Stock Market Scam: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना बारा तासाच्या आता अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख सिताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी क्लासिक ब्रीज वर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कंपनीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक करण्यात आली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
या प्रकरणात तपास करत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुन्ह्यातील आरोपी संदीप मधुकर थोरात (वय-35 रा.पाईपलाईन रोड अहिल्यानगर, दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय-35 रा.घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर) यांची गुप्त माहीती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचे पथके तयार करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
आरोपी संदीप मधुकर थोरात याला त्याचे रहाते घरी जात असताना अटक केली तर आरोपी दिलीप तात्याभाऊ कोरडे याला सुपा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
वरील आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केले आहे.