Pathardi News: पाथर्डी तालुक्यात आता सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे, धुम्रपान करणे किंवा थुंकणे तुम्हाला चांगलेच महागात पडणार आहे. प्रशासनाने आता ‘कोटपा कायदा 2023’ (COTPA Act) ची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तहसीलदार उद्धव नाईक यांचा कडक इशारा:
नियम मोडणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर थेट गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
आरोग्याचा गंभीर प्रश्न:
तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार जडतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे टीबी (क्षयरोग) सारख्या गंभीर आजारांचा प्रसार होतो, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.
कृती आराखडा:
🔹 शाळा, महाविद्यालये, बाजारपेठांमध्ये जनजागृती मोहीम.
🔹 सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात फलक आणि स्वच्छता मोहीम.
🔹 नियमित तोंडाच्या कर्करोगाची तपासणी शिबिरे.
🔹 व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्रांची प्रभावी अंमलबजावणी.






