Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसापूर्वी चाकूने हल्ला करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. तर आता त्या रात्री नेमक काय घडलं होते याबाबत सैफने गुरुवारी त्याच्या घरी पोलिसांना आपला जबाब नोंदवला आहे.
सैफवर हल्ला झाला त्या रात्री काय घडले?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफने आपल्या जबाबात म्हटले आहे की, 16 जानेवारीच्या रात्री तो आणि त्याची पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते. जेव्हा त्याने त्याची नर्स एलियामा फिलिपच्या किंकाळ्या ऐकल्या. सैफ पुढे म्हणाला की जेव्हा त्यांना त्यांच्या नर्स अलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ते दोघेही जहांगीरच्या रूमकडे धावले, जिथे अलियामा फिलिप देखील झोपली होती. तिथे त्याला एक अनोळखी माणूस दिसला आणि जहांगीरही रडत होता.
सैफवर हल्ला कसा झाला?
सैफ म्हणाला की त्याने हल्लेखोराला पकडले. यावेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि कसा तरी त्याने स्वतःची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोराला मागे ढकलण्यात आले.
पोलिसांना चाकूचा तिसरा तुकडा सापडला
16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यात वापरलेल्या चाकूचा तिसरा तुकडा जप्त करण्यात आला आहे. “चाकूचा तिसरा तुकडा, ज्यामध्ये हँडल आणि ब्लेडचा काही भाग होता, तो वांद्रे तलावाजवळ सापडला,” असे वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या ठिकाणाहून चाकूचा भाग सापडला ते ठिकाण अभिनेत्याच्या सतगुरु शरण बिल्डिंगमधील घरापासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. बुधवारी संध्याकाळी आम्ही आरोपीला तलावावर घेऊन गेलो आणि चाकूचा हरवलेला भाग सापडला.”