Sahyadri Hospital Case : पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची 10 डिसेंबर रोजी तोडफोड केल्याची धक्कादाय घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले होते. तर आता या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम सकपाळ, गौरव सकपाळ, विश्वजीत कुमावत, कुणाल सकपाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






