DNA मराठी

Ahilyanagar news

midc

Maharashtra News- एमआयडीसीचा कोट्यावधी रुपयांचं वर्षीला नुकसान जबाबदार कोण, कोणते अधिकारी खाताय मलिदा?

Maharashtra News: एमआयडीसी (MIDC) मध्ये जवळपास 40% भाग भाडेकरूंनी व्यापलेला आहे, आणि त्यातील एक मोठा भाग विनापरवाना भाडेकरू आहेत. एमआयडीसीच्या नियमांनुसार, भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेसाठी एमआयडीसी कार्यालयाला 3% महसूल मिळावा, तर बेकायदेशीर विनापरवाना प्लॉट भाड्याने दिल्यास 8% दंड वसूल करता येणे शक्य आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना भाडेकरूंना जागा दिल्या जात आहेत, आणि एमआयडीसीला यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. स्थानिक अधिकारी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे एमआयडीसीला मागील अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी कोट्यावधी रुपयांचा फटका बसत आहे. या गंभीर प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे आणि योग्य चौकशी करून कारवाई करणे आता आवश्यक झाले आहे. *अधिकारींचे दुर्लक्ष की संगनमत?*स्थानिक अधिकारी आणि संबंधित विभाग या प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा संशय आहे. जर नियमांची योग्य अंमलबजावणी झाली असती, तर एमआयडीसीला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळू शकला असता. हे दुर्लक्ष इतर कोणत्याही कारणामुळे होत असेल, तरी यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात खालील पावले उचलली जाऊ शकतात: चौकशी आयोगाची नियुक्तीएमआयडीसीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र आयोग नेमला जावा, ज्यामुळे या गैरप्रकाराची सखोल तपासणी होऊ शकेल. दंड आकारणेविनापरवाना भाडेकरूंवर आणि त्यांना जागा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा ज्यामुळे एमआयडीसीचे नुकसान भरून निघेल. नियमांची अंमलबजावणीएमआयडीसीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे, ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार टाळता येतील. जनजागृतीस्थानिक लोकांमध्ये जनजागृती करणे, ज्यामुळे ते अशा गैरप्रकारांबद्दल माहिती देऊ शकतील आणि योग्य तक्रार दाखल करू शकतील. मुख्य मथितार्थ: तपशीलवार विश्लेषण: 1. नियमांचे उघड उल्लंघन 2. अधिकाऱ्यांचे ‘जाणीवपूर्वक दुर्लक्ष’ 3. भ्रष्टाचाराच्या छायेत संस्थेची विश्वासार्हता चौकशी आणि कारवाईची मागणी: शेवटची ओळ: “अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे MIDC च्या नियमांची धज्जी उडाली आहे. आता वेळ आली आहे की, या गंभीर प्रश्नावर सरकार कडक कारवाई करेल आणि राज्याच्या हिताचे रक्षण करेल.” या पावलांमुळे एमआयडीसीच्या (MIDC) नियमांचे पालन करण्यात मदत होईल आणि भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार टाळता येतील. त्याचबरोबर, एमआयडीसीला होणारे आर्थिक नुकसान थांबवण्यात मदत होईल.

Maharashtra News- एमआयडीसीचा कोट्यावधी रुपयांचं वर्षीला नुकसान जबाबदार कोण, कोणते अधिकारी खाताय मलिदा? Read More »

IMG 20250319 WA0006 1024x462

अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात

Ahilyanagar News : सुपा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 18 मार्च रोजी सुपा पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैगिक संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाचा तपास सूपा पोलीस ठाण्यात सुरू होता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर या प्रकरणातील आरोपीबाबुराव हरीभाऊ शिंदे याला अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अहिल्यानगर शहर विभागातील प्रभारी अधिकारी यांना अलर्ट करुन अहिल्यानगर शहरात आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना केल्या. याप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांनी नमुद आरोपीचा पोलीस स्टेशनल हद्दीत शोध घेत असताना तो अमरधाम रोड, अहिल्यानगर परिसरात आला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांना सदर परिसरात आरोपीचे शोधकामी पाठविले असता नमुद आरोपी हा गाडगीळ पटांगण, अमरधाम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी मिळुन आला. पुढील कारवाईसाठी आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन येथुन सुपा पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरिता देण्यात आले आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात Read More »

Pankaj Asia 1024x683

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू

Pankaj Asia : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू Read More »

Screenshot 2025 03 08 07 06 22 18 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक

Stock Market Scam: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना बारा तासाच्या आता अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख सिताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी क्लासिक ब्रीज वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक करण्यात आली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तपास करत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुन्ह्यातील आरोपी संदीप मधुकर थोरात (वय-35 रा.पाईपलाईन रोड अहिल्यानगर, दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय-35 रा.घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर) यांची गुप्त माहीती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचे पथके तयार करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपी संदीप मधुकर थोरात याला त्याचे रहाते घरी जात असताना अटक केली तर आरोपी दिलीप तात्याभाऊ कोरडे याला सुपा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वरील आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केले आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक Read More »

IMG 20250228 WA0002

शेवगाव पोलिसांची धमाकेदार कारवाई, अफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला अटक

Ahilyanagar News: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत अफुच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. तसेच 11 लाख 43 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. गणेश नवनाथ घोरतळे, (22 वर्षे रा. मारुती वस्ती बोधेगाव ता. शेवगाव) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्यात लागवडीस बंदी घातलेले अफुच्या झाडाची बोधेगाव शिवारात गणेश नवनाथ घोरतळे याने त्याच्या शेतामध्ये बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात एन डी पी एस कायदा सन 1985 ते कलम 8(b), 18 प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शेवगाव पोलिसांनी दिली आहे.

शेवगाव पोलिसांची धमाकेदार कारवाई, अफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला अटक Read More »

IMG 20250228 WA0001

Ahilyanagar News: शिवदोही प्रशांत कोरटकर, नागपुर बावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

Ahilyanagar News: शिवदोही प्रशांत कोरटकर, नागपुर बावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल  करण्यात यावा या मागणीसाठी आज जिजाऊ ब्रिगेड, अखंड मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रशांत कोरटकर, नागपुर या विक्षिप्त इसमांने इतिहास संशोधक मा. इंद्रजीत सावंत साहेब यांच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषणात राजमाता जिजाऊ मा साहेब, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचेबाबत अतिशय हिनदर्जाचे अवमानकारक तथ्यहीन वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे शिद्रोही प्रशांत कोरटकर वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ कठोर शासन करावे आणि त्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा अहिल्यानगर जिल्हा न्यायालयमध्ये चालवावा अशी विनंती अखंड मराठा समाज व सर्व शिवप्रेमी यांच्यावतीने करत आहोत. अशा विकृत प्रवृत्ती असणा-या इसमावर कडक कारवाई न झाल्यास जी काही गंभीर परिस्थिती उध्दभवेल त्या सर्व परिस्थितीस महाराष्ट्र राज्य सरकार व अहिल्यानगर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा देखील या निवेदनाच्या मार्फत देण्यात आला आहे.

Ahilyanagar News: शिवदोही प्रशांत कोरटकर, नागपुर बावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा Read More »

FB IMG 1739594208760

HSC Exam: कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर होणार कारवाई ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ॲक्शन मोडमध्ये

HSC Exam: जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतील ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सुमारे एक हजारपेक्षा अधिक केंद्रांची पाहणी करत पर्यवेक्षणाबाबत विविध सूचना केल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याबरोबरच परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. संवेदनशील केंद्रांसह सर्वच केंद्रांच्या विविध ब्लॉक मधील थेट दृश्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेतला. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वॉररूमच्या माध्यमातून मॉनिटरिंग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४ तालुके व अहिल्यानगर शहरातील १०९ पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे एक हजारपेक्षा अधिक ब्लॉकवर गुगलमीट, ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही व केंद्र संचालकांना दूरध्वनीद्वारे तातडीने संपर्क साधला जात आहे. यामुळे कॉपीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात यश लाभत आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून आनंददायी परीक्षा पॅटर्नअंतर्गत कॉपी मुक्तीसाठी अत्यंत जागरुकतेने काम करण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे,श्रीराम थोरात,लहू गिरी,जितिन ओहोळ,भावेश परमार आदी समिती सदस्य तसेच तांत्रिक सहायक डॉ.अमोल बागूल जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

HSC Exam: कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर होणार कारवाई ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ॲक्शन मोडमध्ये Read More »

Ahmednagar Collector Office

Ahilyanagar News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

FB IMG 1739333327173

Ajit Pawar: नगरच्या विकासासाठी जास्त निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

Ajit Pawar: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 अंतर्गत प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर नियतव्ययापेक्षा अधिकचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिवाजीराव गर्जे, आमदार किरण लहामटे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा, नगरचे पालक सचिव प्रवीण दराडे आणि नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शासनाने निश्चित करून दिलेल्या बाबींवर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. त्यासोबतच पुढील वर्षापासून दिव्यांग कल्याणासाठी 1 टक्का निधी राखीव ठेवण्याच्या सूचना निर्गमित करण्यात येणार आहे. यावर्षी मार्च अखेरपर्यंत 100 टक्के निधी होईल याचे नियोजन करण्यात यावे. नगरने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारलेल्या कांदा क्लस्टरची माहिती घेवून अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. राजगुरूनगर भागात 9 महिने टिकणारे कांद्याचे वाण उपयोगात आणले जात आहे. असे चांगले वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. अकोले, श्रीगोंदा आणि कर्जत येथे उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्हा दुग्धोत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही या क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. राहता तालुक्यात पशुखाद्य युनिट स्थापीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात क्लस्टरच्या माध्यमातून लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. अकोले तालुक्यात पर्यटनावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्ह्यासाठी कमाल आर्थिक मर्यादेपेक्षा महत्वाच्या योजनांसाठी 150 कोटींचा निधी अधिक मिळावा अशी मागणी केली. पशुवैद्यकीय दवाखाने, दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम, वन क्षेत्रामध्ये मृद व जलसंधारणाची कामे, वन पर्यटन विकास, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, अपारंपरिक ऊर्जा विकास, ग्रामीण रस्ते विकस व मजबुतीकरण, जिल्हा परिषद शाळांची इमारत व वर्गखोल्यांचे बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजीटल शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचे बांधकाम व दुरूस्ती, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या इमारतींसाठी जमीन संपादन व बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना यंत्रसामुग्री पुरविणे, रुग्णालयांसाठी औषधे व साहित्य खरेदी आणि किमान कौशल्य विकास कार्यक्रमासाठी हा निधी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस मुंबई येथून जिल्हा नियेाजन अधिकारी दीपक दातीर तर जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Ajit Pawar: नगरच्या विकासासाठी जास्त निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही Read More »

School

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा

Maharashtra News: अली पब्लिक स्कुल शाळेची कोणतीही मान्यता दर्शवणारे फलक लावण्यात आली नसल्याने कारवाई करण्यात यावी याबाबत गट शिक्षक अधिकारी पंचायत समितीकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. या अर्जात म्हटले आहे की, अली पब्लिक स्कुल, व्हिडिओकॉन कंपनीमागे, ग्रामपंचायत नागरदेवळे, बु-हाणनगर, अहमदनगर या ठिकाणी सदर शाळा ही तीन ते चार वर्षापासून सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुले-मुली शिक्षण घेत असुन त्या ठिकाणी शिक्षणासोबत मुलांकरीता हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही शाळा चालू असताना सदर शाळेने कोणतेही मान्यता असलेले फलक लावण्यात आले नसुन यामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते असे आमचे निदर्शनास आले आहे. सदरील गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असुन सदर विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होऊ नये याकरीता आपण योग्य ती कारवाई करावी. याबाबत चौकशी करुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा Read More »