DNA मराठी

DNA Marathi News

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील दिली.  अहिल्‍यानगर हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पुर्ण होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते.  केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी करुन, अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केल्‍याने जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पुर्ण होत असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल Read More »

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले

Kalicharan Maharaj : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याची घटना घडल्याननंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे. या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळ्याचे कामामध्ये एवढा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी आपला राग व्यक्त केला. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला कालिचरण महाराज यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना मालवण येथील घटनेवरूण संताप व्यक्त केला. तसेच अशा घटनामधील दोशीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.  यावेळी बोलताना ते म्हणाले, या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील जो कोणी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत झालेला हा हलगर्जीपणा हा महाराजांचा अवमान आहे.  यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही कारण ते स्वतः मूर्तिकार नाही त्यांनी खाली कामे दिले मात्र संबंधितन्नी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. यामुळे मूर्तिकारसह जे इंजिनिअर या मध्ये दोषी आहे अशी प्रतिक्रिया कालिचरण महाराज यांनी दिली.

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले Read More »

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे

Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.  यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल शंभर वेळा माफी मागू शकतो, असे म्हटले आहे. यात मागेपुढे पाहणार नाही. असेही शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहेत, पण महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी पुतळा कोसळल्याने प्रकरण तापत आहे. राज्य सरकारने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली, तर उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात मूक निदर्शने केली. काय म्हणाले एकनाथ शिंदे? अशा स्थितीत आता शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. मी त्याच्या पायाला 100 वेळा हात लावून माफी मागायला तयार आहे. मी माफी मागण्यापासून मागे हटणार नाही. आमचे सरकार त्यांचे  आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करते. महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा, राजकोट किल्ला संकुलात 26 ऑगस्ट रोजी कोसळला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अनावरण केल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी, राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले. भारतीय नौदलाचे विधान हा प्रकल्प भारतीय नौदलाद्वारे चालवला जात असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. शिवरायांचा पुतळा बसवण्याचा प्रकल्प राज्य सरकारच्या समन्वयाने साकारला आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, असे नौदलाने गुरुवारी सांगितले. एका निवेदनात, नौदलाने पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार शक्य तितक्या लवकर सर्व उपायांमध्ये मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे Read More »

Rain Alert : महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी

Rain Alert: गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.  हवामान खात्याने म्हटले आहे की नवीन तीव्र दाबामुळे उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सल्लागारात म्हटले आहे की पाऊस पश्चिम आणि नैऋत्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम दक्षिण राजस्थान आणि गुजरातवर होईल आणि नंतर 29 ऑगस्टपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छपर्यंत पोहोचेल, त्यानुसार येथे हवामान खराब होण्याची शक्यता आहे. हवामान अद्यतनांनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि झारखंडसह इतर भागात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा इशारा व्यतिरिक्त, IMD ने जोरदार वाऱ्याचा इशारा देखील दिला आहे. मध्य प्रदेशात ताशी 50 किमी आणि दक्षिण राजस्थानमध्ये 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मच्छिमारांसाठी IMD चा सल्ला भारतीय हवामान खात्याने मच्छिमारांना 30 ऑगस्टपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात, विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या आसपास जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. गुजरातमध्ये पावसाचा रेड अलर्ट कोलकात्यात गेल्या 5-6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे गुजरातमधील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसामुळे 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमध्ये पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.

Rain Alert : महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी Read More »

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके

Laxman Hake : ओबीसी आंदोलक  लक्ष्मण हाके यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत करण्यात आले.ओबीसी जनजागृती साठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी ते ओबीसींचे मेळावे घेत आहेत.लोहा येथे देखील ओबीसी बांधवाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने ओबीसींच्याच उमेदवारांना मतदान करावे.जर ओबीसी उमेदवार नसेल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,अल्पसंख्याक उमेदवारांना ओबीसींनी मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांनी केले आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण केला होता.

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके Read More »

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: अहमदनगर शहरात 01 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सलोखा खराब होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  मालवण येथील राजकोट किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेने शिवप्रेमी व अखंड मराठा समाजाच्या त्रीव भावन लक्षात घेवून या सभेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा खराब होऊ नये याची खबरदारी घेण्यात आला अशी विनंती या निवेदनाद्वारे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून करण्यात आली.

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »

झिरो बॅलन्सवर आजच उघडा PMJDY खाते, मिळणार 2 लाखांचा विमा

Modi Government: प्रधानमंत्री जन धन योजनेला (PMJDY) आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ झाला आहे. ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. 28 ऑगस्ट 2018 रोजी सरकारने PMJDY 2.0 लाँच केले. तेव्हापासून उघडलेल्या PMJDY खात्यांसाठी RuPay कार्डवरील अपघात विमा संरक्षण दुप्पट करून 2 लाख रुपये करण्यात आले. या विम्यासाठी कोणताही प्रीमियम आकारला जात नाही. हे NPCI द्वारे दिले जाते. सध्या प्रीमियम 0.47 रुपये प्रति कार्ड आहे. जाणून घ्या PMJDY चे काय फायदे आहेत. झिरो बॅलन्सवर खाते उघडले सर्वसामान्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याच्या उद्देशाने पंतप्रधान जन धन योजना सुरू करण्यात आली. यामध्ये अगदी गोरगरिबांची बँक खाती शून्य शिल्लक ठेवून उघडली जातात. या योजनेत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ थेट बँक हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. कर्ज, विमा, पेन्शन मिळणे सोपे प्रधानमंत्री जन-धन योजनेचा उद्देश गरीब वर्गांना बँकिंग प्रणालीशी जोडणे, बचत खाती उघडणे आणि कर्ज, विमा आणि पेन्शन सुविधा सुनिश्चित करणे हे आहे. यामध्ये कोणत्याही जामीनदाराची गरज नाही. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत 52.39 कोटींहून अधिक लोकांची जन धन खाती उघडण्यात आली आहेत. शून्य प्रीमियमवर अपघात विमा जन धन खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते. 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचे जीवन संरक्षण देखील उपलब्ध आहे. 2018 नंतर उघडलेल्या खात्यांवर अपघात विमा 2 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याचा प्रीमियमही शून्य आहे. किमान शिल्लक राखण्याचे कोणतेही टेन्शन नाही जन धन खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. खात्यात 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे. जन धन खाते उघडल्यानंतर, लाभार्थ्यांना रुपे डेबिट कार्ड देखील दिले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते बँकांशिवाय पोस्ट ऑफिसमध्येही जन धन खाते उघडले जाते. यासाठी फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच जन धन खातेही ऑनलाइन उघडता येणार आहे.

झिरो बॅलन्सवर आजच उघडा PMJDY खाते, मिळणार 2 लाखांचा विमा Read More »

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा

Ahmednagar News: श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून ठिय्या आंदोलन केले.  या मोर्चात जिल्ह्यातील पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे, राज्य समन्वयक सविता विधाते, सुभाष सोनवणे, शितल दळवी, कावेरी साबळे, उत्तम गायकवाड, कैलास पवार, विद्या अभंग, मेजबीन सय्यद, अश्‍विनी दळवी, छाया भूमकर, बाबासाहेब गोर्डे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी केलेल्या जोदरार घोषणाबाजी जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर दणाणून निघाला.  जोपर्यंत विद्यार्थी आहे, तोपर्यंत शालेय पोषण आहार सुरु राहणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे 15 हजार रुपये मानधन द्यावे, इतर केडर प्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गणवेश मिळावा, गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थ सोबत काम करायचे असल्याने दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून किमान कर्मचाऱ्यांचा 20 लाखाचा विमा उतरवावा, कर्मचाऱ्यांना औषधोपचारासाठी किमान 50 हजार रुपयाची मदत मिळावी, दरवर्षीच्या करार ऐवजी किमान तीन वर्षातून एकदा करार करावा, शालेय परिसर, वर्ग स्वच्छता, स्वच्छतागृह इत्यादींची साफसफाई करण्यासाठी संबंधित शालेय यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांवर दबाव आनला जात असून, शासन निर्णयानुसार ही कामे करण्यास दबाव आणू नये, गरोदर महिला कर्मचारी यांना बालसंगोपणासाठी सहा महिन्याची पगारी रजा मिळावी, विनाकारण कुणाला कामावरून कमी न करता त्या कर्मचाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्यावी, ज्याच्या नावावर करार त्यांचीच प्रत्यक्ष नेमणूक करावी, सेंट्रल किचन पद्धती तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी काम करत होते त्यांना तात्काळ कामावर घेण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.  या मागणीचे निवेदन जिल्हा शालेय पोषण आहारचे लेखा अधिकारी रुपेश भालेराव यांना देण्यात आले.

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा Read More »

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….!

Maharashtra Election: शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा शेवगांव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली मेळावा पार पडला. शेवगांव-पाथर्डी विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा भाजपाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंढे आणी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी निर्धार मेळाव्याचे भव्य आयोजन करून अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.  मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असुन विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यांनी केले.  यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसारवाडे, बाळासाहेब सोनवने, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे, संजय मरकड सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….! Read More »

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा पासून या मोर्चाला सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ,किरण लमहाटे,डॉ राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाज कंटकांनी जागतिक आदिवासी दिनी  दहन केले,त्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत,12 हजार 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय.

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला Read More »