DNA मराठी

DNA Marathi News

pune crime

Pune Crime: पुणे हादरलं,आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव; कारण काय?

Pune Crime: पुण्यात आईच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्वतः आईनेच आपल्या ११ वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केली तर १३ वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील वाघोली येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ रोड परिसरात ही घटना घडली आहे. सोनी संतोष जायभाय असे आरोपी मातेचे नाव आहे. तिने आपला ११ वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने आपली १३ वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. दरम्यान, या भयंकर हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीर जखमी झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जायभाय कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून, कामानीनिमित्ताने ते वाघोली येथे स्थायिक झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका आईने आपल्याच पोटच्या मुलांना संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे गूढ अद्याप उकललेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की मानसिक आजार? पोलीस या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Pune Crime: पुणे हादरलं,आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव; कारण काय? Read More »

img 20260129 wa0003

Arvind Patkar Death: ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन

Arvind Patkar Death : मनोविकास प्रकाशनचे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे आज पहाटे दोन वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता पुण्यातील वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अरविंद पाटकर यांनी तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली होती. गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील गिरणी कामगार संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर काही सहकाऱ्यांसह त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षातून बाहेर पडल्यानंतर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला. त्या टप्प्यावर अभिवन प्रकाशनचे वा. वि. भट यांनी त्यांना मोलाची मदत केली. पक्षाच्या सभा आणि आंदोलनांमध्ये पुस्तक विक्रीचा अनुभव पाटकरांना आधीपासूनच होता. याच अनुभवाच्या बळावर त्यांनी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, त्यानंतर नायर, केईएम, जेजे, सायन अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी पुस्तक विक्री केली. पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा वाचकांशी थेट संवाद वाढत गेला. मुंबई महानगरपालिकेचा जिमखाना, ओल्ड कस्टम हाउस, रिझर्व्ह बँकेची इमारत अशा विविध ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले. अखेर ४ एप्रिल १९८४ रोजी आमदार निवासाच्या आवारात मनोविकासचे पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. ‘मनोविकास प्रकाशन’ हे नावही एका सहजसुंदर क्षणातून साकार झाले. कोकणातील कुडाळ येथे पुस्तक प्रदर्शनासाठी गेले असताना शेजारी राहणाऱ्या बबन पाटकर यांनी ‘विकास बुक सेंटर’ हे नाव सर्वसामान्य वाटते असे सांगत त्यामागे ‘मनो’ जोडण्याची सूचना केली. त्यातूनच ‘मनोविकास प्रकाशन’ या नावाचा जन्म झाला. १९८५ मध्ये वा. वि. भट यांच्या पाठिंब्याने मनोविकास प्रकाशनचे पहिले पुस्तक ‘शाहीर’ प्रकाशित झाले. त्यानंतर वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक पुस्तकांच्या माध्यमातून मनोविकासने स्वतंत्र ओळख निर्माण केली. २००५ पासून अरविंद पाटकर पुण्यात स्थायिक झाले आणि तेथूनच त्यांनी प्रकाशन कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेले.

Arvind Patkar Death: ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन Read More »

Vijay Wadettiwar

विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी

Vijay Wadettiwar on Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून राजकीय वर्तुळात त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे. अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड, वेळ पाळणारे अजित दादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. पहाटेपासून कामात व्यग्र असणारे, प्रशासकीय अधिकारी असो वा सामान्य नागरिक सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते “दादा” होते. एकदा शब्द दिला की ते काम पूर्ण करणारे, प्रामाणिक आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले होते. महाराष्ट्रासाठी अजून मोठे कार्य त्यांच्या हातून व्हायचे असताना नियतीने हा घात केला. अजित दादा यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे धैर्य लाभो. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी Read More »

sanjay raut

Sanjay Raut on Ajit Pawar: आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल, अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये घेऊन जाणारे विमान अपघात बातमी समजली. ⁠दुर्दैवाने ही बातमी कानावर आली. त्यांची गरज आज महाराष्ट्राला होती मात्र आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल. रोखठोक दिलखुलास कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता होता. बारामती आणि त्यांच नात होत त्याच बारामती मध्ये मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केले. ⁠उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेहमी म्हणायचे कॅबिनेट ला पूर्ण अभ्यास करून येणार नेता. ⁠शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले. ⁠त्या नेत्याचा असा अकाली मृत्यू होईल असे वाटले नव्हते. ⁠त्यांच्या कामाची दृश्य नेहमी पाहायली उत्तम वक्ते होते रोख ठोक बोलणारे मिश्किल टिपणी करून आपलेसे करणे असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, उमद्या वयात असे नेते अनेक गेले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा होती. ⁠दुर्दैवाणे मुख्यमंत्री झाले नाही. महाराष्ट्राला अजून काय पहाव लागेल माहिती नाही. टीका आम्ही एकमेकांवर करत होतो मात्र त्यांनी शांत राहून उत्तर दिले. ⁠महाराष्ट्राला अजून त्यांच्याकडून काम करून घेता आले असते. ⁠काका पुतण्या एकत्र लढतात याचा आनंद होता मात्र तो फार काळ टिकला नाही. पवार कुटुंबावरच हा मोठा आघात आहे.

Sanjay Raut on Ajit Pawar: आता महाराष्ट्रच राजकारण बेचव अळणी होईल, अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊत काय म्हणाले? Read More »

ajit pawar

मोठी बातमी! विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला आहे. बारामती येथे झालेल्या या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार बारामतीला जात असतात हा अपघात झाला. विमानतळावर उतरत असताना त्यांचे विमान शेतात कोसळले. सुरुवातीला या भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती तर तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.

मोठी बातमी! विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decisions: शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क होणार माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार.पीएम सेतू Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता) कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म (TReDS Platform) . सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित सूक्ष्म, लघू व मध्यम कंत्राटदार- उद्योजकांसाठी सुविधा. (सार्वजनिक बांधकाम) धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस. (वस्त्रोद्योग) वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमीनीच्या भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. विशेषतः ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

Maharashtra Cabinet Decisions: शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क होणार माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : चंद्रपूरच्या जनतेची इच्छा महापौर भाजपाचा व्हावा; बावनकुळे स्पष्टच बोलले

Chandrashekhar Bawankule : चंद्रपूर महापालिकेत कुणाचा महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेससह भाजप देखील महापौर पदासाठी प्रयत्न करत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरच्या जनतेची इच्छा महापौर भाजपाचा व्हावा असं म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,  आज किंवा उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि कोर कमिटी बैठक होणार असून त्यामध्ये गट नोंदणीवर निर्णय होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमत कोणाकडेच नसल्याने त्या ठिकाणी मोठा पेच आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने चंद्रपूरच्या जनतेची इच्छा आहे. महापौर भाजपाचा व्हावा त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून मोठा सहकार्य मिळेल असा एक सूर आहे. त्यावर आम्ही करत आहोत. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही महापौर बनविण्यासाठी काम करू असं देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई महापालिकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संघर्ष किंवा स्पर्धा नाही तर चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे, अजित पवार एकत्र बसून योग्य पद्धतीने राज्यातील 29 पालिकेत महायुतीचा महापौर बसेल असा आमचा प्रयत्न राहील असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : चंद्रपूरच्या जनतेची इच्छा महापौर भाजपाचा व्हावा; बावनकुळे स्पष्टच बोलले Read More »

infosys

Infosys देणार तब्बल 20 हजार नोकऱ्या; एआयमुळे होणार फायदा

Infosys Vacancy in 2027 : आयटी क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात एआयचा वापर वाढत असल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याचा गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असल्याने एआयला विरोध वाढतोय. तसेच वाढत्या एआय सेवांमुळे आयटी क्षेत्रात बेरोजगारी निर्माण होणार असल्याचा दावा देखील करण्यात येतोय मात्र दुसरीकडे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने 2027 या आर्थिक वर्षात तब्बल 20  हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा केलीय. कंपनीचे सीईओ सलिल पारेख यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीत याबाबत घोषणा केलीय. आयटी क्षेत्रात एआय वाढीच्या संधी दिसत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला असं यावेळी सलिल पारेख म्हणाले. सलिल पारेख यांच्या या घोषणेमुळे जगात पुन्हा एकदा एआय आयटी किंवा इतर क्षेत्रात फायदेशीर ठरणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असून एआयच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय.  आयटी क्षेत्रात सध्या जागतिक कंपन्यांकडून नोकरी कपातचा दबाव असताना, इन्फोसिसने मोठा निर्णय घेत एका मोठ्या भरतीची घोषणा केलीयं. ग्राहक त्यांचे बजेट AI आणि ऑटोमेशनकडे वळवत असल्याने मागणीचे स्वरूप बदलत असून आम्हाला काही ठिकाणी घट आणि काही ठिकाणी वाढ दिसत आहे. आम्हाला घट दिसण्यापेक्षा वाढ थोडी जास्त दिसत आहे असं म्हणत त्यांनी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत इन्फोसिस आणखी 20 हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करणार असून आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तीन तिमाहींत, इन्फोसिसने 18 हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती केली असं त्यांनी सांगितलं. तर केवळ तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या कर्मचारी संख्येत 5 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची वाढ झाली असल्याची देखील माहिती त्यांनी जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीत दिलीये.  तसेच एआय एजंट्स, फाउंडेशन मॉडेल्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,कस्टमर सपोर्ट आणि जुन्या ॲप्लिकेशन्सचं आधुनिकीकरण या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन काम तयार होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महत्त्वाचं म्हणजे, इन्फोसिसने फ्रेशर्ससाठी सुरुवातीचं वेतनही वाढवलं आहे. एआय आणि डिजिटल कौशल्य असलेल्या तरुणांसाठी वार्षिक 21 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज देण्यात येत आहे. म्हणूनच, आयटी क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या तरुणांसाठी इन्फोसिसची ही घोषणा मोठी संधी ठरणार आहे. इन्फोसिसने घेतलेल्या निर्णयामुळे आयटी क्षेत्राला नवी दिशा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Infosys देणार तब्बल 20 हजार नोकऱ्या; एआयमुळे होणार फायदा Read More »

