DNA मराठी

Ahilyanagar Police

Police

Indipendent Day : भारत सरकारकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस सेवेकरीता पदके जाहीर

Indipendent Day : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकार यांचेकडून देशातील पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांनी पोलीस दलात केलेल्या सेवेबद्दल 1) गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक 2) 25 वर्षे सेवा कालावधीकरीता दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक व 3) 15 वर्षे सेवा कालावधीकरीता उत्कृष्ट सेवा पदक असे तीन प्रकारचे पदक प्रदान करण्यात आलेले आहेत.भारत सरकार यांचेकडून अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये नेमणुकीस असलेल्या खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार खालीलप्रमाणे पदक प्रदान करण्यात आले आहे. गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकअ.क्र पदनाम नाव नेमणुक1 श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संपत मुरलीधर खैरे सुपा पोस्टे2 श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शैलेश चंद्रकांत उपासने ना.ह.स3 सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद पोलीस मुख्यालय अति-उत्कृष्ट सेवा पदक (25 वर्ष सेवा पुर्ण)अ.क्र पदनाम नाव नेमणुक1 सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजी थोरात MIDC पो.स्टे2 श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनोहर नामदेव शेजवळ वाचक शाखा 13 सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद पोलीस मुख्यालय4 सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जबाजी खंडागळे पोलीस मुख्यालय5 सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय गोरखनाथ लोंढे बिनतारी संदेश दळणवळण उत्कृष्ट सेवा पदक (15 वर्ष सेवा पुर्ण)अ.क्र पदनाम नाव नेमणुक 1 पोलीस उपनिरीक्षक किरण भास्कर शेलार श.वा.शा शिर्डी 2 सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण प्रकाश शेलुकर वाचक शाखा 13 पोलीस हवालदार सचिन वसंत पवार वाचक शाखा 14 पोलीस हवालदार रेहान अजिज शेख वाचक शाखा 15 पोलीस हवालदार कृष्णा नाना कुऱ्हे शिर्डी पोलीस ठाणे 6 पोलीस हवालदार दिगंबर रावसाहेब कारखिले आर्थिक गुन्हे शाखा 7 पोलीस हवालदार रंगानाथ जयराम नरसाळे मोटार परिवहन विभाग 8 पोलीस हवालदार मल्लिकार्जुन कैलास बनकर आर्थिक गुन्हे शाखा 9 पोलीस हवालदार कृष्णा बबनराव विधाटे जिल्हा विशेष शाखा 10 पोलीस हवालदार राजु आप्पासाहेब सुद्रिक MIDC पो.स्टे11 पोलीस हवालदार संदिप कचरु पवार MIDC पो.स्टे12 पोलीस हवालदार संतोष बापुराव ओव्हळ उविपोअ अहिल्यानगर शहर 13 पोलीस हवालदार सचिन महादेव जाधव उविपोअ अहिल्यानगर शहर 14 पोलीस हवालदार दिपक भास्कर घाटकर स्थानिक गुन्हे शाखा 15 पोलीस हवालदार अभिजीत दत्तात्रय अरकल स्थानिक गुन्हे शाखा 16 पोलीस हवालदार सुयोग संजय सुपेकर स्थानिक गुन्हे शाखा 17 पोलीस हवालदार सुरेश चंद्रकांत माळी वाचक शाखा 218 पोलीस हवालदार माधुरी साहेबराव तोडमल वाचक शाखा 119 पोलीस हवालदार किर्ती जगन्नाथ कांजवणे वाचक शाखा 120 पोलीस हवालदार भाग्यश्री गंगाधर भिटे स्थानिक गुन्हे शाखा 21 पोलीस हवालदार राहुल भाऊसाहेब सोळुंके जिल्हा विशेष शाखा 22 पोलीस हवालदार अमोल बाबासाहेब घुले वाचक शाखा 1 भारत सरकार यांचेकडून अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील वर नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार गुणवत्तापुर्ण व उत्कृष्ट सेवा बजावल्याने पदक प्रदान करण्यात आलेले आहे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर हे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करणार आहेत.

Indipendent Day : भारत सरकारकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस सेवेकरीता पदके जाहीर Read More »

img 20260726 wa0003

Ahilyanagar Police: पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का?

Ahilyanagar Police : “साहेब… माझी मुलगी सापडेल ना?” हा प्रश्न एखादी आई किंवा वडील विचारतात, तेव्हा तो केवळ एक प्रश्न नसतो; तो त्यांच्या उरात धडधडणाऱ्या भीतीचा आक्रोश असतो. त्या एका वाक्यामध्ये असहाय्यता असते, वेदना असते, आशा असते आणि आपल्या लेकराला पुन्हा एकदा मिठी मारण्याची तळमळ असते. मुलगी घरातून बाहेर पडते आणि परत येत नाही, तेव्हा एका घरातील भिंतीही निःशब्द होतात. आईचा घास अडकतो, वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते, भावंडांच्या चेहऱ्यावरचे हसू हरवते. प्रत्येक फोनची रिंग हृदयाचा ठोका चुकवते आणि प्रत्येक दार ठोठावल्याचा आवाज आशेचा किरण वाटतो. अशा वेळी त्या कुटुंबाची पहिली धाव असते ती पोलीस ठाण्याकडे. कारण त्यांना विश्वास असतो की, आता त्यांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उभी राहील. पण इथेच एक प्रश्न समाजाच्या मनात पुन्हा पुन्हा उभा राहतो पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? हा प्रश्न कोणावर आरोप करण्यासाठी नाही. हा प्रश्न एका आईच्या अश्रूंनी विचारला आहे. हा प्रश्न त्या वडिलांच्या काळजीने विचारला आहे, जे रात्रभर रस्त्यावर मुलीचा फोटो घेऊन भटकत असतात. हा प्रश्न त्या समाजाने विचारला आहे, ज्याला आजही प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. हरवलेल्या मुलीची तक्रार म्हणजे केवळ कागदावरची एक नोंद नसते. त्या तक्रारीच्या मागे अनेक शक्यता दडलेल्या असतात. कदाचित ती सुरक्षित असेल, कदाचित एखाद्या संकटात अडकली असेल, कदाचित कोणाच्या फसवणुकीची बळी ठरली असेल. म्हणूनच अशा प्रत्येक तक्रारीकडे वेळेशी स्पर्धा करत पाहणे आवश्यक असते. तपासशास्त्र सांगते की, सुरुवातीचे काही तास हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात. त्या वेळेत घेतलेला एक योग्य निर्णय एखाद्या मुलीचे आयुष्य वाचवू शकतो. आपल्या पोलीस दलात अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि माणुसकी जपणारे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. अनेकांनी जीव धोक्यात घालून हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले आहे. अशा अधिकाऱ्यांचा समाजाला अभिमान आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण पोलीस दलावर टीका करण्यासाठी नाही. परंतु काही कुटुंबांनी व्यक्त केलेले अनुभव दुर्लक्षित करूनही चालणार नाहीत. काही वेळा सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित तातडी जाणवत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करतात. ही भावना खरी असो किंवा गैरसमजुतीतून निर्माण झालेली असो, तिचे निराकरण करणे आवश्यक आहे. कारण नागरिकांचा विश्वास टिकवणे ही कोणत्याही यंत्रणेची सर्वात मोठी जबाबदारी असते. पोलीस अधीक्षक महोदय, आपण संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख आहात. आपल्या एका सूचनेमुळे प्रत्येक पोलीस ठाण्याची कार्यपद्धती बदलू शकते. प्रत्येक अधिकाऱ्याला हे सांगता येऊ शकते की, हरवलेल्या मुलीची तक्रार ही इतर कोणत्याही नियमित प्रकरणासारखी नसते. ती एका कुटुंबाच्या अस्तित्वाशी जोडलेली असते. अशा तक्रारीला प्राधान्य देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर मानवी कर्तव्य आहे. आज आपल्या हातात अत्याधुनिक साधने आहेत. शहरागणिक सीसीटीव्हीचे जाळे उभे राहिले आहे. मोबाईल लोकेशन, डिजिटल ट्रॅकिंग, सोशल मीडिया अलर्ट, तांत्रिक विश्लेषण अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. परंतु या सर्व साधनांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे वेळेवर घेतलेला निर्णय. तक्रार दाखल होताच शोधकार्य सुरू झाले, माहितीचे जाळे सक्रिय झाले, विविध पथके सज्ज झाली आणि कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवला गेला, तर अनेक संकटे टाळता येऊ शकतात. या प्रश्नाकडे समाजानेही जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. मुली हरवल्यानंतर अफवा पसरवणे, सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती शेअर करणे किंवा कुटुंबीयांवरच संशय घेणे, हे अत्यंत अमानुष आहे. अशा वेळी समाजाने शोधकार्यात सहकार्य करणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि कुटुंबाला मानसिक आधार देणे अधिक आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेवर आपण अनेक चर्चा करतो. व्याख्याने होतात, मोहिमा राबवल्या जातात, घोषणाही केल्या जातात. परंतु या सर्वांचा खरा अर्थ तेव्हाच आहे, जेव्हा एखादी आई पोलीस ठाण्यात येऊन “माझी मुलगी हरवली आहे” असे म्हणते आणि तिला पहिल्याच क्षणी विश्वास दिला जातो “काळजी करू नका, आम्ही तातडीने शोध सुरू करतो.” हे चार शब्द त्या कुटुंबासाठी औषधापेक्षाही मोठा आधार ठरू शकतात. पोलीस अधीक्षक महोदय, आपण जिल्ह्यात संवेदनशील प्रशासनाची ओळख निर्माण करू शकता. प्रत्येक पोलीस ठाण्यात हरवलेल्या मुलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र आणि तातडीची कार्यपद्धती असावी. प्रत्येक अधिकाऱ्याला याबाबत नियमित प्रशिक्षण मिळावे. प्रत्येक तक्रारीचा वेळोवेळी आढावा घेतला जावा. कुटुंबीयांना तपासाची माहिती दिली जावी. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी जनतेचा विश्वास अनेक पटींनी वाढवू शकतात. हा लेख टीका करण्यासाठी लिहिलेला नाही. हा लेख एका आईच्या डोळ्यांतून गळालेल्या अश्रूंनी लिहिला आहे. हा लेख त्या वडिलांच्या वेदनेने लिहिला आहे, जे प्रत्येक अनोळखी चेहऱ्यात आपल्या मुलीचा चेहरा शोधत असतात. हा लेख त्या भावंडांच्या शांततेने लिहिला आहे, ज्यांच्या घरात हसण्याचे आवाज अचानक बंद होतात. प्रशासनाची खरी ताकद गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यात नसते; तर संकट येताच तत्परतेने उभे राहण्यात असते. प्रत्येक हरवलेल्या मुलीकडे एका फाईलप्रमाणे नव्हे, तर एका जिवंत आयुष्याप्रमाणे पाहिले गेले पाहिजे. कारण आकडेवारीत एक संख्या कमी-जास्त होऊ शकते, पण एका कुटुंबासाठी त्यांची मुलगी ही संपूर्ण जग असते. म्हणूनच शेवटी पुन्हा एकदा तोच प्रश्न पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? जर उत्तर “नाही” असेल, तर प्रत्येक हरवलेल्या मुलीची तक्रार ही सर्वोच्च प्राधान्याची ठरली पाहिजे. प्रत्येक मिनिट मोलाचे मानले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाला विश्वास दिला पाहिजे की, व्यवस्था त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. कारण प्रत्येक हरवलेल्या मुलीमागे केवळ एक प्रकरण नसते; तर एका आईचा जीव, एका वडिलांचा श्वास, भावंडांचे बालपण आणि एका कुटुंबाचे संपूर्ण विश्व दडलेले असते. त्या विश्वाला पुन्हा उजाळा देण्याची जबाबदारी ही केवळ एका विभागाची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. आणि त्या जबाबदारीची सुरुवात होते ती संवेदनशीलतेपासून.

Ahilyanagar Police: पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? Read More »

img 20260607 wa0080

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातून ७ जून रोजी जेरबंद केले. तीन दिवसांपूर्वी अहिल्यानगर रेल्वे स्टेशन जवळील अरणगाव हद्दीत ही घटना घडली होती. या संदर्भात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिवाजी विठ्ठल मोहिते (वय ५२), राजू रामदास मोहिते (वय ३६, दोघे रा. झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड) अक्षय रामदास मोहिते (वय २७, रा. मालठा ता.हातगाव, जि.नांदेड), छगन दशरथ मोहिते (वय ३६, रा. याडी ता.नेर जि. यवतमाळ) व दिनेश सुदाम जाधव (वय २४, रा.दगडवाडी, ता.हातगाव, जि.नांदेड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी हे झेंडीगुळा लोणी (ता.किनवट, जि. नांदेड) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ झेंडीगुळा लोणी येथील आरोपींच्या घरी छापा टाकुन त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीचे कब्जातून १६ लाख ५० हजार रुपये रोख, एक लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, एक स्विप्ट कार, बनवाट सोन्याची नाणी, कोयता असा एकुण २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड Read More »

Police

Ahilyanagar News : पाथर्डी प्रकरण, न्यायासाठी महिलाचे महिनोनमहिने पोलीस ठाण्यात चक्करा पण…

Ahilyanagar News : पाथर्डी पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावर घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही ती संपूर्ण यंत्रणेच्या संवेदनाहीनतेवर उभा राहिलेला कठोर प्रश्न आहे. न्याय मागण्यासाठी एका पीडित महिलेला महिनोनमहिने पोलीस ठाण्याचे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात, हीच बाब मुळात लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी आहे. त्यातही गँगरेपसारख्या गंभीर आरोपाची तक्रार नोंदवून घेण्यात झालेला विलंब आणि अखेर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलीस ठाण्यात आरोपींकडून दबाव टाकला जाणे, हे अधिक धक्कादायक आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या ठिकाणीच पीडितेला असुरक्षित वाटावे, इतकी परिस्थिती भयावह झाली असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? एका महिलेने आणि तिच्या मुलाने स्वतःवर पेट्रोल ओतण्याइतकी निराशा अनुभवली, याचा अर्थ व्यवस्थेने त्यांना पूर्णतः अपयशी ठरवले आहे. त्या झटापटीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू केवळ अपघात म्हणून नोंदवून चालणार नाही तो व्यवस्थेच्या ढिसाळपणाचा आणि निष्क्रियतेचा परिणाम आहे. या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलीस ठाण्यातील कथित बेजबाबदार कारभार. पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर आधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, अवैध धंदे, कथित कलेक्शन आणि राजकीय पाठबळाच्या आरोपांनी परिस्थिती अधिक गंभीर बनते. जर खरोखरच काही विशिष्ट कर्मचाऱ्यांची “कलेक्शन टीम” कार्यरत असेल, तर ती केवळ एका ठाण्याची समस्या नाही ती संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर आघात करणारी बाब आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसणे किंवा फुटेज उपलब्ध न होणे हा देखील गंभीर मुद्दा आहे. प्रत्येक पोलीस ठाणे हे पारदर्शकतेचे प्रतीक असायला हवे. मात्र, महत्त्वाच्या केबिनमध्येच सीसीटीव्ही नसतील, तर संशय अधिक गडद होतो. विशेषतः अशा घटनेनंतर, पुरावे उपलब्ध नसणे ही बाब अधिक चिंताजनक ठरते. आज प्रश्न केवळ एका गुन्ह्याचा नाही; प्रश्न आहे न्यायप्रक्रियेवरील विश्वासाचा. पीडित महिलेला वेळेत न्याय मिळाला असता, तक्रार तत्काळ नोंदवली गेली असती आणि आरोपींना संरक्षण देण्याचा आभास निर्माण झाला नसता, तर कदाचित एका व्यक्तीचा जीव गेला नसता. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची केवळ चौकशी करून थांबता कामा नये. पाथर्डी पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कारभाराचे स्वतंत्र आणि निष्पक्ष ऑडिट झाले पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या पाहिजेत. कारण, जीव गेल्यानंतर दाखल होणारे गुन्हे आणि नंतर होणाऱ्या चौकशा या मृत व्यक्तीला परत आणू शकत नाहीत; पण वेळेत घेतलेली जबाबदारी भविष्यातील अशा दुर्घटना रोखू शकते.

Ahilyanagar News : पाथर्डी प्रकरण, न्यायासाठी महिलाचे महिनोनमहिने पोलीस ठाण्यात चक्करा पण… Read More »

img 20260508 wa0011

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने?

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहराच्या बाह्य वळण महामार्गावर सध्या वाहतुकीपेक्षा दहशतीचीच अधिक चर्चा आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना ‘बायपासनेच जा’ असा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी चालकांना अडवून मारहाण, दमदाटी आणि पैशांची उकळपट्टी होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. सार्वजनिक रस्ता हा प्रवासासाठी असतो, दहशतीसाठी नव्हे पण नगर बायपासवर सध्या जणू काही लुटारूंचेच राज्य सुरू असल्याचे चित्र दिसते. महानगरपालिकेजवळील काही भागांमध्ये विशेषतः ट्रक चालक, मालवाहतूक करणारे वाहनचालक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांवर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते. “शहरात जायचे असेल तरही बायपासनेच जा” अशी सक्ती केली जाते, अन्यथा शिवीगाळ, मारहाण किंवा वाहन अडवण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ गुंडगिरी नाही, तर कायद्याला थेट आव्हान आहे. प्रश्न असा की, हा हट्ट नेमका कोणाचा? बायपासवरूनच वाहतूक वळवण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? टोल, वसुली, स्थानिक दबावगट की इतर कोणती अदृश्य साखळी? प्रशासनाकडे या प्रश्नांची उत्तरे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण कारवाई मात्र अपुरीच राहिली. काही वेळा तात्पुरती मोहीम राबवली जाते, काही जणांवर कारवाई होते, आणि काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात. म्हणजेच समस्या केवळ व्यक्तींची नसून व्यवस्थेतील शिथिलतेची आहे. बायपास हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतो, भीती निर्माण करण्यासाठी नाही. जर वाहनचालकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निवडताना भीती वाटत असेल, तर तो केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरचा प्रश्न ठरतो. नगर बायपासवरील लूट आणि मारहाणीच्या तक्रारींकडे केवळ “घटना” म्हणून पाहून चालणार नाही. या मागे असलेली साखळी उघड करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि वाहनचालकांना सुरक्षिततेची हमी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, रस्ते विकासाचे प्रतीक न राहता भीतीचे प्रतीक बनतील आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरेल.

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने? Read More »

mummaka sudarshan

Mummaka Sudarshan : मुम्मका सुदर्शन अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; सोमनाथ घार्गे यांची बदली

Mummaka Sudarshan :  जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. घार्गे यांच्या बदलीची चर्चा मागील एका महिन्यापासून सुरू होती. अवघ्या एका वर्षात घार्गे यांनी बदली झाल्याने जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. सोमनाथ घार्गे यांनी वर्षभरापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारल्यावर मोठे बदल करण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या कारकिर्दीत गोवंशीय जनावरांच्या हत्येविरोधात कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे समाजात त्यांच्या विषयी चांगली भावना झाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील आमली पदार्थ तस्करी प्रकरणात थेट जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचारीच दोषी आढळल्याने पोलीस प्रशासनात घार्गे यांच्याबाबत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बडतर्फी आदी प्रकरणेही यामागे असल्याची चर्चा आहे. अशातच घार्गे यांची मुंबई येथील पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश निघाले. तर चंद्रपूर येथील पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरमध्ये बदलीचे आदेशही निघाले. या बदलीमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Mummaka Sudarshan : मुम्मका सुदर्शन अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; सोमनाथ घार्गे यांची बदली Read More »

cockfighting

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime : नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या २१ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेश बोध (वय-२७, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), आशरफ बाहुला खान (वय-५०,रा. आलमगीर ता.जि. अहिल्यानगर), मोहम्मद उस्मान अली शेख (वय-४०, रा. महिम उन्नती सोसायटी मुंबई), अमजद युसुफ मगदुम वय-४३, रा. नागपुरचा येरवडा पुणे), सय्यद अझर अक्तर वय-४०, रा. पंचपिर चावडी अहिल्यानगर), रोहीत श्रीचंद गोहिर (वय-३३, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संदिप ओमप्रकाश कुडीया (वय-३२, रा. वसंत टेकडी अहिल्यानगर), राम हिरालाल क्षत्रिय (वय-४६ रा. भद्रकाली फुले मार्केट नाशिक), तौफिक सिकंदर शेख (वय-२८, रा. नेवसा खुर्द ता.नेवासा), अजहर खुदाबक्श शेख (वय-३४, रा.. मुकुंदनगर अहिल्यानगर), योगेश मनोहर छजलांनी (वय-४०, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संतोष गणेश गोयल (वय- ३९, रा. शाहापुर ता.जि. अहिल्यानगर), विकी लक्ष्मण सुजगोहर वय-४६ रा. येरवडा पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (वय- ४०, रा. भिवंडी जि.ठाणे), अमीन सरदार शेख (वय-४२, रा. गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर), तुषार संतोष मुलतांनी वय-२९ रा. मगळवारपेठ पुणे), समीर फिरोज शेख (वय-२२ रा. अकोले नाका संगमनेर), वसीम सलीम शेख (वय-७० रा. येरवडा पुणे), गोविंद शाम राजुडीया (वय-६३, रा. मंगळवारपेठ पुणे), सोहेल कबीर सय्यद वय-३८ रा. मुकुंदनगर अहिल्यानगर), उत्तम एकनाथ साळवे ( वय-४०, रा. देवळाली कॅम्प, नाशिक जि.नाशिक), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उज्जनी रस्त्यावर एका मोकळ्या जागेत कापडी मंडप उभारून कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. तेथे काही व्यक्ती कोंबड्यांची झुंज लावत असून उपस्थित नागरिक त्यावर पैशांची पैज लावत असल्याचे आढळले. पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल Read More »

Maharashtra Police

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime: चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५ आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली. सायंकाळी ५ राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण दारुच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला लाकडी दांडी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री ११.३० वाजे दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पून्हा विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, सर्व रा. बुरुडगाव, ता. जि. अहील्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी ११ इसम अशा एकुण १५ जणांवर गुन्हा रजि. नं. २२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११९ (१), ११८ (१), १८९ (२), १९१ (१), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर इतर आरोपी पसार झाले. तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल Read More »

Crime

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Crime: शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडुन प्रतिबंधीत 4000 किलो मांगुर मासा जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करा असे आदेश सोमनाथ घार्गे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आदेश दिले होते. या आदेशावरून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. 03 मार्च 2026 रोजी ट्रक नंबर WB25M5023ú केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेले मांगुर मासे भरुन नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथुन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि/ सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावुन घेवुन निमगाव बायपास रोडवर सापळा रचुन ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणी स्वपन नियम डे , मकबुल रौफ सरदार कुतुब आयुब मंडल आणि मृत्युंजय मुकुल विश्वासला अटक केली आहे. चारही आरोपी पश्चिम बंगाल येथे राहणारे असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 4,00,000 रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधीत मांगुर मासे व 25,00,000 रुपये किमतीचा ट्रक असा एकुण 29,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रतिबंधीत मासे कायदेशीर प्रक्रिया करुन नाश करण्यात आले आहेत.

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई Read More »

crime

Ahilyanagar Crime: नगर शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Ahilyanagar Crime : एका 17 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारिरिक संबंध ठेवुन तिला गर्भवती केल्या प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखे पोउपनि/दिपक मेढे पोलीस अंमलदार गणेश लबडे, फुरकान शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सुनिल मालणकर, योगेशे कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिवाजी शिंदे, सुर्वणा गोडसे, चालक उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपीस शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते. पथकाने गुन्ह्यातील आरोपीला आण्णाभाऊ साठे चौक, लाल टाकी येथून अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहेत.

Ahilyanagar Crime: नगर शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक Read More »