मुंबई / नंदुरबार / शनिशिंगणापूर – राज्यातील दोन मंत्र्यांनी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) – शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होत. राजकीय वाद, आरोप आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर शांतीसाठी शनिपुढे शरणागती पत्करली आहे. यामुळे ‘राजकीय साडेसाती’ टाळण्याचा अध्यात्मिक मार्ग शोधला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे.
माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate)
रमी प्रकरण, ‘शासन भिकारी’ विधान, आणि आता शनी पूजन, जोरात
माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार येथील शनि मंदिरात विशेष पूजा केली. विधानसभेत अधिवेशन चालू असताना मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व्हिडिओ x वर व्हायरल केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते. त्यावर काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) आणि इतरांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी थेट साडेसातीमुक्तीसाठी शनिदेवाला साकडं घातलं.
त्यातच कोकाटे यांनी केलेलं वादग्रस्त विधान – “शासनच भिकारी आहे” – यामुळे त्यांच्यावर अधिक टीका झाली होती. सुप्रिया सुळे व शेतकरी संघटनांनी निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर “योग्य ती कारवाई होईल,” असा सूचक इशारा दिला आहे.
मंत्री संजय शिरसाट – शनिशिंगणापूरच्या देवळात भावनिक दर्शन, पण राजकीय सावट कायम
तर दुसरीकडे, शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी कौटुंबिक संकटांबरोबरच त्यांची पैसेची बंग असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरूनही राजकरण चांगलेच तापले होते, त्यामुळे जकीय अडथळ्यांपासून सुटका मिळावी या हेतूने शनिशिंगणापूर येथे दर्शन घेतले. तेल अभिषेक, कुटुंबासह विधी, आणि आत्मिक शांतीसाठी प्रार्थना करताना त्यांची भावनिक स्थिती स्पष्ट जाणवत होती.
मात्र, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कोकाटे व शिरसाट यांच्यावर टिकेचा बाण सोडला. “नेते संकटात आले की देवाची आठवण होते, पण जनतेसाठी कधी शरण जातात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि विश्लेषण
राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची कुजबूज सुरू असताना, कोकाटे व शिरसाट यांचे शनिदर्शन ही केवळ श्रद्धा नसून राजकीय संकेतांची भाषा आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एका बाजूला अध्यात्मिक आसरा, तर दुसरीकडे विरोधकांचा रोष – हे समीकरण आगामी राजकीय घडामोडींचा प्रारंभ ठरू शकते