Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताच पोलीस विभागातील मोठी बातमी समोर आली आहे.
रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काल रात्री उशिरा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने त्यांना पदमुक्त केले होते. आता पुन्हा एकदा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाने सातत्याने रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत.
काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांच्या जागेवर संजयकुमार वर्मा यांची निवडणुक कालावधी पुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात अली होती.
30 जून 2024 रोजी शुक्ला या सेवा निवृत्त झाल्या होत्या परंतु महायुती सरकारने त्यांना पोलीस महासंचालक पदी बसवून दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.