Ram Mandir : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. अयोध्येत येण्यासाठी राम भक्तांना आमंत्रण देण्यासाठी अक्षदा अभिमंत्रीत करून अक्षदा कलश नगर येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पुणे प्रांत कार्यालयातून नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात विधिवत पूजन करून आणण्यात आला होता.
या अक्षदा कलशाची मिरवणूक शोभायात्रा रविवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिरापासून निघणार आहे.या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची मूर्ती,सनई,बँड,चौघडे, तसेच भगवे ध्वजधारी रामभक्त सहभागी होणार आहेत. माळीवाडा येथे श्री विशाल गणेश मंदिरात महंत संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते पुजन करुन शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
मिरवणुक मार्ग श्री विशाल गणपती मंदिर, पांचपीर चावडी ,आशा टॉकीज, माणिक चौक,कापड बाजार, तेलीखुंट चौक,नेता सुभाष चौक, चितळे रोड,चौपाटी कारंजा, दिल्लीगेट या मार्गाने समारोप दिल्लीगेट येथील विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय कुबेर गणेश मंदिर येथे होणार आहे. यानंतर अक्षदा कलश महाजन गायत्री मंदिर येथे आणण्यात येणार आहे.
नगर तालुका,पारनेर, श्रीगोंदा ,कर्जत ,जामखेड, पाथर्डी शेवगाव,तसेच नगर शहरातील उपनगरे या ठिकाणी अक्षदा कलश पाठविण्यात येणार आहेत.अक्षता मंगल कलश यात्रेचे स्वागत करणेसाठी शोभायात्रेत राम भक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.