Navnath Waghmare : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगेची एसआयटी चौकशी लावून त्याला बिनभाड्याच्या खोलीत टाका,त्याच्याशिवाय त्याची ड्युटी बंद होणार नाही असं ओबीसी नेता नवनाथ वाघमारे म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी जर सरकारने जरांगे यांचं ऐकून आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सरकारच्या विरोधात काम करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.
तसेच जरांगेमुळे EWS आरक्षण गेलं, त्याला समाजाशी काहीही देणं घेणं नाही असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला. याच बरोबर जर जरांगेची एसआयटी चौकशी सुरू झाली तर जरांगे यांचे हजारो लोक मटका, दारू, वाळूत जेलमध्ये जातील असं देखील यावेळी नवनाथ वाघमारे म्हणाले.