DNA मराठी

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान

eknath shinde

Eknath Shinde: राज्यातील एसटीच्या 85 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या आणि कृती समितीच्या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *