DNA मराठी

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार

raju shetty

Raju Shetty : कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरच्या जवळच नांदणी परिसरात हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे.

वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल. लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत वनताराने हा एक अनोखा तोडगा काढला काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे.

राजू शेट्टी यांनी अंबानी परिवार आणि विशेषतः अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

आम्ही जैन समाजाचे असून जिओ और जिने दो या तत्वाने जगत असतो. माधुरी हत्तीची काळजी घेत नसल्याचा व तिचा छळ करण्याचा आरोप पेटाने आमच्यावर लावला. हा आरोप आम्हाला सहन नाही झाला. जीव, जंतू आणि जनावर यांच्यावर प्रेम असल्यामुळे आम्हाला त्रास झाला. यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता. मात्र आता शेवट छान होत असून यामध्ये अनंत अंबानींची विशेष भूमिका राहिल्याने राजू शेट्टी यांनी अंबानी परिवाराचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *