DNA मराठी

Congress

congress

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Zilla Parishad Election: राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,  विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान,  अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत,  आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम,  अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण,  माजी मंत्री वसंत पुरके,  माजी आमदार धिरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अक्षय राऊत व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर Read More »

Vijay Wadettiwar: पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार; चंद्रपूरबाबत विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

Vijay Wadettiwar : चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात पाच वर्ष काँग्रेसचा महापौर असणार,सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार अस सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला. चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाल्याने चंद्रपुरात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपचे कोणतेही नेते कितीही ओरडले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार अस,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज ठासून सांगितले. नेत्यांमध्ये गैरसमज होत असतात पण कार्यकर्ता हा महत्वाचा असल्याने त्यांना समाधान वाटेल असा निर्णय घेण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्टं केले. चंद्रपुरात महापौर बसविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा झाली आहे. शिवसेना हा पक्ष काँग्रेस बरोबर सत्तेत असेल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 29 महापालिका निकडवणुकांसाठी आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली.पण ही फिक्सिंग होती,पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पाडली गेलीं नाही. भाजपचे नगरसेवक निवडून त्या सोयीने आरक्षण पडल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात खुला महिला प्रवर्ग आला त्यासाठी भाजपचे महापौर पदाच्या उमेदवार शिवानी दाणी ठरल्या होत्या आणि आज तसेच आरक्षण पडले असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. मुंबईतील मनसे नेत्यांनी चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे तारे तोडले याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे हे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले? लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम मनसेने करू नये. मनसे भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसने केली तर चालेल का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात भाजप आणि MIM हे पक्ष एकत्र आहेत, ते रात्री एकत्र जेवतात दिवसा भांडतात.काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.त्यांना रसद कोण पुरवते,ताकद कोण देते हे महाराष्ट्रातील जनतेला कळेल अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. वाराणसी येथील मणिकर्णिका घाट भाजप सरकारने जमीनदोस्त केला.आता भाजपचे नेते का बोलत नाही? भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकी पुरता आहे ,सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करतात अशी टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Vijay Wadettiwar: पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार; चंद्रपूरबाबत विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी

Harshwardhan Sapkal: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे. या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे. मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी Read More »

jaykumar gore on praniti shinde

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार?

Jaykumar Gore on Praniti Shinde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल ‘बालाजी सरोवर’ येथे खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रणिती शिंदें यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा शेलक्या आणि आक्षेपार्ह शब्दांत प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा दिला. यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली. “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधी पक्ष म्हणून एमआयएम भूमिका बजावणार आहे.

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार? Read More »

nana patole

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी

Nana Patole: राज्यात नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग महाराष्ट्रातच EVM चा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात आहेत. या जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणाले की, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला, त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतीला पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लोकशाहीच्या कणा आहेत, या निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे म्हणून जनभावनेचा विचार करून या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे नाना पटोले या पत्रात म्हणाले आहेत.

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला; हर्षवर्धन सपकाळ CM फडणवीसांवर भडकले

Harshwardhan Sapkal: नांदेड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नांदेड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर व खळबळजनक घटना घडली आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या या निवडणुक कूनितीची ही फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. सोलापूरात एका उमेदवाराचा खुन झाला, राज्यातील अनेक उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्यात आले. त्याचीच प्रचिती आज नांदेड मध्ये ही मिळाली. विशेष म्हणजे हे सगळे उमेदवार विरोधी पक्षातीलच आहेत, जे आज सत्तेत बसलेल्या गुंड, मवाल्यांच्या भ्रष्टयुतीला भिडण्याची हिंमत दाखवताहेत. ते लढताहेत हीच त्यांची चुक आहे का ? याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने चांगलीच ओळखलीय, आणि तेच ही विषवल्ली आता कापल्याशिवाय थांबणार नाही.

Harshwardhan Sapkal: काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला; हर्षवर्धन सपकाळ CM फडणवीसांवर भडकले Read More »

asaduddin owaisi

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले

Asaduddin Owaisi : अहिल्यानगर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना नगरचा महापौर आम्ही ठरावावर असा दावा एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केल्याने शहरातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त आणि जर त्यांनी पैसे वाटले तर पैसे घ्या आणि त्या पैशातून त्यांच्याच नावाने शौचालय बांधा असा टोला देखील लावला आहे. बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या. तिथे महिलांनी एकत्र येऊन एमआयएमला मतदान केलं. पुरुषांनी मतदान दिलं नाही तरी त्यांच्या घरातील महिलाच एमआयएमला मत देणार. एमआयएमला इथवर पोहोचवण्यात महिलांचा वाटा सर्वात मोठा आहे असं देखील या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले. महापौर नगरचा MIM च ठरवेल जर तुम्ही आमचे सहा उमेदवार जिंकून दिले तर आम्ही नगरचा महापौर ठरवणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच या निवडणुकीत मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं,असं सांगत त्यांनी मतदारांना निर्भय मतदानाचं आवाहन केलं. विरोधक पैशाच्या जोरावर लढत आहेत पैसे न पाहता विकास पाहा. 15 तारखेला न घाबरता मतदान करा असा स्पष्ट संदेश दिला.

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले Read More »

imtiaz jaleel

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

BJP MIM Alliance: राज्यातील राजकारणात चर्चेत आलेल्या अकोट नगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अकोटकडे लागले आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शहरातील विकासासाठी अकोट विकास आघाडीची स्थापना करत भाजपने एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह युती केली आहे. भाजपने थेट एमआयएमशी युती केल्याने विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युती झाली असून स्थानिक पातळीवर ज्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपसोबत युती मान्य नसून युती तोडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अकोटमध्ये भाजपशी युती होणार नाही. युती तोडण्याचे आदेश दिले आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र

Maharashtra Politics : एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे नुकतंच अकोट पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. अकोट येथे नुकतंच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकले होते मात्र बहुमतपासून पक्ष दूर होता. तर आता अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने एक आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीमध्ये एमआयएमला देखील स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून आता भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने या आघाडीत एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्थान दिले आहे. तर वंचित आणि काँग्रेसला या आघाडीपासून दूर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता या आघाडीवर एमआयएम आणि भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोट नगरपालिका एकूण जागा : 35 निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार) पक्षीय बलाबल : भाजप : 11 काँग्रेस : 6 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 वंचित : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3 एमआयएम : 5 भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या ‘अकोट विकास मंचा’चे पक्षीय बलाबल : भाजप : 11 एमआयएम : 5 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र Read More »

suresh kalmadi

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

Suresh Kalmadi  passed away  : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 82 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांनी अगदी कमी वेळेत पुण्यातील राजकारणा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरेश कलमाडी काही काळापासून ते आजाराशी झुंज देत होते. कोण होते सुरेश कलमाडी ? सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर 1964 मध्ये हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी ते जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले. 1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या 38 व्या वर्षी, 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत खासदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर जवळपास तीन दशके त्यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2010 नंतर मात्र त्यांच्या राजकीय वाटचालीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणामुळे त्यांना मोठ्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले तसेच सुमारे नऊ महिने कारावासही भोगावा लागला.

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन Read More »