DNA मराठी

Shashikant Shinde : राजकारणात पुन्हा ट्विट्स? शशिकांत शिंदे अन् प्रविण दरेकर एकाच गाडीत

shashikant shinde

Shashikant Shinde : राज्यातील राजकारणात कधी काय होणार याबाबत कुणालाही सांगता येत नाही. अशीच एक घटना विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचे आमदार प्रविण दरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

वेगवेगळ्या विचारधारायचे हे नेते एकमेकांविरोधात जोरदार हल्लाबोल करत असतात मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकत्र प्रवास केल्याने येणाऱ्या काळात राजकारणात नवीन ट्विस्ट येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे आम्ही केवळ आजच नाही, तर यापुढेही तुम्हाला अशाच प्रकारे एकाच गाडीत दिसू अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी दिल्याने शशिकांत शिंदे भाजपासोबत जाणार का? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

प्रविण दरेकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्यानंतर आता लवकरच शशिकांत शिंदे महायुतीत दिसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *