DNA मराठी

Ashish Shelar

ashish shelar

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन

Ashish Shelar : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे. ज्येष्ठ पुरस्कार नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025) युवा पुरस्कार नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर(2025). सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन Read More »

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश

Ashish Shelar: गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद असून गेल्या तीन महिन्यातील मोहीमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत वाढत असलेले डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक मंत्रालयात आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच सरकारच्या आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मुंबईत मलेरियाचे 1 जून ते 21 जून या कालावधीत 554 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 71 तर चिकनगुनियाचे 6, लेप्टोस्पायरसिस 24, गॅस्ट्रो 620 रुग्ण आढळून आले आहेत 2024 जानेवारी ते मे या कालखंडात मलेरियाचे 1612 रुग्ण आढळले होते तर यावर्षी 1973 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे 338 रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते तर जानेवारी ते मे 2025 या कालखंडात 347 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने 1 जून ते 21 जून 2025 या कालखंडामध्ये सहा लाख 39 हजार 430 घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण 30 लाख 56 हजार 528 लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. एकूण 1 लाख 2 हजार 243 रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या 62,484 आहे तर यासाठी 37 शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन 5,108 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरित केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या 21,429 असून पाण्याच्या जंतू करण्यासाठी क्लोरीन टॅब चे वितरणाची संख्या 11, 086 आहे 1 जून ते 21 जून या कालावधीत ह्या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच मलेरिया नियंत्रणासाठी 17 हजार 82 इमारतींची तपासणी केली केल्याची माहिती दिली. डास मारण्यासाठी 35 हजार 911 इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून 5 लाख 58 हजार 261 झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवा असे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केला तर एक जून ते 21 जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूळकांची संख्या 1741 तर पिंजरे लावून पकडलेल्या मोक्षकांची संख्या 2015 आहे. 17 वॉर्ड मध्ये 17 संस्था हे काम करतात तर पिंजरा लावून मुषक पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून उंदीर किती मारले? कुठे टाकले ? किती विभागात ती कारवाई करण्यात आली ? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का ? या सर्वांची तीन महिन्याची चौकशी करण्यात यावी गेली अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि तीन टर्म विधानसभेचा आमदार म्हणून मुंबईत काम करत असून ही आपल्याला अशा प्रकारचे उंदीर कधी मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. पिंजरा कुठे लावला असे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश Read More »

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

दरवर्षी 21 एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

Ashish Shelar: चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन 21 एप्रिल 1993 रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला 112 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपताका या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी जाहीर केले. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते मुहूर्ताचा क्लॅप देऊन करण्यात आले. यावेळी चित्रपताका महोत्सवाच्या शीर्षकगीताचे लोकार्पण करण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम, ज्येष्ठ चित्रपटकर्मी जब्बार पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी आपल्याला कलाकार म्हणून मोठे करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. राज्याच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात सगळ्या मान्यवरांसमोर आपला सत्कार झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. प्रेक्षकांना आनंद मिळेपर्यंत काम करत राहणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासारख्या द्रष्ट्या मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजना सुरू होत आहेत, त्याचा मराठी कलाकारांना भविष्यात निश्चित फायदा होणार आहे, असा विश्वासही सराफ यांनी व्यक्त केला. रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ हा चित्रपट यावेळी महोत्सवाचा उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. विशेष सांस्कृतिक कार्यक्रम जुई बेंडखळे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाण्यावर नृत्य सादर केले. प्रसिध्द अभिनेत्री श्रेय बुगडे हिच्या निवेदनात रंगलेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. प्रसिध्द संगीतकार अजय अतुल यांच्या गाण्यावर अभिनेत्री मीरा जोशी यांनी नृत्य सादर केले. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने नृत्य सादर केले. राज्य सरकारची नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या अभिनेता सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांनी दिली. पुढचे चार दिवस ही योजना मोफत असून त्यानंतर नाममात्र दरात ही योजना सुरू राहणार आहे. इच्छुक नवोदित कलाकारांनी अकादमी येथे येऊन ऑडिशन द्यायची. या ऑडिशनमधून निर्माते दिग्दर्शक यांना कलाकारांची निवड करता येणार आहे. चित्रपताका महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 22 एप्रिलला दुपारी 12 वाजता ‘काल आज आणि उद्याचे मराठी चित्रपट – गीत, संगीत, शब्द, सूर आणि तंत्र’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन संगीतकार कौशल इनामदार करणार आहेत. दुपारी 3 वाजता प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांची मुलाखत अभिनेते, गीतकार किशोर कदम घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता चित्रपटाचे तंत्र आणि त्यातील सध्याच्या संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात उज्ज्वल निरगुडकर, पंकज सोनावणे, सुप्रिया पाटणकर सहभागी होणार असून सूत्रसंचलन सौमित्र पोटे करणार आहेत.

दरवर्षी 21 एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव Read More »