आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम
Rohit Pawar : जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रत्नदीपबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली.
चार मुद्दयावर विद्यापीठ प्रतिनिधीनी कुलगुरू समवेत होणाऱ्या मिटींग नंतर निर्णय घेतले जातील असे अश्वासन दिले परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला डॉ. भास्कर मोरे याला 24 तासात अटक करण्याची मुदत संपली 100 घंटे झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
महिला आयोगाकडून दखल रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे माणसिक, अर्थिक शाररीक, अत्याचारामुळे सुरू असलेल्या अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे.
आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ) (एक) व (2) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे व माहीती कळवण्यास सांगितले आहे.