DNA मराठी

DNA Marathi News

iPhone 15 Pro वर 20,000 रुपयांची सूट, असा घ्या फायदा

iPhone 15 Pro Discount: काही दिवसापूर्वी iPhone 16 सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही iPhone 15 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, Flipkart बिग बिलियन डेज सेलमध्ये फक्त 89,999 रुपयांमध्ये iPhone 15 Pro विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे.  Apple इंटेलिजेंस फीचर्ससह सर्व नवीनतम Apple अपग्रेडसाठी डिव्हाइस तयार आहे. Flipkart Big Billion Days Sale सह, तुम्ही कमी किमतीत या फिचर्सचा फायदा घेऊ शकता. ई-कॉमर्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये 89,999 रुपयांमध्ये iPhone 15 Pro विकला जाणार आहे.   फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीझरनुसार, सेल दरम्यान फ्लिपकार्ट आयफोन 15 सीरीजच्या प्रत्येक मॉडेलवर प्रचंड सूट देईल. प्रो सोबतच, आयफोन 15 प्रो मॅक्स वर देखील सवलत जाहीर केली आहे. फ्लॅगशिप मॉडेलची किंमत 1,39,999 रुपयांवरून 1,09,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. Flipkart ने सांगितले की iPhone 15 Pro ची किंमत 1,19,999 रुपयांवरून 99,999 रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ 10,000 रुपयांची सूट प्रत्येकासाठी लागू आहे. तथापि, पुढील 10,000 रुपयांची सूट बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरमध्ये विभागली गेली आहे. Flipkart VIP ग्राहकांना 2,000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफ मिळेल.

iPhone 15 Pro वर 20,000 रुपयांची सूट, असा घ्या फायदा Read More »

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Akshay Shinde Encounter Case :  पोलीस एन्काऊंटरमध्ये बदलापूर घटनेचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. तर आता त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आली आहे.  रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागल्याचे आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूचे मुख्य कारण जास्त रक्तस्त्राव झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.   रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक   अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. मंगळवारी अक्षय शिंदेचे पोस्टमॉर्टम झाला, जे सुमारे सात तास चालले आणि त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले.  5 डॉक्टरांच्या समितीने अक्षय शिंदेचे शवविच्छेदन केले. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह अद्याप ताब्यात घेण्यात आलेला नाही. अक्षय शिंदे यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात येणार आहे. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधानात विसंगती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ते म्हणाल्या की, ज्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला आणि हातात हातकड्या असलेला आरोपी चालत्या वाहनात पोलीस कर्मचाऱ्याकडून पिस्तुल कसा हिसकावू शकतो. बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, खटला संपल्यानंतर आरोपींना जाहीर फाशी द्यावी, जेणेकरून समाजात मजबूत संदेश जाईल, अशी मी मागणी केली होती.  दुसरीकडे, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर कोणालाही सोडणार नसल्याचे सांगितले होते, असा दावा एका पोलिस अधिकाऱ्याने केला. आरोपीवर गोळीबार करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे म्हणाले की, अक्षयच्या वागण्यावरून तो सगळ्यांना मारेल असे वाटत होते, त्यामुळे त्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा Read More »

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा संगीताताई ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहीर ही गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबाबोब आंदोलन हे मागे घेण्यात आले.  यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ फाटे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे, लक्ष्मण बोरुडे, प्रकाश बोरुडे, राणी बोरुडे, वर्षा बोरुडे, वंदना बोरुडे, छाया बोरुडे, शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….! Read More »

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही…

Akshay Shinde :  बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. हा एन्काउंटर कसा झाला याचा माहिती आता समोर येत आहे.  सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेते होते. त्याचे पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात हे रिमांड होते. याप्रकरणात चौकशीसाठी नेण्यात येत होते. तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होते. साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी शिंद याला मृत घोषित केलंय. तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की.

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही… Read More »

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद

Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद Read More »

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या

One Nation One Election :  केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता वन नेशन, वन इलेक्शनची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. वन नेशन, वन इलेक्शन लागू झाल्यानंतर लोकसभा किंवा राज्यसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? वन नेशन, वन इलेक्शनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असेल, पण प्रत्यक्षात येण्याआधी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यामध्ये आपल्या शिफारशी दिल्या आहेत.   त्रिशंकू सभागृहाच्या बाबतीत काय? वन नेशन, वन इलेक्शन लागू केले तर त्यानंतरच्या निवडणुका घेतल्या जातात. अशा परिस्थितीत लोकसभा किंवा राज्यसभेत त्रिशंकू सभागृहाची स्थिती निर्माण झाली तर काय होईल? हा प्रश्न अतिशय समर्पक आहे आणि आपण अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात तो वारंवार पाहिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशी शिफारस केली आहे की अशा परिस्थितीत त्या विधानसभा किंवा लोकसभेसाठी पुन्हा निवडणुका घेता येतील. मात्र लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ही निवडणूक होणार आहे. अविश्वास प्रस्ताव  राज्य किंवा केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला किंवा सरकार पडले. इतर कोणताही पक्ष किंवा आघाडी सरकार स्थापन करू शकली नाही, तर तेथे पुन्हा निवडणुका घेता येतील, अशी शिफारस माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.  अशा परिस्थितीत, नवीन राज्य विधानसभा किंवा लोकसभेचा कार्यकाळ हा फक्त मागील लोकसभेच्या उर्वरित कालावधीसाठी असेल. उदाहरणार्थ, एखादे सरकार साडेतीन वर्षांत पडले आणि पुन्हा निवडणुकांची गरज भासली, तर पुन्हा निवडणुका नक्कीच होतील, पण नव्या सरकारचा कार्यकाळ केवळ दीड वर्षाचा असेल. पंचायत निवडणुकांचे काय? त्याच्या नावाप्रमाणेच, वन नेशन, वन इलेक्शन, संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका होतील का? लोकसभा आणि विधानसभा व्यतिरिक्त यात नगरपालिका, पंचायत इत्यादींचाही समावेश असेल का? यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुरुवातीला म्हणजेच पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, असा प्रस्ताव दिला आहे.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांशी अशा प्रकारे जोडल्या जाव्यात की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 100 दिवसांत नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका पूर्ण होतील. मार्चमध्ये अहवाल सादर करण्यात आला होता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस अगोदर या वर्षी मार्चमध्ये वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल सरकारला सादर केला होता.

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या Read More »

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा

Manoj Jarange: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगरकडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जर जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण झाले नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने सगेसीयर अधिसूचनेची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे. मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे. इ. मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहे. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अ. नगर यांच्यावतीने हे निवेदन दिलेपासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा Read More »

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार

Ahmednagar News: धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण आरक्षण लागू व्हावे यासाठी आज  बुधवारपासून (दिनांक 18 सप्टेंबर) सात जण नेवासा फाटा येथे उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर आठ दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास हे सातही जण गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेणार आहेत, असा इशारा सकल धनगर जमातने दिला आहे.  दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत धनगर समाज आरक्षणाबाबत घेतलेली बैठक आम्हाला मान्य नाही व तिथे त्या बैठकीत सहभागी झालेल्या समाजाच्या शिष्टमंडळाला आमची मान्यता नाही, असे स्पष्टीकरणही सकल धनगर समाजाने दिले आहे.  धनगर समाजाला भटके विमुक्त (एनटी) मध्ये साडेतीन टक्के आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) मिळावे अशी त्यांची मागणी आहे. 2014 मध्ये भाजपने सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, दहा वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सकल धनगर जमातचे म्हणणे आहे. त्यामुळे या मागणीसाठी व धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत्या बुधवारपासून (18 सप्टेंबर) नेवासा फाटा येथे संभाजीनगर महामार्गावर उपोषण आंदोलन केले जाणार आहे.  यात महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे उत्तर जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्यासह प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजू मामा तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने सहभागी होणार आहेत. उपोषणास बसल्यानंतर आठ दिवसात शासनाने एसटी आरक्षण निर्णय घेतला नाही व प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही तर हे सातही जण गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना कोळेकर, तागड आणि सोरमारे यांनी स्पष्ट केले.  या सात जणांपैकी राजू मामा तागड यांनी मागील वर्षी 17 सप्टेंबरला मिरी (तालुका पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिरात याच मागणीसाठी तेरा दिवस उपोषण केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पन्नास दिवसात मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष झाले तरी निर्णय झालेला नाही, असा उद्वेग तागड यांनी व्यक्त केला.  दहा वर्षांपासून तेच ऐकतोय  या संदर्भात सोरमारे यांनी सांगितले की, मागील महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीत संभाजीनगर वा राहुरी येथे उपोषण करण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही जणांनी अचानक पंढरपूरला उपोषण सुरू केले व आताही आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाची बैठक घेऊन धनगर आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असे आश्वासन दिले. मात्र मागील दहा वर्षापासून आम्ही हेच शब्द ऐकतोय, अशी खंत व्यक्त करून सोरमारे म्हणाले, महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा मोठा समाज आहे व आरक्षणाच्या आशेने त्याने भाजपला एकगठ्ठा मतदान केले आहे. मात्र आरक्षणाचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता धनगरी हिसका दाखवला जाणार आहे व 18 सप्टेंबरपासून उपोषण आणि सामुदायिक जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.  शिष्टमंडळच मान्य नाही  मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई व अन्य उपस्थित होते. सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने या बैठकीस जायलाच नको होते. या शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नाही, असा दावाही सोरमारे यांनी केला.

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार Read More »

OYO Room:  OYO रूममध्ये बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा नाहीतर…

OYO Room : आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाकडे  आधार कार्ड आहे. आधार कार्ड हे ओळखपत्राप्रमाणे काम करते. बँक खाते उघडण्यापासून कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. कोणत्याही हॉटेल किंवा ओयोमध्ये जाण्यापूर्वी तुमच्याकडे आधार कार्ड मागितले जाते. तुम्हीही हॉटेल किंवा ओयोमध्ये जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फसवणुक होऊ शकते  आम्ही हॉटेल किंवा OYO बुक करतो. ज्यासाठी आम्हाला आधार कार्ड जमा करण्यास सांगितले जाते. जर तुम्ही हॉटेल किंवा ओयो रूम बुक करताना तुमचे आधार कार्ड जमा केले तर तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. आधारचा दुरुपयोग कसा होतो ते जाणून घेऊया. वास्तविक, आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासह सर्व महत्त्वाची माहिती असते. अशा परिस्थितीत कोणीही तुमच्या आधार कार्डमधून डेटा चोरू शकतो आणि मोठी बँकिंग फसवणूक होऊ शकते. त्यामुळे हॉटेल किंवा ओयो रूम बुक करताना मास्क केलेले आधार कार्ड वापरावे. मास्क केलेल्या आधार कार्डमध्ये 12 अंकांऐवजी फक्त 4 अंक असतात. म्हणजे तुमच्या आधार क्रमांकाचे 8 अंक लपलेले आहेत. अशा स्थितीत तुमच्या आधार कार्डद्वारे फसवणूक शक्य होणार नाही. मास्क केलेले आधार कार्ड कसे डाउनलोड करावे मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइट http:uidai.gov.in वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला My Aadhar Card चा पर्याय दिसेल. यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा टाका. यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल. OTP एंटर करा आणि सबमिट करा. आता तुम्हाला आधार डाउनलोड पर्याय दिसेल. आता तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता.

OYO Room:  OYO रूममध्ये बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा नाहीतर… Read More »

UPI Update: मोठी बातमी! UPI व्यवहार मर्यादा बदलणार, जाणून घ्या नवीन बदल

UPI Update:  जर तुम्ही देखील दररोज UPI च्या मदतीने आर्थिक व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. माहितीनुसार आता UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही नवीन मर्यादा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लागू केली आहे. NPCI ने परिपत्रकात काय म्हटले? NPCI ने 24 ऑगस्ट 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की UPI ही एक प्रमुख पेमेंट प्रणाली म्हणून ओळखली जाते आणि कर पेमेंटसाठी प्रति व्यवहार मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. प्रभावी तारीख आणि अनुपालन नवीन मर्यादा 16 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. NPCI ने बँका, पेमेंट सेवा प्रदाते आणि UPI ॲप्सना 15 सप्टेंबरपर्यंत नवीन मर्यादेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, हा नियम रुग्णालये, शिक्षण केंद्रे, IPO आणि RBI च्या किरकोळ थेट योजनांना देखील लागू होईल. व्यापारी पडताळणी हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांची पडताळणी आवश्यक असेल. कर भरणा आणि इतर व्यवहार सोपे आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. UPI पेमेंट पद्धत UPI, किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे भारतात विकसित केलेली डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. ही प्रणाली सोप्या, सुरक्षित आणि जलद पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यास सक्षम करते. UPI च्या माध्यमातून तुम्ही मोबाईल फोन वापरून विविध प्रकारचे व्यवहार करू शकता. UPI ची वैशिष्ट्ये एकाधिक बँक खाती एकाच UPI ॲपद्वारे तुम्ही वेगवेगळ्या बँक खाती लिंक करू शकता आणि एकाच प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकता. सिंगल क्लिक पेमेंट पेमेंट प्रक्रिया जलद आणि सोपी बनवून फक्त एका क्लिकवर UPI व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात. 24×7 उपलब्धता UPI प्रणाली सर्व वेळ (24 तास, 7 दिवस) उपलब्ध असते, त्यामुळे तुम्ही कधीही व्यवहार करू शकता. सुरक्षा UPI व्यवहारांसाठी सुरक्षित पिन (UPI पिन) आवश्यक असतो, जो तुमच्या आर्थिक माहितीची सुरक्षितता सुनिश्चित करतो. QR कोड QR कोड UPI पेमेंटसाठी वापरले जाऊ शकतात, ज्यामुळे पेमेंट प्रक्रिया आणखी सोपी होते. वैयक्तिक देयके आणि बिले UPI चा वापर व्यक्ती-टू-व्यक्ती व्यवहार, बिल भरणे, टॅक्सी भाडे, रेस्टॉरंट बिले, ऑनलाइन शॉपिंग आणि सरकारी सेवांसाठी पेमेंटसाठी केला जाऊ शकतो.

UPI Update: मोठी बातमी! UPI व्यवहार मर्यादा बदलणार, जाणून घ्या नवीन बदल Read More »