Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख मतांची चोरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.
यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकामध्ये मत चोरीचा आरोप केला होता. तर आता त्यांनी हरियाणामध्ये तब्बल 25 लाख मतांची चोरी झाली असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो दाखवत या तरुणीने 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने 22 मते टाकली. राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणातील पाच श्रेणींमध्ये 25 लाख मते चोरीला गेली. त्यांनी श्रेणीनिहाय आकडेवारीही दिली आणि सांगितले की, 5 लाख 21 हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत.
हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत. 25 लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.






