Dnamarathi.com

Exit Poll 2024 : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. यानंतर आता वेगवेगळ्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताना दिसत आहे. 

या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टप फाईट असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती. ही शक्यता आता एक्झिट पोलमध्ये देखील दिसत आहे. 

ABP-CVoter ने जाहीर केलेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोल नुसार राज्यात महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. 

4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या एक्झिट पोल नुसारच जर निकाल जाहीर झाला तर राज्यात भाजपला मोठा धक्का बसू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने 42 जागांवर विजय मिळवला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 या एक्झिट पोल नुसार राज्यात महाविकास आघाडीला 23 ते 25 आणि महायुतीला 22 ते 26 मिळण्याचा अंदाज  आहे. 

एक्झिट पोल नुसार  भाजपला 17 शिंदे गटाला 06 आणि अजित पवार गटाला 01 जागा मिळणार तर  ठाकरे गटाला 09 काँग्रेसला 08 आणि शरद पवार गटाला 06 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *