Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान जर्मन हॉस्पिटल जवळ दोन अज्ञात हल्लेखोराकडून हाजी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. तीन ते चार गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.
दरम्यान दुपारी झालेल्या गोळीबारानंतर जखमी जहागीरदार यांना तातडीने कामगार हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात असता त्यावेळी त्यांच्या समर्थकांचा मोठा जमाव हॉस्पिटल परिसरात जमला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना पुढील उपचाराकरिता नगर येथील हॉस्पिटल मध्ये पाठवले हे.
दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी हल्लेखोरांनी जहागिरदार यांच्यावर गोळीबार केला.गोळीबाराचा आवाज ऐकताच नागरिकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.
गोळीबाराची माहिती कळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात आरोपींच्या शोधासाठी नाकेबंदी केली असून गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपूर पुन्हा एकदा हादरले आहे. श्रीरामपूर मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून , परिस्थितीवर पोलिस लक्ष ठेवून आहेत.






