DNA मराठी

Pune Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 19 लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

state excise department

Pune Crime : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने मोठी कारवाई करत १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.

माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ व ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार मार्केट यार्ड पुणे तसेच शेलपिंपळगाव ता. खेड व आंबी ता. मावळ या तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून ५ वाहनांसह ३ हजार २२० लिटर गावठी हातभट्टी दारु असा एकूण १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. सूर्यवंशी वाय.एम.चव्हाण, ए.डी. गायकवाड सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर साबळे संजय साठे, जवान सर्वश्री. अहमद शेख, भरत नेमाडे, चंद्रकांत नाईक, विजय भानवसे अमर कांबळे, अनिल दांगट, जी. बी. माने, जयदास दाते. जगन्नाथ चव्हाण व महिला जवान अक्षदा कड, जवान नि वाहन चालक प्रमोद खरसडे व शरद हंडगर यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या निर्मिती, विक्रीमुळे महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याबाबत कोणास माहिती मिळाल्यास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ ताडीवाला रोड, पुणे व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक ३, तळेगाव दाभाडे ता. मावळ, या पथकांशी संपर्क साधावा, असे आवाहन निरीक्षक देवदत्त पोटे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *