Dnamarathi.com

Road Accident: हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बापटलाहून हैदराबादकडे जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसली. या अपघातात 32 जण जखमी झाले असून, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   या धडकेमुळे लागलेली आग इतकी भीषण होती की बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले.   

बसमध्ये 42 जण होते

बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून एक खासगी बस हैदराबादकडे जात होती. त्यानंतर हैदराबाद-विजयवाडा महामार्गावरील चिलकलुरीपेट मंडळाजवळ बस ट्रकला धडकली. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी लगेच पेट घेतला. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात ट्रक आणि बस चालकाचा मृत्यू झाला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य चार जणांनाही आपला जीव गमवावा लागला. अपघाताच्या वेळी बसमध्ये 42 जण प्रवास करत असल्याचे जखमींनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका 8 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

मृतांची ओळख

ठार झालेले लोक बापटला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये 35 वर्षीय बस चालक अंजी, 65 वर्षीय उपपगुंडूर काशी, 55 वर्षीय उपपगुंडूर लक्ष्मी आणि मुप्पाराजू ख्याती सासरी नावाच्या 8 वर्षीय मुलीचा समावेश आहे. उर्वरित दोन जणांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातात 32 जण जखमी झाले आहेत. जखमींवर चिलकलुरीपेठ शहरातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *