DNA मराठी

Pune Crime: पुण्यात डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश

Pune Crime : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वारजे आणि उत्तम नगर परिसरात डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून ड्रग्स विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील राठोड याला अटक करण्यात आली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे आरोपी Porter या डिलिव्हरी ॲपचा वापर करून MD (मॅफेड्रोन) या ड्रग्सचा पुरवठा करत होते. पोलिस तपासात तब्बल 300 जणांना या ड्रग्सचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून काही प्रमाणात MD ड्रग्स जप्त केले असून, या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *