DNA मराठी

Asaduddin Owaisi

img 20260826 wa0004

IPS Vaibhav Gaikwad : तेलंगणात IPS वैभव गायकवाड यांच्या कारवाईची गुन्हेगारांमध्ये धास्ती

IPS Vaibhav Gaikwad : महाराष्ट्रातील धडाडीचे अधिकारी म्हणून IAS तुकाराम मुंडे यांची कार्यशैली चर्चेत असताना, अहिल्यानगरच्या मातीतून भारतीय पोलीस सेवेत गेलेल्या एका अधिकाऱ्याने तेलंगणात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे. पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी असलेले 2018 बॅचचे IPS अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड सध्या हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून जबाबदारी सांभाळत असून संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध धंदे आणि अन्नभेसळीविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई सुरू आहे. तेलंगणा कॅडरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर गायकवाड यांच्या सेवेला नालगोंडा जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर वरंगळ येथे Assistant Superintendent of Police म्हणून त्यांनी काम पाहिले. याच ठिकाणी Additional DCP Administration आणि Task Force अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. पुढे पेद्दापल्ली आणि नागरकर्नूल जिल्ह्यांचे Superintendent of Police म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. विविध ठिकाणी काम करताना कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगचा व्यापक अनुभव त्यांनी मिळवला. डिसेंबर 2025 पासून ते हैदराबाद शहराच्या Task Forceचे नेतृत्व करत आहेत. हैदराबादमधील Task Forceकडे संघटित गुन्हेगारी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे, गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा छडा लावण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. संवेदनशील धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही हे पथक महत्त्वाची भूमिका बजावते. अन्नभेसळीविरोधात H-FASTची धडक मोहीम गायकवाड यांच्या कार्यकाळातील लक्षवेधी उपक्रमांपैकी एक म्हणजे H-FAST — Hyderabad Food Adulteration Surveillance Team. मार्च 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे अन्नभेसळीविरोधात पोलिस आणि अन्नसुरक्षा यंत्रणेचा समन्वय साधत कारवाई केली जात आहे. गुप्त माहिती, नागरिकांच्या तक्रारी आणि क्षेत्रीय माहितीच्या आधारे संशयित ठिकाणे शोधून Food Safety Officers आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने संयुक्त छापे टाकले जात आहेत. नमुने संकलित करणे, पुरावे गोळा करणे, भेसळीचा स्रोत शोधणे आणि संपूर्ण पुरवठा साखळीचा मागोवा घेण्यावर भर दिला जात आहे. मार्च 2026 पासून आतापर्यंत 208 गुन्हे दाखल, तर 232 प्रकरणे Food Safety Officersकडे सोपविण्यात आली आहेत. या कारवाईत तब्बल 2 लाख 92 हजार 298 किलो, म्हणजेच सुमारे 292 टन भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. मसाले, तूप, दुग्धजन्य पदार्थ, मांसजन्य पदार्थ, चहा, फळे, बेकरी उत्पादने आणि Ginger-Garlic Paste यांसह विविध खाद्यपदार्थांचा त्यात समावेश आहे. तपासात काही ठिकाणी Synthetic Colours, Fabric Dye Colours, Palm Oil, Vanaspati, Starch आणि इतर अपायकारक पदार्थांचा वापर करून खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे H-FASTची कारवाई केवळ दुकानदारांपुरती मर्यादित न राहता भेसळीच्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अमली पदार्थांविरोधातही मोठी कारवाई हैदराबाद City Narcotics Wingची जबाबदारीही वैभव गायकवाड यांच्याकडे आहे. मागील आठ महिन्यांत या विभागाने अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून 400 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एका मोठ्या कारवाईत सुमारे 3 कोटी रुपयांचे Hash Oil जप्त करण्यात आले. तर दुसऱ्या महत्त्वपूर्ण तपासात झारखंडमधील रांची आणि मुंबई येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली. Speed Postच्या माध्यमातून देशातील सुमारे 22 राज्यांमध्ये गांजाचा पुरवठा केला जात असल्याचे तपासात समोर आले. मुंबईत लोकल ट्रेनच्या माध्यमातून गांजाची घरपोच डिलिव्हरी केली जात असल्याचाही पर्दाफाश झाला. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपयांचे ड्रग नेटवर्क उघडकीस आणण्यात आले. अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभागी असलेल्या तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 35 विदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले असून त्यांच्या भारतातील पुनःप्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. ‘Supply’सोबत ‘Demand’वरही लक्ष नार्कोटिक्सविरोधातील मोहीम केवळ तस्करांना पकडण्यापुरती मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. सरकारी रुग्णालयांमधील De-addiction Centresच्या माध्यमातून व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनासाठी पाठविले जात आहे. हैदराबाद शहरात अलीकडच्या काळात सुमारे 2 हजार व्यक्तींची Drug Testing करण्यात आली. त्यापैकी सुमारे 800 जण Drug Positive आढळले असून त्यांना पुढील व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी करण्यात आले. विशेष म्हणजे या गटात केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचाच समावेश नसून Street Crimeमध्ये सहभागी व्यक्तींपासून ते IT आणि अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित व्यक्तींपर्यंत विविध स्तरांतील नागरिक आढळून आले. त्यामुळे अमली पदार्थांविरोधातील लढ्यात Supply आणि Demand या दोन्ही बाजूंवर एकाचवेळी लक्ष केंद्रित केले जात आहे. तस्करीची साखळी तोडण्यासोबतच व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अहिल्यानगरच्या भूमिपुत्राची तेलंगणात ठसा उमटवणारी कामगिरी पिंपळगाव माळवीसारख्या ग्रामीण भागातून भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या वैभव गायकवाड यांनी तेलंगणातील विविध आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. Task Force, Narcotics Wing आणि H-FASTसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमधून कठोर कारवाईसोबतच intelligence-based policing, तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर त्यांनी भर दिला आहे. अन्नभेसळ करणारे व्यावसायिक, अमली पदार्थांचे तस्कर, संघटित गुन्हेगारीतील आरोपी आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरोधातील सातत्यपूर्ण कारवाईमुळे हैदराबादमध्ये कायदा मोडणाऱ्यांवर पोलिसांचा दबाव वाढला आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेला हा अधिकारी तेलंगणात कर्तव्य बजावत असताना आपल्या कामगिरीने अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

IPS Vaibhav Gaikwad : तेलंगणात IPS वैभव गायकवाड यांच्या कारवाईची गुन्हेगारांमध्ये धास्ती Read More »

asaduddin owaisi

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले

Asaduddin Owaisi : अहिल्यानगर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना नगरचा महापौर आम्ही ठरावावर असा दावा एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केल्याने शहरातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त आणि जर त्यांनी पैसे वाटले तर पैसे घ्या आणि त्या पैशातून त्यांच्याच नावाने शौचालय बांधा असा टोला देखील लावला आहे. बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या. तिथे महिलांनी एकत्र येऊन एमआयएमला मतदान केलं. पुरुषांनी मतदान दिलं नाही तरी त्यांच्या घरातील महिलाच एमआयएमला मत देणार. एमआयएमला इथवर पोहोचवण्यात महिलांचा वाटा सर्वात मोठा आहे असं देखील या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले. महापौर नगरचा MIM च ठरवेल जर तुम्ही आमचे सहा उमेदवार जिंकून दिले तर आम्ही नगरचा महापौर ठरवणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच या निवडणुकीत मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं,असं सांगत त्यांनी मतदारांना निर्भय मतदानाचं आवाहन केलं. विरोधक पैशाच्या जोरावर लढत आहेत पैसे न पाहता विकास पाहा. 15 तारखेला न घाबरता मतदान करा असा स्पष्ट संदेश दिला.

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले Read More »

sanjay shirsat

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यात तो एक नंबरचा माहीर आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, ते कार्यकर्ते याच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे होते. मात्र इम्तियाज जलीलने पैसे घेऊन तिकीटे विकली आणि त्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावले. त्यामुळेच आज कार्यकर्ते आपला संताप व्यक्त करत आहेत. “जैसी करणी, वैसी भरणी” हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळाले आहे. जे “शेर आया, शेर आया” म्हणत होते, त्याच इम्तियाज जलीलला आज पळावे लागत आहे. “जनता मेरे साथ है” म्हणणारा आज शेपूट घालून पळत आहे, आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. इम्तियाज जलीलने जे केले, त्याची किंमत त्याला मोजावी लागत आहे. पोलीस संरक्षणात गुंड पाठवण्याची गरज नाही. ज्यांनी दगडफेक केली किंवा हल्ला केला, त्यांना पोलिसांनी पकडून का मारले याची चौकशी केली पाहिजे. “माझे कोणी वाकडे करू शकत नाही, ओवेसी माझ्यासोबत आहे,” अशी जी इम्तियाज जलीलची मस्ती होती, त्याचे उत्तर आज त्याला मिळाले आहे. ओवेसी भडक भाषण करून मुस्लिम समाज माझ्यासोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, मात्र त्याला उत्तर कार्यकर्त्यांनी आधीच दिले आहे.

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले Read More »

imtiaz jaleel

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

BJP MIM Alliance: राज्यातील राजकारणात चर्चेत आलेल्या अकोट नगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अकोटकडे लागले आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शहरातील विकासासाठी अकोट विकास आघाडीची स्थापना करत भाजपने एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह युती केली आहे. भाजपने थेट एमआयएमशी युती केल्याने विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युती झाली असून स्थानिक पातळीवर ज्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपसोबत युती मान्य नसून युती तोडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अकोटमध्ये भाजपशी युती होणार नाही. युती तोडण्याचे आदेश दिले आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा Read More »

IMG 20250501 WA0005 833x1024

वक्फ सुधारणा कायदाचा निषेध, ‘लाईट बंद’ आंदोलनाला नगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Waqf Amendment Act : केंद्र सरकारने लागू केलेल्या वक्फ सुधारणा कायदा 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी 30 एप्रिल रोजी घरामधील, आपल्या परिसरातील आणि कार्यालयातील लाईट बंद करून निषेध करण्याचे आवाहन केले होते. या अहवानाला संपूर्ण देशात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. देशातील अनेक शहरात बुधवारी रात्री 9 ते 9.15 पर्यंत लाईट बंद करून केंद्र सरकारने लागू केलेल्या वक्फ सुधारणा कायदा 2025 कायदाचा निषेध करण्यात आले तसेच सरकारने कायदा मागे घ्यावा अशी मागणी देखील यावेळी नागरिकांमधून करण्यात आली. नगर शहरात देखील 30 एप्रिलच्या रात्री 9 वाजता अनेक भागात लाईट बंद करून या कायदाचा निषेध करण्यात आले. अनेक भागात 9 ते 9.15 पर्यंत लाईट बंद ठेवण्यात आली होती. तसेच या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून फिरता बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगर शहरातील नागरिकांनी 9 ते 9.15 पर्यंत लाईट बंद ठेवून वक्फ सुधारणा कायदा 2025 चा निषेध केला. तर दुसरीकडे जेव्हापर्यंत सरकार कायदा मागे घेणार नाही तेव्हापर्यंत आम्ही विरोध करणार अशी प्रतिक्रिया एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

वक्फ सुधारणा कायदाचा निषेध, ‘लाईट बंद’ आंदोलनाला नगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

Asaduddin Owaisi

Delhi Assembly Election: आप-काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओवेसींची एन्ट्री, ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देणार

Delhi Assembly Election: पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयएम देखील उमेदवार देणार असल्याची घोषणा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी पक्षाकडून मुस्तफाबादमधून ताहीर हुसेन यांच्या नावाची घोषणा देखील पक्षाकडून करण्यात आली आहे. माहितीनुसार एआयएमआयएम दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 10 जागांवर निवडणुक लढवणार आहे. एआयएमआयएमच्या या घोषणेनंतर सत्ताधारी आम आदमी पक्षाला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे एआयएमआयएमने केवळ ताहिर हुसैन यांना तिकीट दिले नाही तर 18 डिसेंबर रोजी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या मतदारसंघात रॅलीही काढली. मुस्लीमबहुल मुस्तफाबाद येथे रॅली काढताना ओवेसी म्हणाले की, राजकारणात मुस्लिमांना कोणीही नेतृत्व देऊ इच्छित नाही. त्यांचे नेतृत्व कोणालाही सहन होत नाही. ते म्हणाले की भारतातील प्रत्येक समुदायाला राजकीय नेतृत्व आहे परंतु मुस्लिमांसाठी राजकीय नेतृत्व तयार करण्यात लोकांना अडचणी येतात. एआयएमआयएम दिल्लीतील दहा विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मुस्तफाबाद या एका जागेसाठी ताहिर हुसेन यांची नावे आधीच जाहीर करण्यात आली आहेत. पक्ष लवकरच 9 जागांची घोषणा करेल. ओवेसी यांचा पक्ष सीलमपूर, बाबरपूर, बल्लीमारन, चांदनी चौक, ओखला, जंगपुरा, सदर बाजार, मतिया महल आणि करावल नगर या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. आम आदमी पक्षाने 10 पैकी 9 जागा जिंकल्यादिल्लीचे राज्य प्रभारी इम्तियाज जलील म्हणाले की, पक्ष सर्वेक्षण करत आहे जेणेकरून योग्य उमेदवार उभे करता येतील. वृत्तांवर विश्वास ठेवला तर AIMIM ने ज्या 10 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यापैकी 9 जागांवर मुस्लिम बहुल आहेत. या जागा आम आदमी पक्षाकडे आहेत.

Delhi Assembly Election: आप-काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओवेसींची एन्ट्री, ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देणार Read More »

Asaduddin Owaisi

Asaduddin Owaisi : सोलापुरात ओवेसींचा भाषण अन् भर मंचावर पोलिसांनी बजावली नोटीस, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

Asaduddin Owaisi : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ने देखील 16 जागांवर उमेदवार दिले आहे. 13 नोव्हेंबर रोजी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोलापूरमध्ये फारुख शा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत असताना सोलापूर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. नोटीसमध्ये काय होते?नोटीसमध्ये पोलिसांनी ओवेसी यांना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नयेत आणि त्यांच्या भाषणात भडकाऊ शब्द वापरू नयेत असे निर्देश दिले आहेत. ओवेसींनी नोटीस स्वीकारून आपल्या भाषणात याचा उल्लेख करत पोलिसांकडून देण्यात आलेल्या नोटीस मध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती नोटीस बजावले असं सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला. याच बरोबर त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी फारुख शाब्दी यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.

Asaduddin Owaisi : सोलापुरात ओवेसींचा भाषण अन् भर मंचावर पोलिसांनी बजावली नोटीस, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय? Read More »

IMG 20240930 WA0010

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी

Maharashtra Election :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तसेच पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.   तर दुसरीकडे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. परवेज अशरफी यांनी लोकसभेसाठी देखील अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली.  तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे सवरक्षण करतात.  तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे.  जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको. यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल.

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी Read More »

IMG 20240623 WA0000

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा

Ahmednagar News: शहरातील रामवाडी परिसरात 18 जून रोजी झालेल्या   वादाला जाणून बुजून धार्मिक रंग देऊन शहरात मोठी दंगल घडून आण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झाली नाही तर जन आंदोलन उभारू असं देखील अशरफी म्हणाले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रामवाडी भागात स्थानिक नागरिकांत 18 जुन 2024 रोजी किरकोळ वाद झाले होते मात्र ते मिटून घेण्यात आली होती.  मात्र तरही बजरंग दल आणि काही जातीवादी संघटनेचे  पदअधिकारी यांनी 40-50 गुंड हत्यारे, दांडके घेऊन रामवाडीत आले होते त्यावरून या लोकांना शहरात दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत होते हे दिसून येत आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कते मुळे या गुंड्यांचा डाव फसला असं अशरफी यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंड्यांचा डाव फसल्याने त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी शहराचा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.  या सगळ्या घेटने मागील  मास्टर माईंड बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याने 4 दिवसात या आरोपीला अटक करावी   नाहीत तर कोणतीही पूर्व सूचना न देता पुणे औरंगाबाद महामार्गावर आम्ही समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करणार असा इशारा अशरफी यांनी दिला आहे.

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा Read More »

Asaduddin Owaisi

AIMIM ने केली ‘इतक्या’ लोकसभा उमेदवारांची घोषणा; कोणाचा खेळ बिघडवणार ?

AIMIM Lok Sabha Candidate: ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने लोकसभा निवडणूक 2024 तीन लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. तर येत्या काही दिवसात आणखी काही उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे.  पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी माहिती देत सागितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी  औरंगाबादमधून इम्तियाज जलील आणि किशनगंजमधून अख्तरुल इमान हे एआयएमआयएमचे उमेदवार असतील. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी स्वतः तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.  त्यांनी सांगितले की, लवकरच बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये उमेदवार जाहीर केले जातील. AIMIM महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार एआयएमआयएम पक्ष बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात किती जागा लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. ही वेगळी बाब आहे की पक्षाचे नेते सय्यद इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे आणि विदर्भातील एका मतदारसंघाचा समावेश आहे. AIMIM बिहारमध्ये 11 जागांवर निवडणूक लढवू शकते एआयएमआयएम बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील पक्षाध्यक्षांशी चर्चा करत आहे. लवकरच येथेही उमेदवार जाहीर केले जातील. बिहारमध्ये पक्ष 11 जागा लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्ष यावेळी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवणार आहे.  काँग्रेस, समाजवादी  आणि राजद यांचं टेन्शन वाढणार ? एआयएमआयएमने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे केल्यास निश्चितच नुकसान होईल. कारण AIMIM चा मतांचा आधार मुस्लिम आहे.  समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि राजद यांचाही हा आधार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील औरंगाबादमधून विजयी झाले होते, तर ओवेसी हैदराबादमधून खासदार आहेत. अख्तरुल इमान हे बिहार विधानसभेचे आमदार आहेत.

AIMIM ने केली ‘इतक्या’ लोकसभा उमेदवारांची घोषणा; कोणाचा खेळ बिघडवणार ? Read More »