Raj Thackeray: राज्यातील राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
खासदार संजय राऊत ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघणार आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर केल्याने हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून 5 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सर्व राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील या मोर्चात राज ठाकरे यांच्यासोबत सहभागी होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती वरून राजकारण तापले असून मनसेसोबत इतर विरोधी पक्ष महायुती सरकारवर जोरदार टीका करत निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहे. विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून या निर्णयावरून विरोधक सरकारवर निशाणा साधत आहे.