लेख केवळ माहिती प्रदान करण्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या.)

Headache Relief Tips:  डोकेदुखीपासून औषधाशिवाय  मिळणार आराम; ‘या’ 5 पद्धतीचा करा वापर Read More »