maharashtra government

Maharashtra Government: विरोधी पक्षनेत्यासाठी 10 टक्के आमदारांची अट; सरकार आणणार कायदा?

Maharashtra Government: विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांच्या संख्येबाबत स्पष्टता आणण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कायदा आण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेता पद रिक्त असून, यावरून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी तसेच भविष्यात ठोस नियमावली असावी, यासाठी पाऊल उचलली जात आहे . येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती विधानभवनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी विरोधी पक्षनेत्यासाठी किमान १० टक्के, म्हणजेच सुमारे २९ आमदारांचे संख्याबळ आवश्यक असावे, अशी भूमिका आहे. मात्र, राज्यात याबाबत सध्या कोणताही कांयदा किंवा निकष नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाला हे संख्याबळ मिळाले नाही. सध्याच्या संख्याबळानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे २०, काँग्रेसकडे १६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे १०, तर शेतकरी कामगार पक्षाकडे २ आमदार आहेत. परिणामी, विधानसभेत विरोधी पक्षनेता पद अद्याप रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने हा विषय कायद्याच्या चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १९६२, १९६७ आणि १९७२ या विधानसभा निवडणुकांमध्येही विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. मात्र, त्या वेळी विधानसभेच्या अध्यक्षांनी विशेषाधिकारांचा वापर करून सर्वाधिक आमदार असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला विरोधी पक्षनेता पद दिले होते. राजकीय वर्तुळात, विरोधी पक्षनेता पदावरून होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप टाळण्यासाठी आणि निर्णयप्रक्रियेत स्पष्टता आणण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचे बोलले जात आहे. या कायद्यामुळे भविष्यात विरोधी पक्षनेत्याची निवड ही राजकीय निर्णयावर नव्हे, तर स्पष्ट कायदेशीर तरतुदींवर आधारित राहु शकते. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक आमदारसंख्या निश्चित करणारा कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात  मांडला जातो का हे पाहणे महत्वाचे असेल.

Maharashtra Government: विरोधी पक्षनेत्यासाठी 10 टक्के आमदारांची अट; सरकार आणणार कायदा? Read More »

mangalprabhat lodha

Mangalprabhat Lodha : KEM च्या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ उल्लेख काढा; मंत्री लोढांचे आदेश

Mangalprabhat Lodha : मुंबई मधील परळ येथील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. यावेळी केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ हा उल्लेख वगळण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली. या वक्तव्यामुळे केईएमच्या नावाबाबत राजकीय वादाला तोंड फुटले आहे. लोढा म्हणाले, “हे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतरही इंग्रजांच्या पाऊलखुणा कायम आहेत. मुंबई महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करावा.” कार्यक्रमात त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठीही महत्त्वाच्या सूचना केल्या. नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा केंद्र, आरोग्य स्वयंसेवकांसाठी बैठक व्यवस्था, विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून देश-विदेशातील वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करणारे कम्युनिकेशन सेंटर उभारावे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेत सक्रिय सहभागी करून घेणे, एनएसएस व एनसीसीच्या माध्यमातून रुग्ण व नातेवाइकांना मदत करणे, डॉक्टरांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर भर द्यावा. शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित स्मरणिका तयार करावी आणि कोविडसारख्या संकटातील केईएमच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण व्हावे, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी रुग्णसेवेच्या पुढील नियोजनाची माहिती दिली. दरम्यान मंत्री लोढा यांच्या सूचनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र टीका केली. “नाव बदलल्याने संस्थेच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. औषधांची कमतरता, आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणांची गरज किंवा रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलणे अपेक्षित होते. मात्र, यांचा व्यवसाय केवळ धर्माच्या मुद्द्यांपुरताच मर्यादित आहे. अशी भूमिका देशाला मागे घेऊन जाणारी आहे. अहमदाबादचे नाव आधी बदला,” असा उपरोधिक टोला सावंत यांनी लगावला.केईएमच्या काही डॉक्टर, माजी विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही या प्रस्तावाला विरोध होत असून, नाव बदलण्यापेक्षा रुग्णालयातील सुविधा, उपकरणे आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली जात आहे. शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही चर्चा पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Mangalprabhat Lodha : KEM च्या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ उल्लेख काढा; मंत्री लोढांचे आदेश Read More »