Dnamarathi.com

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा करत राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असून लवकरच शिंदे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

राऊत मुंबईत कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार 3 महिन्यात बदलणार आहे. यासोबतच नव्या सरकारचे शिल्पकार उद्धव ठाकरे असतील, असेही ते म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाच्या नेत्यांशी विचारमंथन केले.

तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकामुळे राज्यात राजकीय वातावरण तापला आहे. महाविकास आघाडीकडून तीन जागांवर ठाकरे गट तर एक जागेवर काँग्रेसने उमेदवार दिला आहे. 

काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती

कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील आगामी एमएलसी निवडणुकीसाठी शिवसेनेने (यूबीटी) उमेदवारांच्या घोषणेवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने उद्धव सेनेला आपल्या उमेदवारांची नावे मागे घेण्यास सांगितले होते.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडीच्या  साथीदारांशी चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आपला उमेदवार ठरवला.  घटक पक्षांशी चर्चा करूनच उमेदवार आणि जागा निश्चित होतील, अशी आम्हाला आशा होती.

मात्र, नंतर परस्पर संमतीने दोघांमध्ये जागा वाटून घेण्यात आल्या. उद्धव यांचे उमेदवार तीन जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *