DNA मराठी

DNA Marathi News

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा

IPL 2025: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025 खूप खराब केला असून या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये संघाला पोहचता आलेला नाही. मात्र संघाने या स्पर्धेचा शेवट विजयाने केला आहे. डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांच्या अर्धशतकांनंतरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर धोनीच्या संघाने रविवारी त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 मध्ये 14 पैकी फक्त चार सामने जिंकले आणि 10 सामने गमावले. संघ आठ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली 10 व्या स्थानावर राहिला. आयपीएल 2025 मधून बाहेर पडल्यानंतर आता धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांना वाटले की हा धोनीचा शेवटचा हंगाम आहे आणि तो या हंगामानंतर निवृत्त होईल. पण हंगाम संपल्यानंतर, 43 वर्षीय धोनीने त्याचे पत्ते उघड केले आहेत. सीएसकेच्या कर्णधाराने पुढील हंगामात खेळणार की नाही हे सांगितले आहे. सामन्यानंतर धोनी म्हणाला, “आमचा हंगाम चांगला नव्हता, पण हा एक उत्तम कामगिरी होता. या हंगामात आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते, पण आज आम्ही अनेक चांगले झेल घेतले. निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 4-5 महिने आहेत, घाई नाही.” तो म्हणाला, “शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्वाचे आहे. आता मी रांचीला जाईन, काही बाईक राईड्सचा आनंद घेईन. मी असे म्हणत नाही की मी आता निवृत्त होत आहे, आणि मी असे देखील म्हणत नाही की मी परत येत आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे. मी विचार करेन आणि नंतर निर्णय घेईन.” आयपीएल 2025 मध्ये धोनीची कामगिरी कशी होती? आयपीएल 2025 मध्ये गुजरातविरुद्ध संघाच्या शेवटच्या लीग सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. धोनीने आयपीएल 2025 मध्ये 13 डावांमध्ये 135.17 च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या. त्याने या हंगामात 12 चौकार आणि 12 षटकार मारले. आयपीएल 2025 च्या काही सामन्यांनंतर धोनी सीएसकेचा कर्णधार बनला, परंतु त्याच्या नेतृत्वाखालीही संघाची कामगिरी निराशाजनक राहिली.

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा Read More »

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट

Pune Rain Alert: रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात मुसरधार पावसाने हजेरी लावली. रविवारी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले ज्यासाठी एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी भारतीय हवामान खात्याने आज पुण्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोक त्यांच्या घरात अडकले आहेत आणि प्रशासन मदत कार्यात व्यस्त आहे. बारामतीत 150 घरांमध्ये पाणी जिल्हा अधिकाऱ्यांच्या मते, इंदापूरमधील सुमारे 70 वस्त्यांमध्ये आणि बारामतीतील सुमारे 150 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. बारामतीमध्ये 19 घरांचे अंशतः नुकसान झाले. घरात पाणी साचल्याने एकाच कुटुंबातील सात जण अडकले.

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २६ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

पुन्हा धो धो…, अहिल्यागरसह या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा

IMD Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून जवळ्पास संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता पुढील काही दिवस अवकाळी पाऊस सुरूच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र कोकणाजवळ सक्रिय असल्याने 23 मे रोजी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक या जिह्यांमध्ये अनेक ठिकाणी संततधार पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर मधील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. याच बरोबर शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

पुन्हा धो धो…, अहिल्यागरसह या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा Read More »

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत…

Rajendra Hagavane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज सकाळी (ता.23 शुक्रवार )अटक केली आहे. गेली सात दिवसांपासून ते पोलिसांना चकवा देत होते. या प्रकरणात वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. हगवणे यांना तत्काळ पोलिसांनी पकडावे आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी होत होती.त्यामुळे पोलिसांवर याबाबत मोठा दबाव आला होता. दरम्यान, वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तीच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरु झाली असून, सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत… Read More »

मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

Rajendra Hagavane : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या सुनेच्या मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर पक्षाने ही कारवाई केली आहे. पुण्यातील भुकूम येथे 16 मे रोजी वैष्णवी हगवणे (वय 23) यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला. एफआयआरनुसार, वैष्णवीच्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, महिलांवरील अत्याचार आणि हुंडा प्रथा याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी Read More »

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस

Kajal Guru : नगर शहरामध्ये बोगस तृतीयपंथी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना पैशांसाठी लूटमार करून दमदाटी करत असल्याची घटना काही दिवसापासून घडत असून याबाबतची माहिती नागरिकांनी तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांना दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन काजल गुरु यांनी सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणले होते. यामध्ये सदरची व्यक्ती ही बोगस प्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी कडून तसेच शहरातील सोने व्यापाऱ्यांकडून तसेच काही उद्योजकांकडून पैशांची लूटमार करून दमदाटी करत होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरिकांची लूटमार देखील सदर व्यक्ती करत होती. त्यामुळे या व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदरचा व्यक्ती हा तृतीयपंथी नसून माणूस आहे. या व्यक्तीमुळे तृतीयपंथी समाज हा बदनाम होऊ नये म्हणून सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. तर दुसरीकडे अशा प्रकारे कोणाची फसवणूक होत असेल तर तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस Read More »

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती

Vaishnavi Hagwane : राजेंद्र हगवणेला शोधायला 3 पथक तयार करण्यात आले असून हगवणेला लवकरच अटक करणार येणार असल्याची माहिती सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली. तसेच आमच्यावर या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही नाही आम्हाला कोणाचा फोन आला आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, शिवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण दिलेला आहे आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच हुंडाबळी 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. उर्वरित दोन आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तीन-तीन बनवल्या आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास सुरू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे जे पुरावे आहेत त्यानुसार या घटनेचा जो लेखाजोखा आहे मारहाण केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे आज आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलीस रिमांड वाढवून घेणार आहोत. असं देखील ते म्हणाले. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आहे. आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्हाला कुणाचाही फोन आला नाही कायदेशीर पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. ही घटना जी आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून अगदी बारकाईने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती देखील सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती Read More »

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!”

Ahilyanagar News: नगर तालुक्यातील एका व्यावसायिकाच्या मुरूम संबंधित कामात तलाठी व अप्पर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून अक्षरशः एक लाख रुपयांचा ‘हंटर’ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भ्रष्टाचाराचा हा प्रकार इतका संगनमताने पार पडला की सर्कलला बायपास करून तलाठी आणि ‘कडक’ साहेबांनीच आपापसात वाटणी केली. सदर व्यावसायिकाने मुरूम वाहतुकीसाठी शासकीय पावती भरून अधिकृत मुरूम उचललेला असतानाही, नव्याने आलेल्या अप्पर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या दरम्यान, “35 ते 40 लाखांचा दंड होईल,” असा धाक दाखवून तलाठी साहेबांनी तो व्यावसायिक थेट गाऱ्हाणीच्या स्थितीत आणला. यानंतर प्रकरण एका लाखात मिटवण्यात आलं. यातील काही हिस्सा खिलाडी साहेबांचा तर काहीसा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचे स्पष्टपणे एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. “साहेब फार कडक आहेत, मी तुमचं काम करून देतो… कुणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील!” अशा सज्जड दमासह ही रक्कम स्वीकारण्यात आली. या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – हे सर्व ‘पंचनामा’ करून अधिकृतपणे मांडल्याचा देखावा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात पैसे ‘खाल्ले’ गेले. रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे ऐकू येतं – “फर्स्ट पणे साहेबांसाठी एक लाख द्या… लवकर द्या…” कारवाई होणार का? हा प्रकार उघडकीस येताच तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. “निव्वळ दमदाटी करून भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल तयार केले आहे काय?” असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!” Read More »

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती

Ravindra Dhangekar : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुढील एका वर्षासाठी शिंदे यांनी शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. महानगर प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, पुण्यात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करून आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा शब्दही दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून धंगेकर यांना कोणते पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, धंगेकर यांनी ‘मी कुठल्याही पदासाठी नव्हे; तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, असे जाहीर केले होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.: रवींद्र धंगेकर, माजी आमदार

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती Read More »