Pune Crime : पुण्यातील कॅम्प परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, किरकोळ वादावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली असून 2 आरोपींचा शोध घेत आहे. फैसल खान असं मयत तरुणाचं नाव आहे. तर बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली, शाहबाज चांद शेख, तालिब अली सय्यद, अश्रफली सय्यद अशी आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहबाज शेख आणि मयत फैसल खान दोघे मित्र होते. शहबाज शेख याची मयत फैसल खान याने थटटा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शहबाज याने मयताचे कानाखाली चापट मारली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद वाढला. यानंतर शहबाज शेख व त्याच्या बाकीदारांनी धारधार चाकुने मयत फैसल खान याच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली.
सध्या या प्रकरणात दोन आरोपी फरार असून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
तर दुसरीकडे पुण्यात दिवसेंदिवसे गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. हत्या, चोरी सारखे गुन्हे दररोज दाखल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.






