DNA मराठी

DNA Marathi News

भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar : भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केला आहे. यावेळी त्यांनी भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रात राखेची किंमत 600-660 रुपये असताना फक्त 353 रुपये टन राख विकण्यात आली असा दावा त्यांनी केला आहे. विधान सभेत प्रश्नोत्तराच्या काळात राखेच्या विक्रीत घोटाळा झाल्याचे प्रकरण वडेट्टीवार यांनी मांडले. भुसावळ येथील राख विक्रीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असताना अर्धी राख मोजमाप न होता विकली गेली. इथे ठरवून भ्रष्टाचार करण्यात आला. यातूनच वाल्मीक कराड सारखे लोक तयार होतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. राख विक्रीत जो भ्रष्टाचार झाला त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राख विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले. या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राख विक्री प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप Read More »

अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात

Ahilyanagar News : सुपा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 18 मार्च रोजी सुपा पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैगिक संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाचा तपास सूपा पोलीस ठाण्यात सुरू होता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर या प्रकरणातील आरोपीबाबुराव हरीभाऊ शिंदे याला अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अहिल्यानगर शहर विभागातील प्रभारी अधिकारी यांना अलर्ट करुन अहिल्यानगर शहरात आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना केल्या. याप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांनी नमुद आरोपीचा पोलीस स्टेशनल हद्दीत शोध घेत असताना तो अमरधाम रोड, अहिल्यानगर परिसरात आला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांना सदर परिसरात आरोपीचे शोधकामी पाठविले असता नमुद आरोपी हा गाडगीळ पटांगण, अमरधाम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी मिळुन आला. पुढील कारवाईसाठी आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन येथुन सुपा पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरिता देण्यात आले आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात Read More »

MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Ajit Pawar: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. दरम्यान ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. ‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.

MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

नागपूरची घटना गृहविभागाचे अपयश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Harshwardhan Sapkal: नागपूर शहरात घडलेला दगडफेकीची घटना अनावश्यक व अत्यंत दुर्देवी आहे. नागपूरकरांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती मी सर्व नागपूरवासियांना करतो. नागपूर शहरात सर्व धर्मीय लोक अत्यंत गुण्यागोविंदाने व आनंदाने रहात आहेत. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर आहे. या शहरात एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो दगडफेक, जाळपोळ होते हे गृहविभागाचे अपयश आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री जाणिवपूर्वक प्रप्रक्षोभक वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना नागपूरमध्ये यश आले आहे असे दिसते. राज्यासमोर अनेक ज्वलंत प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव नाही सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम मिळाली नाही, मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सत्ताधारी सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये करत होते त्याचा हा परिपाक आहे. नागपूर सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. देशाच्या इतर भागात दंगली होत असताना नागपूरात कधीही दंगल झाली नव्हती रामनवमीला हिंदू मुस्लीम एकत्रीतपणे रथ ओढतात ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदू दर्शनाला जातात राजकीय फायद्यासाठी नागपूर पेटवण्याचा डाव आपण ओळखावा आणि शांतता राखावी असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो.

नागपूरची घटना गृहविभागाचे अपयश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल Read More »

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला?

Pune News: स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर घडलेल्या अत्याचार घटनेत आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप वाजीद खान बिडकर यांनी केला आहे. आज्ञात लोकांनी त्यांना गाडीत उचलून नेले आणि मारहाण करून दिवेघाटात सोडून दिले असा आरोप वाजीद खान बिडकर यांच्याकडून करण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, साहिल बबन डोंगरे वय- 25, धंदा- वकिली व समाजकार्य (वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी) यांना पहाटेच्या सुमारास काही इसमानी गाडीतळ परिसरातून जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण करून दिवे घाट येथे सोडून दिले. त्यांना डोळ्याजवळ, पायाला व शरीरावर किरकोळ जखमा दिसत असून त्यांना नेमके कुठून व कधी गाडीत बसवून नेले याबाबत व्यवस्थित माहिती सांगता येत नाही अधिक माहिती घेतली असता ते रात्री दारू पिऊन होते व मोटर सायकलवर स्लीप होऊन पडले असल्याची शक्यता वाटते. हडपसर पोलीस स्टेशन येथे ते हजर होताच , त्यांना उपचारासाठी पोलीस अंमलदार देऊन ससून रुग्णालय येथे पाठविले आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला? Read More »

माझ्या वक्तव्यावर मी ठाम, औरंगजेब- फडणवीस प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

Harshvardhan Sapkal : माझ्या वक्तव्यावर मी ठाम असून कोणतीही वयक्तिक टिका केली नाही. असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज देवेंद्र फडणवीस प्रकरणात दिले. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांना कोणताही अपशब्द वापरला नाही. मी औरंगजेबचा कारभार आणि सरकारचा कारभार असा काल म्हणालो होतो. माझं वक्तव्य सरकारच्या अनुषंगाने आलेले वक्तव्य आहे. फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील लोक औरंगजेब ठरवू पाहत आहेत. माजी तुलना राज्य कारभाराशी असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून कोणतीही वयक्तिक टिका केली नाही. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे राज्य कारभार देखील औरंगजेबप्रममाणे क्रूर असल्याचं म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर चारही बाजूने टीकेला सुरुवात केली होती.

माझ्या वक्तव्यावर मी ठाम, औरंगजेब- फडणवीस प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले Read More »

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप

Jayakumar Rawal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. तर आता मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल गोटे यांनी केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे. मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे व वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिली असल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी सांगितले.

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप Read More »

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

Ladki Behen Yojana : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी लाडकी बहिण योजना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याची घोषणा महायुती कडून करण्यात आली होती मात्र आतापर्यंत याबाबत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने विरोधक महायुती सरकारवर जोरदार टीका करत आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे.अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेसाठी 36 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र या अर्थसंकल्पात देखील लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सभागृहात महायुती सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजकोषीय संतुलन साधल्यानंतर, महाराष्ट्र सरकार आपले निवडणूक आश्वासन पूर्ण करेल आणि माझी लाडकी बहीणयोजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा Read More »

41 देशांच्या प्रवासावर बंदी येणार, डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

Donald Trump : अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याचे तयारीत आहे. ट्रम्प प्रशासन डझनभर देशांच्या नागरिकांवर व्यापक प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण 41 देशांना तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागता येईल. 10 देशांच्या पहिल्या गटात अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया सारखे देश आहेत, ज्यांचे व्हिसा पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. दुसऱ्या गटात, इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदानसह पाच देशांना अंशतः निलंबनाचा सामना करावा लागेल, ज्यामुळे पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसा तसेच काही अपवादांसह इतर स्थलांतरित व्हिसा प्रभावित होतील. जर पाकिस्तान, भूतान आणि म्यानमारसह एकूण 26 देशांच्या सरकारने “60 दिवसांच्या आत कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत” तर तिसरा गट त्यांना अमेरिकन व्हिसा देण्यावर अंशतः बंदी घालण्याचा विचार करेल. यादीत बदल होऊ शकतातएका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यादी बदलू शकते आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासह प्रशासनाने अद्याप तिला मान्यता दिलेली नाही. हे पाऊल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात सात मुस्लिम बहुल देशांमधून प्रवाशांना प्रवेश बंदी घालण्याच्या धोरणाची आठवण करून देते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या धोरणाला मान्यता देण्यापूर्वी अनेक वेळा या धोरणाचे रिव्ह्यू केले. ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे की नाही हे शोधण्यासाठी अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या कोणत्याही परदेशी व्यक्तीची सखोल सुरक्षा तपासणी करणे आवश्यक आहे. त्या आदेशात अनेक मंत्रिमंडळ सदस्यांना 21 मार्चपर्यंत अशा देशांची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते ज्यांमधून प्रवास अंशतः किंवा पूर्णपणे निलंबित करावा कारण त्यांची “चाचणी आणि तपासणीची माहिती अत्यंत अपुरी आहे.” ट्रम्प यांनी ऑक्टोबर 2023 च्या भाषणात त्यांच्या योजनेचा आढावा घेतला, गाझा पट्टी, लिबिया, सोमालिया, सीरिया, येमेन आणि “आपल्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही ठिकाणाहून” लोकांना बंदी घालण्याची प्रतिज्ञा केली.

41 देशांच्या प्रवासावर बंदी येणार, डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय Read More »

नगर एमआयडीसीमध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली, पोलिसांची भूमिका संशयास्पद

Maharashtra News: नगर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे, ही बाब केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर पोलीस व्यवस्थेसाठीही मोठी आव्हाने निर्माण करत आहे. या परिसरात टोळी युद्धाची घटना वाढत आहेत, ज्यामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जात आहे. स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आरोप आहेत. अवैध धंद्यांचे परिणामनगर एमआयडीसी हा औद्योगिक क्षेत्र असून, येथे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. या धंद्यांमध्ये अवैध दारू विक्री, सावकारी आणि इतर गैरकायदेशीर कारवाया समाविष्ट आहेत. यामुळे या परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे आणि टोळी युद्धाच्या घटना घडत आहेत. या टोळी युद्धात अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक पोलिसांची भूमिकास्थानिक पोलिसांची भूमिका या संदर्भात संशयास्पद असल्याचे आरोप आहेत. पोलिसांकडून योग्य प्रमाणात कारवाई न झाल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्या असताना, त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सामाजिक परिणामया अवैध धंद्यांमुळे स्थानिक समाजावरही वाईट परिणाम होत आहेत. अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याने त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे आणि समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. या समस्येवर तातडीने उपाय केले नाही तर भविष्यात ही समस्या आणखी वाढू शकते. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या असल्याचे सांगितले. “पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने ही समस्या वाढत आहे. आम्ही अनेकदा तक्रारी नोंदवल्या आहेत, पण काहीच बदल होत नाही,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. नगर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी पोलिसांनी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. अल्पवयीन मुलांचा वापर होऊ नये म्हणून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या समस्येवर उपाय केल्याशिवाय समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबणार नाही.

नगर एमआयडीसीमध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली, पोलिसांची भूमिका संशयास्पद Read More »