DNA मराठी

DNA Marathi News

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Maharashtra Wheather Update :  राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शविली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने (IMD) आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे, तर पुणे आणि आसपासच्या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रात्री उशिरापासून अधूनमधून पाऊस सुरू आहे,  यासोबतच, आज दुपारी 3.30 वाजता समुद्रात 4.31 मीटर उंचीची भरती येईल, ज्यामुळे या काळात 14 फूट उंच लाटा उसळतील. मान्सून लवकर आला मुंबईत पुन्हा पावसाने वेग घेतला आहे. शनिवारी रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे हवामान आल्हाददायक तर झालेच, शिवाय तापमानातही घट झाली आहे, ज्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई उपनगरांचे तापमान 30.9 अंशांपर्यंत आणि शहराचे तापमान 28 अंशांपर्यंत खाली आले आहे. या आठवड्यात शहरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनने 26 मे रोजी दार ठोठावून हवामानाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला, कारण गेल्या 69 वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर आला. तथापि, सुरुवातीच्या दोन दिवसांच्या पावसानंतर त्याचा वेग मंदावला होता, परंतु आता ढग पुन्हा सक्रिय झाले आहेत. 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस हवामान विभागाच्या मते, सोमाली जेट स्ट्रीम सक्रिय झाला आहे, जो भारतीय उपखंडात मान्सूनला चालना देत आहे. सोमालियाहून अरबी समुद्रातून भारतात जलदगतीने वाहणारा हा प्रवाह आणि नैऋत्य मान्सूनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या प्रभावामुळे 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञांच्या मते, 15 दिवसांच्या अंतरानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या मुंबईत चांगला पाऊस पडत आहे आणि हा टप्पा या आठवड्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे.

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट Read More »

बोल्हेगावमध्ये बिनशेती जमीन शेती दाखवून विक्री? शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील बोल्हेगाव मिळकती एकत्र करून तयार करण्यात आलेल्या एकूण २४३२०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या जमिनीला मा. तहसीलदारांनी रहिवासी वापरासाठी अकृषिक वापराची परवानगी दिली होती. मात्र, यामधील केवळ स.नं. ३४/३ या मिळकतीसाठी स्वतंत्र खरेदीखत करताना ती शेती म्हणून नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे. हे खरेदीखत करताना संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असूनही त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रशासकीय प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रहिवासी वापरासाठी आधीच अकृषिक परवानगी मिळालेल्या जमिनींपैकी एक भाग पुन्हा शेती दाखवून खरेदी केल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणात शासकीय नियमबाह्य व्यवहार झाल्याचे स्पष्ट असून, महसूल विभागाने याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सरकारी महसुलात घोटाळा होऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बोल्हेगावमध्ये बिनशेती जमीन शेती दाखवून विक्री? शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप Read More »

भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा ऐरणीवर; अरुण मुंडेंच्या कुस्ती मेळ्याला मंत्र्यांची उपस्थिती, आमदारांच्या गटाचा विरोध?

Arun Munde : पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आले असून, पक्षातील दोन गटांत वाढता संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या पक्षाचे सरचिटणीस असलेले अरुण मुंडे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी तसेच गोकुळ दौंड यांनी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, भाजपने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांनाच संधी दिली. या पार्श्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या शेवगाव शहरातील ‘देवाभाऊ कुस्ती स्पर्धा’ला अरुण मुंडे यांनी संयोजन दिलं. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, यामध्ये भाजपातील अंतर्गत मतभेद अधोरेखित झाले. या कार्यक्रमाच्या बक्षीसवाटप समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महसूल मंत्री व जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांनी उपस्थिती लावली. मात्र, जिल्ह्यातील इतर भाजप आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, हे विशेष. या कार्यक्रमाला भाजपमधील काही नेत्यांनी उपस्थित राहू नये यासाठी खुद्द आमदार मोनिका राजळे यांच्या गटाकडून प्रयत्न झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोशल मीडियावरही अशाच आशयाची पोस्ट फिरत होती, ज्यामध्ये “पक्षविरोधात काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते हजर का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, व्यासपीठावरून बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “या कार्यक्रमाला येण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केले, त्यामुळे उपस्थित राहणं शक्य झालं,” असं स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यानेही अनेकांचे भुवया उंचावल्या. यानंतर, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात भाजपच्या गटबाजीने पुन्हा डोके वर काढले आहे का, हे स्पष्ट होत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फूट आणखी गडद होणार की पक्ष नेमकी भूमिका घेऊन तोडगा काढणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा ऐरणीवर; अरुण मुंडेंच्या कुस्ती मेळ्याला मंत्र्यांची उपस्थिती, आमदारांच्या गटाचा विरोध? Read More »

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अहिल्यानगर – “राम शिंदे हे कर्तबगार आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक षडयंत्र रचून पाडण्यात आलं,” असा घणाघात करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवा राजकीय भडका उडवला आहे. मात्र, त्यांनी कोणावरही थेट नाव घेऊन आरोप न करता, ‘पण कुणी पाडलं?’ या सवालाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. शेवगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत बोलताना बावनकुळे म्हणाले, “राम शिंदेंनी मैदानात आणि राजकारणात नेहमी झुंज दिली आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हा पराभव नैसर्गिक नव्हता, तर हे एक संगनमताचे षडयंत्र होतं.“ राजकीय सूत्रांच्या मते, बावनकुळे यांचा हा इशारा पक्षांतर्गत गटबाजीकडे असल्याची शक्यता आहे. मात्र, बावनकुळे यांनी नामोल्लेख टाळल्याने चर्चा आणि तर्कांना अधिक उधाण आलं आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि राम शिंदे समर्थकांनी देखील या वक्तव्याला दुजोरा देत, “खरं कुणी पाडलं, हे आता लोकांनी समजून घ्यायला हवं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या विधानामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात पुन्हा एकदा खदखद वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत या आरोपाचा प्रतिध्वनी दिल्लीपासून जिल्हापर्यंत ऐकू येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय भूकंप होतोय का? की केवळ इशारा? या आरोपाच्या पडद्यामागे नेमकं काय? – येणाऱ्या काळात स्पष्ट होईल!

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Read More »

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे आवश्यक आहे. तसेच 51 व्या जनजाती सल्लागार परिषदेत महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हा आयोग स्थापन करण्यात येत आहे. या आयोगाची रचना राज्य अनुसूचित जाती आयोगप्रमाणेच एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य अशी राहील. आयोगाकरिता नव्याने 26 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पदांसाठीचे तसेच आयोगाचे सदस्य यांचे वेतन, भत्ते आणि कार्यालयासाठी भाडे तत्वावर जागा, फर्निचर, वीज, दूरध्वनी, इंधन यांसह अनुषंगिक खर्चासाठी 4 कोटी 20 लाख रुपयांच्या तरतूदीस बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान, अनुसूचित जाती आयोग देखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली. त्यासाठीही आगामी काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना; राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलासा; शरद पवार प्रकरणात निर्दोष मुक्तता

Gopichand Padalkar : नेहमी काहींना काही कारणाने राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय असणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज बारामती न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त आरोपातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी 2020 मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे. असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पडळकर यांना वारंवार समन्स बजावून देखील न्यायालयात हजर राहिले नव्हते. आज न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलासा; शरद पवार प्रकरणात निर्दोष मुक्तता Read More »

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक

Ahilyanagar Crime : नगर जिल्ह्यातील जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. 1 जून) रात्री 10 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री 10 वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय 20, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. गोळीबारात कुणाल जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली. हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर (राहणार संभाजीनगर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. हे आरोपी नेवासा मार्गाने जात असल्याचे समजतच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभू रायभान भालेकर, नकुल विष्णु मुळे, शरद अंकुशराव शिंदे, गणेश गोविंद आरगडे, रावबहादुर श्रीधर हारकळ, सुशील ताराचंद गांगवे अशांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत या घटनेतील सहा आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या आरोपीने मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास जामखेड पोलीस करत आहे.

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक Read More »

उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर; मंत्री गिरीश महाजन भडकले

Girish Mahajan on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर असल्याची अशी टीका जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. ते आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे. संजय राऊत संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पुढच्या आठ दिवसात बघा, त्यांच्याकडे कोण राहणार कोण राहणार नाही. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे देखील परेशान असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. त्यांच्या बडबडीमुळे हा पक्ष आता मी सांगू शकत नाही, पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत. संजय राऊत यांच्या बद्दल उत्तर देण्यासाठी काही पुरेसे नाही. अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर केली. माध्यमांशी पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांना तुम्ही देखील जास्त प्रसिद्धी देऊ नये आणि त्यांना जास्त मनावर घेऊ नका. कोण अनाथ झाले कोणी दत्तक घेतले, लोक मतदान करतील. तुमची बडबड तुमचे विचार काय हे बघू .निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू असं देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तर यावेळी त्यांनी नाशिक पालकमंत्री पदाच्या वादावर देखील भाष्य केले आहे. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, मोठी जबाबदारी आहे त्या संदर्भात काम सुरू आहे.

उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर; मंत्री गिरीश महाजन भडकले Read More »

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने तयारी करावी; मंत्री राणे यांचे आदेश

Nitesh Rane: गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदर विभागाने त्यांचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आज वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन जलटॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भागांशी मुंबईचे कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रवासाची वेळ सुमारे 40 मिनिटे असणार आहे. या जलटॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. या सेवांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. मुंबईतील जलवाहतुकीच्या या नव्या योजनेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल.

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने तयारी करावी; मंत्री राणे यांचे आदेश Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टीलवरील शुल्क दुप्पट; 4 जूनपासून होणार लागू

Trump Steel Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली, त्यांनी परदेशातून येणाऱ्या स्टीलवरील आयात शुल्क सध्याच्या 25 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याची घोषणा केली. नवीन शुल्क दर 4 जूनपासून लागू होणार असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया येथील यूएस स्टीलच्या मोन व्हॅली वर्क्स-इर्विन प्लांटमध्ये ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की या निर्णयामुळे अमेरिकन स्टील उत्पादकांचे संरक्षण होईल आणि देशाच्या उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळेल. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही ते 25 टक्क्यांनी वाढवत आहोत. आम्ही स्टीलवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत, ज्यामुळे अमेरिकेच्या स्टील उद्योगाला अधिक संरक्षण मिळेल.” चीनवर थेट हल्ला ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आणि म्हटले की अमेरिकेचे भविष्य “पिट्सबर्गच्या ताकदीने आणि अभिमानाने” बांधले पाहिजे, “शांघायच्या कनिष्ठ स्टीलवर” अवलंबून न राहता. हे विधान चीनसोबत सुरू असलेल्या व्यापार तणावाचे अधिक स्पष्ट प्रतिबिंबित करते. उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता पोलादावरील आयात शुल्क दुप्पट केल्याने गृहनिर्माण, ऑटोमोबाईल आणि बांधकाम क्षेत्रांसारख्या स्टीलवर अवलंबून असलेल्या उद्योगांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2018 पासून लागू केलेल्या स्टील टॅरिफनंतर आतापर्यंत स्टील उत्पादनांच्या किमती सुमारे 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ट्रम्प यांचे व्यापार संरक्षण धोरण सुरूच राष्ट्रपती ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्या सातत्यपूर्ण व्यापार संरक्षण धोरणाचा एक भाग आहे. जानेवारीमध्ये पुन्हा सत्तेत आल्यापासून त्यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमवर 25 टक्के टॅरिफ लादला होता, जो मार्चपासून लागू झाला. त्यांनी कॅनेडियन स्टीलवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकीही दिली होती, परंतु नंतर ती मागे घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टीलवरील शुल्क दुप्पट; 4 जूनपासून होणार लागू Read More »